...तर नद्या विषवाहिन्या होण्यापासून रोखण्यास होईल मदत


जिल्ह्यातल्या नऊ गावांमध्ये होणार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प


चाकण: अविनाश दुधवडे 
न्य विकसित देशांच्या धर्तीवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरीक्त इतर कामांसाठी पुन्हा वापरात येऊ शकते, हा प्रयोग राज्यातील सुमारे शंभर गावांमध्ये यशस्वी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.पर्यावरणाला पूरक व दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी                आदर्शवत असा हा प्रयोग असून पुणे जिल्ह्यातील चाकण सह नऊ गावांमध्ये राज्य शासनाचा हा 'सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प' प्रयोग यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्नशील आहे.

 पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन(ता.हवेली),चाकण(ता.खेड),पाटस (ता. दौंड),मालेगाव बुद्रुक(ता.बारामती)ओतूर (ता. जुन्नर),राजगुरुनगर (ता. खेड),नारायणगाव(ता. जुन्नर)कळंब(ता. इंदापूर)लोणी काळभोर(ता.हवेली)ही नऊ गावे या प्रयोगासाठी निवडण्यात आली आहेत.पश्चीम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांतील गावांचा या मध्ये समावेश आहे.या मधून संबंधित शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून संबंधित हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी या साठी तत्वत मंजुरी देवून शुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

 या प्रयोगाद्वारे किमान50 ते 80 टक्के पाण्याची बचत होऊ शकते,शिवाय थेट नदीत जाणाऱ्या सांडपाण्याने विषवाहिन्या होण्यापासून नद्यां वाचविण्यासाठी मदत होणार आहे.वाढता वाढता वाढे या न्यायाने जलपर्णीच्या संकटाने पुणे जिल्ह्यातील अनेक नद्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून घुसखोरी केली आहे.या भागातील  नद्यांना प्रदूषण समस्येचा विळखा पडला आहे. नदीच्या पात्रांमध्ये होणारे भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी हा विषय गेल्या काही वर्षात गंभीर झाला आहे.जलपर्णीच्या या संकटाने गेल्या काही वर्षात जवळपास  या भागातील इंद्रायणी ,भीमा आदी बहुतांश तालुक्यातील नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषत: हिवाळा संपता संपता ही जलपर्णी  नद्यांचा ताबा घेत असून मग पावसाळय़ापर्यंत तिचेच राज्य नद्यांवर पहावयास मिळत आहे  .नदी पत्रातून काढलेली जलपर्णी त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याचे स्पष्ट झाल्याने जलपर्णी नष्ट करण्यासाठी होणाऱ्या उपाययोजना तोकड्या असल्याचे अनेकदा या जलपर्णी काढल्या आता स्पष्ट झाले आहे. कितीही काढली तरी ती परत खूप मोठ्या वेगाने वाढतच राहते अशी तक्रार करीत ठीकठीकाण च्या स्थानिक प्रशासनांनी आता हात टेकले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व घरगुती वापरातील सांडपाणी कुठल्याही प्रक्रियेविना सर्रास नद्यांमध्ये मिसळत असल्याने नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्नगंभीर झाल्याचे सर्वश्रुत आहे .त्यासाठी नदीतील प्रदूषण रोखणे ही प्रथम पायरी ठरू शकणार असून त्यासाठी 'सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प'उपयोगी ठरणार आहे.सध्या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर घाण प्रदूषण वाढल्याने नद्यांचे  सौंदर्य तर गेले आहेच  पण या जलपर्णी वर विविध कीटक,डासांची उत्पत्ती होत असल्याने नद्यां लगतच्या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरीक्त इतर कामांसाठी पुन्हा वापरण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रयत्न चालविले आहेत.मात्र या अनोख्या प्रयोगाची -प्रकल्पाची यशस्वीता त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळणाऱ्या प्रतीसादावरच अवलंबून आहे.

असे आहे प्रकल्पाचे स्वरूप:
स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासाठी मंजुरी आणि शुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्या नंतर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या प्रकल्पाचे काम करणार आहे.त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींना कुठलीही लोकवर्गणी द्यावी लागणार नाही.साधारणपणे 10 लाख लिटर्स पाणी शुद्ध करण्यासाठी 2 हजार स्क्वेअर फुट जागा लागणार आहे.गावातील सांडपाणी वाहून नेण्याच्या साठी सुद्धा मदत होणार आहे. या प्रकल्पाचा खर्च  प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी 95 टक्के निधी नाबार्ड कडून कर्ज रूपाने तर 5 टक्के निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अद्ययावत तंत्रज्ञान सहाय्य विभागाच्या अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले.
-------------Avinash Dudhawade,chakan  9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)