कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते-पाटील
सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी, शेतमजुर , व्यापारी , कामगार व युवक हे सार्वजनिक जीवनात केंद्गबिंदु मानून त्यांच्याशी जवळीक साधुन त्यांच्या
संस्कृती, त्यांची जीवनशैली, त्यांचे प्रश्न , दैनंदिन संसारातील अडीअडचणी, सुख-दुःख, सणवार, यात्रा, उत्सव, हरिनाम सप्ताह, लग्न व इतर समारंभ
या सर्व गोष्टीमध्ये न चुकता व हिरीरीने भाग घेणारे ,राजकारणातील मित्र व जेष्ठ कार्यकर्ते यांचे प्रेम जपण्याचे कामकाम अविरत पणे करणारे
खेडचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते-पाटील यांचा वाढदिवस दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा होत आहे . मात्र त्यांच्या आजवरच्या विकासात्मक कार्याविषयी तालुक्यातील जनतेला काय वाटते या विषयी.....
अविनाश दुधवडे
खेड तालुक्यातील कुठल्याही गावाची यात्रा असो, या भागातील गणेशोत्सव असो,लग्नसमारंभ असो , किंवा विविध गावांचा गावचा हरिनाम सप्ताह असो आमदार दिलीपराव मोहिते-पाटील आपल्या पक्षाचे पदाधिकारी,मित्र परिवारासह सहभागी होणारच अशी त्यांची येथे ख्याती आहे. मुस्लिम बांधवांचा ईदनिमित्त कितीही सामान्य गरीब व लहान कार्यकर्ता असला तरीही त्याच्या घरी जाऊन शिरखुर्मा खाण्यासाठी आठवणीने जाणारा नेता ,जागरण
गोंधळ, लग्नकार्य किंवा यात्रा प्रसंगी ते कार्यकर्ते आणि मित्रांच्या घरी जेवायला जाऊन सर्वांच्या सोबत हसत खेळत, गप्पा करत , रोजच्या अडीअडचणींची चर्चा करत सर्वांना आपलेसे करण्याचा आमदार मोहिते यांचा स्वभाव आहे. त्यातल्या त्यात त्यांचे मित्र मंडळीही सर्वसामान्य घरातील ,सर्व समाजातील आणि
कष्टकरी गोरगरीब थरातुनच जास्त आहेत. हे सर्व करीत असतांना आपण समाजाशी बांधील आहोत व समाजाचे देणे लागतो, त्यातुन उतराई होतांना
एखादा गरीब निराधाराचे प्रकरण असो अथवा घरकुलाचे काम असो, किंवा कसल्याही प्रकारची लागणारी मदत असो, स्वतः त्यामध्ये पाठपुरावा करून त्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न करतात. सर्वसामान्य माणसाने अडीअडणीची साधी चिठ्ठी जरी खिशात दिली
तरी पत्र रूपाने ते पाठपुरावा करून प्रशासनाच्या माध्यामातून निश्चित करणारच. राजकारणाच्या रोजच्या एवढ्या व्यापातही समाजोपयोगी शिबीरे ,
विविध सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे सामाजिक उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबवीत आहेत. सर्व गोष्टीत सामाजिक बांधीलकी ठेवुन
आमदार मोहिते यांनी कधीही राजकारण आणले नाही . त्यांच्या कडे असलेल्या विकासाच्या दूरदृष्टी मुळेच विरोधी पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्या सोबत आल्याचे तालुक्यात अनेकदा पहावयास मिळाले आहे. समाजातील विविध घटकांना त्यांच्या सामाजिक उत्साहात सहभागी होऊन त्यांना आपलेसे करणारा व लोकसंग्रहातुन लोकमान्यता मिळविणारा सर्वसामान्यांचा असामान्य नेता म्हणुन त्यांचेकडे पाहिले जात आहे असे खुद्द खेड तालुक्यातील जनतेला वाटते.
भीमाशंकर देवस्थान विषयी मोहितेंची भूमिका :
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे देवस्थान वास्तविक खेड तालुक्यामध्ये आहे. भीमाशंकर हे भोरगिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, महसुली विभाग खेड तालुकाच आहे. भीमाशंकरचे मंदिरही खेड तालुक्याच्या हद्दीतच असून, अभयारण्याचाही सत्तर टक्के भाग खेड तालुक्यात येतो. लगतच्या तालुक्यातील नेत्यांनी मात्र प्रथमपासूनच देवस्थानावर वर्चस्व ठेवून खेड तालुक्यातील प्रतिनिधींना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप आमदार मोहितेंकडून कडून केला जात आहे. देवस्थानच्या विकासासाठी येणारा निधी खेड तालुक्यामध्ये न देता तो पूर्णपणे आंबेगावच्या विकासासाठी वापरला जात असल्याने आमदार मोहिते व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. कै. आमदार नारायणराव पवार यांनीही वळसे-पाटलांविरुद्ध आवाज उठविला होता. आता मोहिते यांनीही वळसे-पाटलांविरुद्ध भूमिका घेतली आहे. कळमोडी धरणाच्या पाण्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या कळमोडी धरणाचे पाणी चासकमान धरणात आणून ते तेथून उचलून आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात नेण्यासाठी आंबेगावचे नेते प्रयत्नशील होते . मात्र, हेच पाणी खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुडे, वाफगाव परिसरासाठी नेण्यासाठी मात्र तरतूद नसल्याने मोहिते यांनी स्वपक्षीयांशी दोन हात करीत तालुक्यातील जनतेच्या भावनांचा आदर केल्याची जनभावना आहे .
म्हणून मोहितेंना कार्यकर्त्यांचे बळ :
मागील वेळी नाकारलेली उमेदवारी परत मिळवत खेडमध्ये दिलीपराव मोहिते-पाटील यांनी मोठा विजय साकार केला होता . तालुक्यातील सर्व विरोधकांना त्यांनी पुन्हा चितपट केले होते . त्यामुळे (कै.) नारायण पवार यांच्यानंतर तालुक्यावर स्वतःचा करिष्मा तयार करण्यात मोहिते आजपर्यंत यशस्वी ठरले आहेत. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप मोहिते दुसऱ्यांदा बाजीगर ठरले आहेत. धमक दाखविल्यामुळे त्यांना पुन्हा विजय मिळाला आहे. आता पुढे वाट आता सोपी आहे असे कार्यकर्त्यांना वाटते . विरोधक आता चितपट झाले आहेत. त्यामुळे पुढील सन 2014 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांची राजकीय कारकीर्द सुरक्षित राहू शकते, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे. खेड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. खेड पंचायत समिती ,बाजार समिती ताब्यात घेवून तालुक्यातील सर्व विरोधकांना त्यांनी पुन्हा चितपट केले आहे. त्यामुळे (कै.) नारायण पवार यांच्यानंतर तालुक्यावर स्वतःचा करिष्मा तयार करण्यात मोहिते यशस्वी ठरले आहेत. कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारणात यशस्वी ठरलेल्या आणि तालुक्यात विकासाची कामांची रांगोळी काढलेल्या आमदार मोहितेंनी कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न प्राधान्याने सोडविले असल्याचे सर्वश्रुत आहेच आणि त्याच मुळे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांच्या भोवती खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आमदार दिलीप मोहिते युवा मंचाच्या माध्यमातून विणले गेले आहे.
----------------------
---------------------- Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा