आळंदीच्या कीर्तनकार महाराजांवर गुन्हा

जीवे मारण्याची धमकी देत युवतीवर बलात्कार

आळंदीच्या कीर्तनकार महाराजांवर गुन्हा
चाकण:
   आळंदी  (ता.खेड,जि.पुणे ) येथील  एका युवकाने ओळखीचा फायदा घेवून २२ वर्षीय  तरुणीवर  गेल्या काही दिवसांपासून पासून वेळोवेळी बदनामीची व जीवे मारण्याची भीती दाखवीत ह.भ.प शेणगावकर महाराजांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . याबाबत चाकण पोलिसात आज (दि.३०)  रात्री उशिरा संबंधित तरुणीच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
   ह.भ.प शिवदास शेणगावकर ( रा. आळंदी,ता.खेड  जि.पुणे ) असे या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या महाराजांचे  नाव आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधित नराधमाने चाकण मधील एकतानगर भागात राहणाऱ्या या युवतीवर गेल्या काही महिन्यापासून  आळंदी  यवतमाळ येथे नेऊन वेळोवेळी बलात्कार केला.  सततच्या या प्रकारांना कंटाळून अखेर  पीडित युवतीने चाकण पोलिसात तक्रार दिली. पोलिसानी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.  
---------------------------------- 
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)