राजगुरुनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे शाखेचे उद्घाटन
पुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी
बँकेच्या चाकण जवळील महाळुंगे इंगळे (ता.खेड) येथील 11 व्या शाखेचा भव्य
शुभारंभ रविवारी (दि.15) सकाळी दिमाखात पार पडला. यावेळी खासदार
शिवाजीराव आढळराव पाटील ,खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, माजी आमदार
अॅड. रामभाऊ कांडगे, माजी मंत्री लीलाधर डाके, यांच्यासह बँकेचे
पदाधिकारी, सभासद, सर्वपक्षीय पदाधिकारी ,कार्यकर्ते ,परिसरातील नागरिक
मोठ्या संखेने उपस्थित होते.
महाळुंगे इंगळे येथील या 11 व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, सामान्यातील सामान्य माणूस हा
सहकारी बँकांचा खरा आधार मानून काम करणाऱ्या राजगुरुनगर बँकेने सामान्य
माणसांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण केले असून त्यामुळेच सहकार
क्षेत्रात हि बँक सर्वात वेगाने विस्तारत आहे. आमदार दिलीप मोहिते-पाटील
म्हणाले की, चाकण सारख्या भागात शेकडो बँकांनी आपले बस्तान बसविलेले
असताना राजगुरुनगर बँक आजही इतर बँकांच्या तुलनेत प्रगती पथावर आहे.
पारदर्शी कारभार आणि सर्व संचालकांची विकासात्मक दृष्टी हेच या बँकेच्या
यशाचे गमक आहे. माजी आमदार अॅड. रामभाऊ कांडगे यांनी बँकेच्या वैभवशाली
इतिहासाची पाने या वेळी उलगडली आणि बँकेच्या व सर्व तरुण संचालकांच्या
यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. माजी मंत्री लीलाधर डाके यांनीही बँकेच्या
यशस्वी वाटचालीस यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी राजगुरुनगर सहकारी
बँकेचे अध्यक्ष दीपक वारूळे , उपाध्यक्ष धनंजय कहाणे, माजी अध्यक्ष व
जेष्ठ संचालक किरण मांजरे, राजेंद्र सांडभोर, अशोक भुजबळ, किरण आहेर,
प्रताप आहेर, अॅड. मुकुंद आवटे, विजया शिंदे, हेमलता टाकळकर, राहुल
तांबे, डी के. गोरे,राजेंद्र वाळूंज, परेश खांगटे, विनायक घुमटकर, सतीश
नाईकरे , दिनेश ओसवाल, गणेश थिगळे, नंदकिशोर सोनवणे ,सरव्यवस्थापक
शांताराम वाकचौरे, सहायक सरव्यवस्थापक संजय ससाणे, यांच्यासह हिरामण
(अण्णा) सातकर , शांताराम भोसले, दतात्रेय भेगडे, विलास कातोरे, योजना
सोमवंशी , क्रांती सोमवंशी, अरुण चांभारे ,शिवाजी वर्पे, राम गावडे, जीवन
मिंडे, सुधीर वाघ, अविनाश शिवळे, आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संखेने
उपस्थित होते. सर्व प्रथम बँकेच्या एटीएम केंद्राचे उद्घाटन परम पूज्य
अनंत घोष उर्फ मौनीबाबा यांच्या हस्ते करण्यात आले,त्यानंतर दीपप्रज्वलन
करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली , व शेवटी आमदार दिलीप मोहिते
यांच्या हस्ते बँकेच्या येथील शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
बँकेचे अध्यक्ष दीपक वारूळे यांनी प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष धनंजय
कहाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आमदार मोहित्यांचे खडे बोल :
बँकेने सातत्याने नवीन तंत्रज्ञान स्वीकारत प्रगती साध्य केली व
सर्वसामान्य सभासदांबरोबर कायम निष्ठा ठेवली असे बँकेच्या यशाचे अनेक
दाखले यावेळी सर्वच मान्यवरांनी देत बँकेच्या कार्याचा गौरव केला. आमदार
मोहिते पाटील यांनीही बँकेच्या कार्याचा गौरव करताना बँकेच्या यशाच्या
वाटेवर बाधा निर्माण करणाऱ्यांना आपल्या भाषणात चांगलेच फैलावर घेतले. ते
म्हणाले की, बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालण्यासाठी काही ठराविक चार
पाच मंडळी पुढाकार घेतात. बँकेच्या कामात अशी गुंडगिरी भविष्यात शिरकाव
करणार नाही यासाठी सर्वांनी सजग राहिले पाहिजे, बँकेचे कामकाज इतक्या
वेगाने पुढे जात असताना व संचालक मंडळ निस्पृह भावनेने काम करत असताना
एखादी चूक झाल्यास त्याचा फार बाऊ करण्याची गरज काय ? असा खडा सवाल
त्यांनी यावेळी उपस्थित केला आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत
जोरदार दाद दिली.
----------------------
Avinash Dudhawade 9922457475
चाकण:अविनाश दुधवडे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा