चाकण मध्ये गणेश मूर्तींना यंदा अधिक मागणी
गणेशोत्सवाची चाहूल ; मूर्ती बाजारात दाखल
फोटो : चाकणच्या बाजारात दाखल झालेल्या आकर्षक मूर्ती गणेश भक्ताचे लक्ष वेधून घेत आहेत.
चाकण : अविनाश दुधवडे
आगामी गणेशोत्सवासाठी चाकण शहरातील बाजारपेठेमध्ये गणेशमूर्तींचे आगमन झाले आहे. 'माय फ्रेंड गणेशा'पासून ते कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा... श्रीमंत दगडूशेठ हलवाई ..या मूर्तींबरोबरच विविध नामांकित मंडळांच्या मूर्तीही बाजारात दाखल झाल्या आहेत. सर्वच मूर्तींना यंदाच्या गणेशोत्सवात मागणी वाढली असून, यंदा मूर्तींच्या दरातही जवळपास वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही घरगुती गणेश भक्तांसह विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नसल्याचा अनुभव मूर्तिकार व मूर्ती विक्रेती मंडळी घेत आहेत.
चाकण येथील बाजारात सम्राट गणेश-मूर्ती, शंख छोटा, शंख मोठा, दगडूशेठ मोठा, दगडूशेठ नक्षी, उंदरावर आरुढ झालेली मूर्ती, मयुरासन, डबल लोड, पेशवा लहान, पेशवा मोठा, म्हैसूर, कोल्हापूर सिंहासन, प्रभावळ, मांडी घातलेली मूर्ती अशा विविध आकारातील गणेशमूर्ती आहेत.
मूर्तीसाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, भुसा आदी साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याने साहाजिकच मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. चाकण शहरात 50 ते 100 रुपयांपासून पुढे हजारो रुपयांपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस चांगला झाला असल्याने भरपूर मुर्त्यांचे बुकिंग होत असून सर्वांचाच उत्साह अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
इको फ्रेंडली गणेश मूर्तींही बाजारात :
पर्यावरणाला पोषक असलेल्या कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तीही विक्रीसाठी चाकणच्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. यंदा या मूर्तींचे लवकर
आणी मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. दगडूशेठ हलवाई ,लालबागचा राजा अशा विविध रूपांतील पेन व हम्ब्रापूरच्या लहान मोठ्या मूर्त्या चाकण येथील बालवीर मित्र मंडळाने गणेश भक्तांसाठी यंदाही उपलब्ध केल्या असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते प्रा.संजय वाडेकर, भरत हुलावळे, संजय परदेशी, प्रसाद सोनवणे, भानुदास गारगोटे आदींनी सांगितले .
-----------
Avinash Dudhawade ,chakan 9922457475

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा