खेड तालुक्यातील पंधरा जणांना 'गणराया अवार्ड' प्रदान

खेड तालुक्यातील पंधरा जणांना 'गणराया अवार्ड'  प्रदान 

चाकण : वार्ताहर 
 खेड पंचायत समितीचे आदर्श सदस्य अॅड.सोमनाथ दौंडकर व महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा नंदाताई प्रतापराव खांडेभराड यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व मोलाचे योगदान देणाऱ्या  खेड तालुक्यातील पंधरा जणांना  'गणराया अवार्ड' देवून चाकण येथील मानाच्या नवयुग मित्र मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.  यंदाच्या वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अनोखा उपक्रम या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरु केला असून प्रत्येक वर्षी असे पुरस्कार देण्यात येणार आहेत . 
   यंदाच्या वर्षी तालुक्यातील पंधरा जणांना हा पुरस्कार सोमवारी (दि.9) प्रदान करण्यात आला. हे अवार्ड यंदाच्या वर्षी खेड पंचायत समितीचे आदर्श सदस्य व युवा कार्यकर्ते अॅड. सोमनाथ दौंडकर ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अविनाश अरगडे, सामाजवादी कार्यकर्ते मामासाहेब शिंदे, आरटीआय कार्यकर्ते विलास बारवकर ,उद्योजक योगेश झगडे, प्रा.किशोर गोरे, युवा कार्यकर्ते रामदास जाधव , सरफराज सिकीलकर, बी.एम.आवटे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा नंदाताई प्रतापराव खांडेभराड, रोहिणी देशमुख, कुस्तीपटू प्रियांका अल्हाट,  चंद्रकांत हिवरकर, सतीशमहाराज बोराटे व खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे, आदींना देण्यात आला. यावेळी चाकण ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम परदेशी, माजी सभापती धनंजय कदम,  नवयुग मंडळाचे मंगेश कांडगे , योगेश गायकवाड , राजेंद्र राऊत ,गोविंद राऊत , नंदकुमार वाव्हळ, निलेश गायकवाड , श्रीकांत वाडेकर, पत्रकार ए.पी.शेख, वसंत राऊत , किसन कदम, अतुल कदम, नितीन जगताप ,अमर शिंदे, शेखर घोगरे,उमेश राऊत ,सम्राट राऊत ,सचिन भोई, रोहन धाडगे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.  
------------------

फोटो : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व मोलाचे योगदान देणाऱ्या खेड तालुक्यातील पंधरा जणांना  'गणराया अवार्ड' प्रदान करण्यात आले . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)