प्रलंबित प्रश्नांसाठी हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार : आमदार गोरे
प्रलंबित प्रश्नांसाठी हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार
आमदार सुरेश गोरे यांचे प्रतिपादन
चाकण :
खेड तालुक्यातील राजगुरुनगर-चाकण-आळंदी ही महत्वाची शहरे आहेत , या शहरातील काही धोरणात्मक अडचणी सोडवण्यासाठी व तालुक्यातील पुनर्वसन आणि अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी आपल्याच विचारांच्या राज्य सरकारकडे हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी दिली. चाकण ग्रामस्थ, चाकण पतसंस्था व विविध संघटना यांच्या वतीने आमदार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.
तालुक्यातील ही महत्वाची शहरे आणि दुर्गम भाग सुंदर बनवायचा आहे. त्यासाठी कोणती विकासकामे पहिल्या टप्प्यात करावीत, कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे याबाबतचे नियोजन केले जात आहे. आता खेडच्या जनतेने हक्काचा आमदार निवडून दिलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सर्वाना सोबत घेवून गावागावातील नागरिकांच्या समन्वयातून विकासात्मक कामे केली जातील. येथील समस्या मंत्रालयीन स्तरावर पोहचल्याच नाहीत त्या आता सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सोडविण्याचा प्रयत्न असणार आहे. हिवाळी अधिवेशनात यातील समस्या मांडल्या जातील. विविध मोठ्या योजनांसाठी राज्य पातळीवरून निधी प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करून विकासासाठी काही महत्त्वाची कामे पहिल्या टप्प्यात पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. अधिवेशनातही लक्षवेधी मांडून हे प्रश्न सोडवले जातील, असेही आमदार गोरे म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोरे ,राजेंद्र वाडेकर, चाकणचे माजी सरपंच नंदकुमार गोरे , काळूराम गोरे, माजी उपसरपंच साजिद सिकीलकर, अस्लमभाई सिकीलकर, अजित सिकीलकर, समीर सिकीलकर,जहीर शेख, साईबाबा पतसंस्थेचे संचालक रामदास जाधव, प्रा. किशोर गोरे, चाकण ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष नवनाथ शेवकरी,उपाध्यक्ष अशोक जाधव, संचालक अशोक गोरे, सुरेश कांडगे, नितीन गोरे,प्रकाश भुजबळ, भगवान कांडगे , सचिव अनिल धाडगे , शिवसेनेचे प्रकाश वाडेकर, आंबेठाणचे सरपंच सुभाष मांडेकर, बाळासाहेब वाघ, तालुका उपप्रमुख पांडुरंग गोरे, शहरप्रमुख प्रीतम शिंदे, आदी उपस्थित होते. किशोर गोरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.
--------
अविनाश दुधवडे, चाकण 99457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा