नवव्या दिवशीही मिरवणुका व विसर्जनास गर्दी

चाकण मध्ये दोन दिवस कडेकोट बंदोबस्त 
नवव्या दिवशीही मिरवणुका व विसर्जनास गर्दी 


चाकण: अविनाश दुधवडे
  अनंतचतुर्दशी दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये राखीव दलासह, होमगार्ड व ग्रामीण दलातील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. आजच्या नवव्या दिवशी या भागातील काही सार्वजनिक मंडळांसह औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांतील गणरायाचे विसर्जन करण्यात आले, आज मंगळवारपासून बुधवारी उशिरा पर्यंत या भागात तब्बल सव्वाशे मंडळे व हजारो घरगुती गणेशाचे विसर्जन होणार असल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, पोलिसांवर प्रचंड ताण पडणार आहे.               
 चाकण व परिसरातील संकल्प प्रतिष्ठाण सह परिसरातील दहा सार्वजनिक मंडळांनी व विविध कंपन्यांतील सार्वजनिक मंडळांपैकी आज (दि.17)  नवव्या दिवशी गणेशाचे  मिरवणुकीने विसर्जन केले . आजच्या नवव्या दिवशी विसर्जनात ढोल पथकांचा चांगलाच जोर दिसला. डीजे वरील बंदीच्या पार्श्वभूमीवर उद्याही  ढोल पथकांचाच जोर पहावयास मिळणार असून याभागातील बहुतांश सार्वजनिक मंडळानी चाकण पोलिसांकडे डीजे वरील बंदी चाकण भागात एका दिवसासाठी शिथिल करण्याची जोरदार मागणी केली आहे. या भागातील बहुतांश मंडळानी सुरुवातीलाच विसर्जन मिरवणुकांसाठी डीजेचे बुकिंग केलेले आहे. गणेश मंडळांच्या या मागणी बाबत पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज मंगळवार व उद्या बुधवारी (दि.18)  याभागात चार पोलीस अधिकारी, पन्नास पोलीस कर्मचारी व तेवढेच होमगार्ड  विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर स्वत लक्ष ठेवून असणार आहेत. गणेशोत्सवाच्या सलग दहा दिवसांसह विसर्जन मिरवणुकीसाठी मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस बंदोबस्ता बाबत पोलिसांची परीक्षा पाहणारे ठरणार आहेत.                                                

---------------
Avinash Dudhawade 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)