चाकणला 'खरेदी जत्रा'चे उत्साहात उद्घाटन


चाकणला 'खरेदी जत्रा'चे उत्साहात उद्घाटन  
खरेदीदार आणि खवय्यांची चंगळ  
चाकण:अविनाश दुधवडे चाकणला 'खरेदी जत्रा'चे शुक्रवारी (दि.10) सायंकाळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रेय भरणे यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील होते. उद्घाटन समारंभा नंतर लगेचच चाकण परिसरातील खरेदीदार आणि खवय्यांनी येथे तोबा गर्दी केली होती. या उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे, स्वआधार सामाजिक संस्थेच्या प्रणेत्या व खरेदी जत्राच्या संयोजक सुरेखाताई मोहिते ,खेड पंचायत समितीच्या सभापती कल्पना गवारी, उपसभापती सुरेश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप परदेशी, खराबवाडीच्या सरपंच योजना सोमवंशी, कडाचीवाडीच्या सरपंच वर्षा कड, नाणेकरवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई कुसाळकर , संध्या जाधव, शिवसेनेचे पांडुरंग गोरे, आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते . उद्घाटना नंतर बोलताना दतात्रेय भरणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या जत्रेने महिला बचत गटांना उर्जितावस्था मिळणार आहे. आमदार मोहिते यांनी चाकणकरांकडून पहिल्याच दिवसापासून मिळालेल्या उदंड प्रतिसादाचे कौतुक केले. सुरेखाताई मोहेते यांच्या प्रेरणेने आज (दि.10) पासून पुढील आठवडा भर या चाकण खरेदी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे . तालुक्यात प्रथमच चाकण येथील माणिक चौक भागात ही जत्रा भरवण्यात आली असून .या जत्रेमध्ये अनेक दालने आहेत. महिला बचत गटाच्या वस्तूंबरोबरच लाकडी खेळणी,उन्हाळी पदार्थ,विविध लोणची,कोल्हापुरी पद्धतीचे दागिने,विविध खाद्य पदार्थ त्याच प्रमाणे फर्निचर, होम व किचन अप्लायन्सेस, सौर उपकरणे, खादी व ग्रामोद्योग मंडळाने बनविलेल्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने, कपडे, फुटवेअर आदींचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर खेळ, मनोरंजनासह कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी विभागातील खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले आहेत . ----------- Avinash Dudhawade, chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)