राज्यात सिलिग कायदा येवू देणार नाही : हर्षवर्धन पाटील

                                             
राज्यात सिलिग कायदा येवू देणार नाही : हर्षवर्धन पाटील 
कावेरी पेट्रोल पंपाचे दिमाखदार उद्घाटन 

चाकण: अविनाश दुधवडे 
 सीलिंग कायदा येणार, अशी शेतकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे मात्र सीलिंग कायदा अमलात येणार नाही आणि कॉंग्रेस सरकार कुठल्याही परिस्थिती तो अमलात आणणार नाही, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चाकण (ता. खेड) येथे दिली.  
 चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे -तळवडे रस्त्यावर महिंद्रा कंपनी समोर नव्याने सुरु करण्यात आलेल्या येथील इंडियन ऑईलच्या कावेरी पेट्रोल पंपाचे उद्घाटन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व  त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे होत्या. यावेळी इंडियन ऑईलचे मुख्य मंडल रिटेल प्रबंधक श्रीमान सुब्रतकर,प्रबंधक नरेंद्र गंगाखेडकर ,  महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई सातपुते, तालुकाध्यक्षा नंदाताई कड, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष अनंतराव कड, उद्योजक हनुमंत कड, गोविंद कड, निघोज्याचे उपसरपंच दयानंद येळवंडे, हिरामण येळवंडे , शिवाजी खराबी, खेड पंचायत समितीच्या सभापती कल्पना गवारी,कॉंग्रेस कमिटीचे संजय उभे, शांताराम गारगोटे, तालुकाध्यक्ष विजय डोळस, युवक अध्यक्ष सोमनाथ दौंडकर , दिलीप मेदगे, राजेश जवळेकर, किरण आहेर, भास्कर तुळवे, विनोद महाळुंगकर, राजेंद्र खराबी, संगीता पोटभरे, संगीता खराबी, सहाय्यक विक्रीकर आयुक्त डॉ.पंकज गायकवाड, तुकाराम येळवंडे , आदींसह परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सर्वच पदाधिकार्यांनी आपल्या भाषणात कावेरी पेट्रोल पंपाचे मालक असलेल्या कड कुटुंबियांचा गौरव केला. सर्व प्रथम दीपप्रज्वलन व फीत कापून या पेट्रोल पंपाचे औपचारिक उद्घाटन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व पत्नी त्यांच्या भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान सायंकाळी येथे खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटील, भोसरीचे आमदार विलास लांडे, मावळचे आमदार संजय-बाळा भेगडे, प्रियाताई अण्णासाहेब बनसोडे, आदिनीही येथे हजेरी लावली. 
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत कड यांनी केले , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ दौंडकर यांनी केले. 

म्हणून सपत्नीक कार्यक्रमाला ...: 
समाजात सेवेचे व्रत घेतलेली काही कुटुंबे असतात ,त्यापैकीच एक खराबवाडीचे हे कड कुटुंबीय असून, कॉंग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात या कुटुंबाचा मोठा सहभाग असतो. त्यामुळेच त्यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधाने आम्ही जोडीने प्रथमच अशा कार्यक्रमास एकत्रित आल्याचे सांगत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कड कुटुंबियांचा यावेळी गौरव केला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत उस्फुर्त दाद दिली.  
-------------
Avinash Dudhawade 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)