चाकण ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत सुरु

चाकण ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत सुरु


पहिल्याच दिवशी मोठ्या रांगा 

चाकण: 
   चाकण येथील ग्रामीण रुग्णालय आज (दि.८) पासून  नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे.  पुढील कामासाठी निधीच्या तरतुदी अभावी  ग्राऊंड फ्लोअर वरच अडकलेली ही नवीन वास्तू चाकण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने मागील आठवड्यात ताब्यात घेण्यात आली होती. त्या नंतर आज पासून   रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्येच सर्व कामकाज सुरु करण्यात आले आहे. सध्या या नवीन इमारतीमध्ये पाण्याची सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
   सध्या या नवीन रुग्णालयात ९ रुग्णांसाठी खाटांची सोय असून येथे तीस खाटांची मंजुरी असतानाही इमारतीच्या वरच्या मजल्याचे सहा हजार स्क्वेअर फुटांचे काम झालेले नसल्याने काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.  येथे आणखी सोयीसुविधा मिळाव्यात अशी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे. येथे एक वैद्यकीय अधीक्षक व तीन डॉक्‍टरांची नियुक्‍ती आहे. मात्र एक जागा रिक्त असून डॉक्टरांची संख्या मर्यादित असल्याने मोजक्याच डॉक्‍टरांवर दिवस- रात्र रुग्णांच्या तपासणीची जबाबदारी येते. पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्गावर व वडगाव ते शिक्रापूर या राज्य महामार्गावर  सातत्याने अपघात होत असतात. यातून जखमींवर उपचारासाठी अडचणी येतात. सध्याच्या वातावरणामुळे ग्रामीण भागात सर्दीखोकलाताप व इतर रुग्णांची संख्याही वाढली आहे. यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र २४ तास सेवा देण्यास कर्मचारी अपूर्ण पडत आहेत. गंभीर रुग्णांना अनेकदा पुणे-पिंपरी येथील रुग्णालयांत न्यावे लागते.  रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले असले तरी नवीन खुर्चीटेबलकपाट व लागणारी आधुनिक पद्धतीची यंत्रणा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही . कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली असली तरी रुग्णालय आवारातील त्यांच्या सदनिका अद्याप रुग्णालय प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत .  त्यामुळे रुग्णांना तत्पर सेवा देण्यात अडचणी येतात. येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकीच्या सोयी देण्या बाबत त्वरित दखल घेऊन आरोग्य विभागाने योग्य नियोजनकार्यवाही करण्याची मागणी होत आहे. 

नागरिक म्हणतात....
नवीन अद्यावत इमारत बांधण्यात आलीपरंतु तीचे अर्धे काम अद्यापही बाकी आहे. त्यामध्ये कोणतीही सुधारीत अद्यावत साधनसामुग्री नसून अद्यावत साधनसामुग्रीचा नवीन वास्तू होऊनही अभाव आहे.  सध्या येथील वैद्यकीय अधीक्षक स्वतः प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून असतात. एवढ्याच मनुष्यबळात रुग्णांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र अधिक कर्मचारी जनरल सर्जन यांच्या नियुक्ती झाल्यास सगळेच प्रश्न सुटणार असल्याचे चाकण पंचक्रोशीतील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

दृष्टिक्षेपात रुग्णालय...
वैद्यकीय अधीक्षक- १
डॉक्‍टर- २
परिचारिका -७
कॅशिअर- १
औषधनिर्माता- १
कक्षसेवक -१
शिपाई -१
स्वीपर- २
रुग्णवाहिका चालक - १
कॉट- ९ ( गरज ३० )
---------------
अविनाश दुधवडेचाकण 9922457475 .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)