वाळणाऱ्या फळबागां मुळे कोट्यवधीचे नुकसान

फळबागांचे होतेय मातेरे ;आणेवारीची थट्टा
चाकण: अविनाश दुधवडे
चाकण परिसरासह खेड तालुक्यातील अनेक फळबागा वाळण्यास व करपण्यास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांना या फळबागा तोडण्याशिवाय दुसरे गत्यंतर उरलेले नाही. जीवापाड कष्टाने जोपासलेल्या या बागा डोळ्यादेखत उध्वस्त होतांना शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. वाळणाऱ्या फळबागांमुळे हजारो शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातही यंदा अत्यल्प पावसाने काहूर माजविले.तालुक्याच्या पूर्वेकडील काही गावे टंचाई ग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत.या बाबत शेतकरी कुणबी मराठा संघाने सांगितले की,सरकारी आकडे काहीही सांगत असले तरी पाऊस कमी झाल्याने व त्यावर केवळ पन्नास टक्के उतारा लागलेली खरीप पिके तेवढी शेतकऱ्यांच्या हाती लागली.रब्बी पिकांची पेरणीच झाली नाही.आता फळबागांचे मातेरे होऊ लागले आहे. चाकण लगतच्या कडाची वाडी परिसरातील काही शेतकऱ्यांच्या फळबागा करपल्या असून आता त्या तोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.नगदी फळबागा उध्वस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. आता या फळबागा तोडण्याच्या मजुरीसाठी पैशाची मारामार असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .
यासंदर्भात करपलेल्या व वाळलेल्या फळबागांचे त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्य दुष्काळी जिल्ह्यांच्या धर्तीवर मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत राज्याच्या कृषी आयुक्तांकडे,तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आली आहेत.या बाबत खेड तालुक्याचे कृषी अधिकारी गणेश तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,शेतकऱ्यांच्या समवेत केलेल्या पंचनाम्यात खेड तालुक्यातील 18 गावांची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आल्याने त्या गावांसाठी शासनाची सुमारे सव्वा आठ लाखांची मदत देण्यात येणार आहे.चाकण भागातील सिद्धेगव्हाण व चिंचोशी या दोनच गावातील आणेवारी कमी आलेली आहे.अन्य गावांची फळबागांची अवस्था दयनीय असली तरी आणेवारी शासकीय नियमांच्यापेक्षा अधिक असल्याने आम्ही त्यांच्याबाबत वरीष्ठ कार्यालयात माहिती देवू असे कृषी अधिकारी तांबे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा रोष :
चाकण परिसरातील अनेक शेतकर्यांनी वाळलेल्या फळबागांचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण आणेवारी पेक्षाही प्रत्यक्ष पहाणी करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी केली आहे .मुळात अधिकारी वर्ग कार्यालयात बसून आणेवारी ठरवीत असल्याने खरी स्थिती बाहेर येत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून ,वाळलेल्या फळबागांची पाहणी करण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी येत नसल्याबद्दल या भागातील अनेक संबंधित शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.तर शेतकरी कुणबी मराठा संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
----------------
----------------Avinash Dudhawade, chakan 9922457475
फळबागांचे होतेय मातेरे ;आणेवारीची थट्टा
चाकण: अविनाश दुधवडे
पाऊस अवर्षण व दुष्काळाचा जबरदस्त फटका चाकण पंचक्रोशीतील व तालुक्यातील फळबागांनाही बसला आहे. शासनाच्या प्रचलित नियमानुसार ज्या गावाची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असेल त्या भागातील फळबाग शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळत नाही. मात्र खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावच्या एका भागात पाणी तर दुसऱ्या भागात ठणठणाट अशी स्थिती असल्याने अनेक शेतकऱ्यांना टँकर व डोक्यावरून पाण्याचे हांडे वाहून फळबागा जगविण्याची वेळ आली आहे.त्यामुळे तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना सुद्धा शासकीय मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी राज्याच्या कृषी आयुक्तांकडे केली आहे.
चाकण परिसरासह खेड तालुक्यातील अनेक फळबागा वाळण्यास व करपण्यास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांना या फळबागा तोडण्याशिवाय दुसरे गत्यंतर उरलेले नाही. जीवापाड कष्टाने जोपासलेल्या या बागा डोळ्यादेखत उध्वस्त होतांना शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. वाळणाऱ्या फळबागांमुळे हजारो शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातही यंदा अत्यल्प पावसाने काहूर माजविले.तालुक्याच्या पूर्वेकडील काही गावे टंचाई ग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत.या बाबत शेतकरी कुणबी मराठा संघाने सांगितले की,सरकारी आकडे काहीही सांगत असले तरी पाऊस कमी झाल्याने व त्यावर केवळ पन्नास टक्के उतारा लागलेली खरीप पिके तेवढी शेतकऱ्यांच्या हाती लागली.रब्बी पिकांची पेरणीच झाली नाही.आता फळबागांचे मातेरे होऊ लागले आहे. चाकण लगतच्या कडाची वाडी परिसरातील काही शेतकऱ्यांच्या फळबागा करपल्या असून आता त्या तोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.नगदी फळबागा उध्वस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. आता या फळबागा तोडण्याच्या मजुरीसाठी पैशाची मारामार असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .
यासंदर्भात करपलेल्या व वाळलेल्या फळबागांचे त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्य दुष्काळी जिल्ह्यांच्या धर्तीवर मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत राज्याच्या कृषी आयुक्तांकडे,तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आली आहेत.या बाबत खेड तालुक्याचे कृषी अधिकारी गणेश तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,शेतकऱ्यांच्या समवेत केलेल्या पंचनाम्यात खेड तालुक्यातील 18 गावांची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आल्याने त्या गावांसाठी शासनाची सुमारे सव्वा आठ लाखांची मदत देण्यात येणार आहे.चाकण भागातील सिद्धेगव्हाण व चिंचोशी या दोनच गावातील आणेवारी कमी आलेली आहे.अन्य गावांची फळबागांची अवस्था दयनीय असली तरी आणेवारी शासकीय नियमांच्यापेक्षा अधिक असल्याने आम्ही त्यांच्याबाबत वरीष्ठ कार्यालयात माहिती देवू असे कृषी अधिकारी तांबे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा रोष :
चाकण परिसरातील अनेक शेतकर्यांनी वाळलेल्या फळबागांचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण आणेवारी पेक्षाही प्रत्यक्ष पहाणी करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी केली आहे .मुळात अधिकारी वर्ग कार्यालयात बसून आणेवारी ठरवीत असल्याने खरी स्थिती बाहेर येत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून ,वाळलेल्या फळबागांची पाहणी करण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी येत नसल्याबद्दल या भागातील अनेक संबंधित शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.तर शेतकरी कुणबी मराठा संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
----------------
----------------Avinash Dudhawade, chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा