चाकणला मुसळधार पावसाने झोडपले ...
चाकण:वार्ताहर-
दीर्घ विश्रांती नंतर चाकण परिसरात पावसाचे विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासोबतच सोमवारी पुनरागमन केलेल्या पावसाने आज (दि. 10) दुपार नंतर चाकण परिसराला चांगलेच झोडपून काढले. विजांचा कडकडात व जोरदार वाऱ्यासह बरसलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची व देखाव्यांची कामे करणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दैना झाली. पाऊस सुरु होताच देखाव्यांच्या मुर्त्या झाकण्यात आल्या ,मात्र देखावे सजावटीची कामे ठप्प झाली आहेत . सायंकाळी उशिरा पर्यंत पावसाचा जोर कायम होता .
आज अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने चाकण परिसरातील गणेश मंडळे, बाजारपेठेची अक्षरशः दाणादाण उडवली. दीर्घ विश्रांती नंतर परतलेल्या पूर्वा नक्षत्रातील पावसाने दिलासा मिळत असला तरी गणेशोत्सवातील देखाव्यांच्या सजावटी दरम्यान येत असलेल्या धुवाधार पावसाने मंडप, डेकोरेशन, मूर्ती, पताका आदी सजावटीचे साहित्य ओले व खराब होत असल्याच्या तक्रारी मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी करीत आहेत.
-----------------
फोटो मेल करीत आहे
फोटो ओळ: चाकण परिसरात मंगळवारी दुपार नंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच दैना केली. (छाया:अविनाश दुधवडे,चाकण)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा