लक्ष्मण दुधवडे यांना डॉ.आंबेडकर पुरस्कार
राजगुरुनगर दि. २५ (प्रतिनिधी) :
विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५५७ व्या जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने राजगुरुनगर येथे विविध धार्मिक सांस्कृतिकसामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.
खेड तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी सोसायटीच्यासांस्कृतिक भवनात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्तानेकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्वाभिमान रिपब्लिकनपक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अड.शांताराम गारगोटे, जिल्हा सरचिटणीस भास्कर तुळवे, तालुका काँग्रेसचे
अध्यक्ष विजय डोळस, भीमशक्ती संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष अनिल जाधव,आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष संतोष डोळस,खेड तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अनिल शिंदे, उपशिक्षणाधिकारी अशोक कडलक, प्रकाश रोकडे,
भिमशाहीर प्रकाश गायकवाड अनिल भांगरे, कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप गायकवाड
आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी येथील महामानव डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यास स्वाभिमान
रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे यांच्या हस्ते पुष्पहार
घालण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना स्वाभिमान रिपब्लिकन
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे म्हणाले कि, तथागत भगवान गौतम
बुद्धांचे आचार विचार आपण सर्वांनी आचरणात आणावेत. डॉ बाबासाहेब
आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करावे. धार्मिक कार्यात
सर्वांनी एकत्र येवून काम करावे. समाजाची एकजूट ही सर्वात मोठी ताकद आहे.
यासाठी सर्वांनी एकत्र यावे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे,भास्कर तुळवे, आदींची
भाषणे झाली. जयंती निमित्ताने प्रदीप गायकवाड आयोजित जयंती महोत्सव
मंडळाच्यावतीने तालुक्यातील सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रात
उल्लेखनीय काम करणा-या ११ मान्यवरांना समाजभूषण पुरस्काराने स्वाभिमान
रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे यांच्या हस्ते सन्मानित
करण्यात आले. यामध्ये भास्कर तुळवे(खालुम्ब्रे), लक्ष्मण दुधवडे (चाकण),
सदाशिव सोनवणे (शेंदुर्ली), गुलाब ओव्हाळ(दावडी), महादेव कदम(कुडे), विजय
चव्हाण(सांगुर्डी), मनोहर भालेराव(औदर), राजेंद्र गायकवाड (राजगुरुनगर),
पोपट गायकवाड( ठाकूर पिंपरी), बाळासाहेब मोरे(आसखेड), संजय देखणे
(शिरोली) यांचा समावेश आहे. तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्ताने या
कार्यक्रमानंतर तथागत भगवान बुद्ध ते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक
प्रवास हे महानाट्य बुद्धरत्न धम्म संस्कार वर्गातील नवोदित २२
कलाकारांनी सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन ढोणे, बाळासाहेब
गायकवाड, योगेश गायकवाड, किरण गायकवाड, नितेश गायकवाड आदींनी परिश्रम
घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार मिलिंद गायकवाड यांनी केले.
-----------------------------------
भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक
क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या लक्ष्मण दुधवडे यांना समाजभूषण पुरस्काराने
स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे यांच्या हस्ते
सन्मानित करण्यात आले.
-=======================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा