....म्हणून महापौर पदापर्यंत पोहचता आले : वैशाली बनकर 

चाकण: 
 आधुनिक भारतातील एक जहाल सुधारक व आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोलाचे आहे समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय ‍इतिहासातले जोतीराव फुले  व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य असून त्यांच्या त्याच क्रांती मुळे महापौर अशा मानाच्या पदापर्यंत पोहचता आले असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेच्या महापौर वैशाली बनकर यांनी आज (दि.28) चाकण येथे केले.
  चाकण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने मार्फत दत्तक घेण्यात आलेल्या 346 मुलींना मोफत
शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ,त्या प्रसंगी महापौर बनकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेशभाऊ गोरे
होते. या वेळी चाकण चे उपसरपंच प्रीतम परदेशी, माजी सरपंच उषा साळुंके , महिला कॉंग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षा मंगल शेवकरी , ज्योती फुलवरे, सुन्नाबी सिकीलकर, संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश कांडगे,नितीन गोरे ,प्रकाश भुजबळ ,अशोक जाधव, सचिव अनिल धाडगे, जहीर शेख, अस्लमभाई सिकीलकर,समीर सिकीलकर, राम गोरे, रामदास जाधव, निलेश गायकवाड, निघोजेच्या सरपंच कांचन शिंदे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक करताना सुरेश गोरे म्हणाले की, उपेक्षित स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि अनिष्ठ रूढी विरोधात अखंड संघर्ष करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आज समाजासाठी खूप मार्गदर्शक आहेत. मुलींच्या घटत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की,  गंभीर प्रकारा बाबत सर्वांगीण चर्चा होऊन प्रत्येकानं या बाबत सजग होणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन भगवान कांडगे यांनी केले.
------------------

फोटो  : चाकण पतसंस्थेच्या वतीने सलग बाविसाव्या वर्षी दत्तक घेण्यात आलेल्या 346 मुलींना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
अविनाश दुधवडे,चाकण  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)