चोरट्यांकडून एटीएम केली जाताहेत टार्गेट
चोरट्यांकडून एटीएम केली जाताहेत टार्गेट
खालुंब्रे (ता.खेड) येथे या अज्ञात चोरट्यांनी एटीएमसह लगतच्या दोन तीन दुकानांची शटर उचकटली , पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र या बाबत पोलिसांत कुणीही तक्रार न दिल्याने या बाबत कुणावरही गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याचे चाकण पोलिसांनी स्पष्ट केले . एक्सेस बँकेच्या एटीएम केंद्राचे शटर उचकटल्या नंतर जागे झालेल्या सुरक्षा रक्षकांमुळे चोरट्यांनी येथून पोबारा केल्याचे सांगण्यात आले. एटीएम फोडण्याचा प्रयत्न होऊनही संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार न देता हा प्रकार तसाच दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला. बँका या बाबतच्या तक्रारी देण्यास बऱ्याचदा टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे.
त्यांच्या कारवायाच बोलतात...
चोरट्यांसाठी एनी टाइम मनी ठरू लागलेली एटीएम चाकण मध्ये अनेकदा फोडण्याचे प्रयत्न झाले आहेत. चाकण तळेगाव रस्त्या लगत बँक ऑफ महाराष्ट्रचे महाळुंगे (ता.खेड) गावाच्या हद्दीतील नोव्हेंबर 2012 मध्ये पहाटेच्या अंधारात एटीएम फोडण्यात आले होते. या एटीएम मधून चोरट्यांनी 3 लाख 22 हजार 500 रुपयांची रक्कम लांबविली होत्ती. जुलै 2010 एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने चार चोरट्यांच्या टोळीने रात्री दीड ते पहाटे चार या वेळेत चाकण, शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि थेऊर येथे धुमाकूळ घातला होता. त्यावेळी येथे देना बॅंकेचे एटीएम फोडण्याचा जबरी प्रयत्न झाला होता. तदनंतर पुणे- नाशिक महामार्गावरील आळंदी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल गंधर्वच्या समोरिल आयसीआयसीआय या बॅँकेचे एटीएम मशीन मंगळवारी (ता.28) रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. सुरवातील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी न झाल्याने चोरट्यांनी चक्क मशीनच उचलूनच नेले. तीन महिन्यांपूर्वी जून 2013 चाकण शिक्रापूर रस्त्यावर विशाल गार्डनच्या समोरील इमारतीतील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास केला होता . एटीएम सेंटरच्या दरवाज्याच्या बिजागऱ्या कापून दरवाजा उघडीत चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला, व सीसीटीव्हीच्या वायरी कापून टाकल्या होत्या. सलग दोन दिवस असा प्रकार करण्यात आला मात्र प्रत्यक्ष पैसे काढण्यात ते अयशस्वी झाले होते. सर्वात धक्कादायक प्रकार चाकण येथे मध्यवस्तीत एप्रिल 2010 मध्ये घडला होता. धारदार घातक शस्त्रांनी सुरक्षारक्षकाला गंभीर जखमी करून चाकण येथील माणिक चौकातील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न अज्ञात दरोडेखोराने पहाटे च्या सुमारास केला होता . मात्र यंत्र न फुटल्याने हात हलवतच दरोडेखोरांना तेथून निघून जावे लागले होते. मात्र बँक रस्त्याच्या कडेला असतानाही सुरक्षारक्षकाला कोणतीही मदत मिळू न शकल्याने जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात त्यांना तब्बल पाच तास एकाच जागेवर पडून राहावे लागले होते . नंतर उपचारां दरम्यान या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता.
---------------
Avinash Dudhawade ,chakan 9922457475
चाकण : अविनाश दुधवडे
चाकण परीरातील विविध बँकांच्या एटीएम वर चोरट्यांची नजर असल्याची स्थिती गेल्या काही काळात समोर आली असून आज (दि.23) पहाटेच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावरील खालुंब्रे (ता.खेड) येथील एक्सेस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. या एटीएम मधील पैसे काढण्यात चोरट्यांना यश आले नाही मात्र सगळीच एटीएम चोरट्यांनी रडारवर घेतल्याची स्थिती निर्माण झाली असून एटीएम मधून पैसे काढणारे सामान्य नागरिक किंवा थेट विविध ठिकाणी असणारी ही एटीएम मशीन चोरट्यांची टार्गेट होऊ लागली आहेत.खालुंब्रे (ता.खेड) येथे या अज्ञात चोरट्यांनी एटीएमसह लगतच्या दोन तीन दुकानांची शटर उचकटली , पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र या बाबत पोलिसांत कुणीही तक्रार न दिल्याने या बाबत कुणावरही गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याचे चाकण पोलिसांनी स्पष्ट केले . एक्सेस बँकेच्या एटीएम केंद्राचे शटर उचकटल्या नंतर जागे झालेल्या सुरक्षा रक्षकांमुळे चोरट्यांनी येथून पोबारा केल्याचे सांगण्यात आले. एटीएम फोडण्याचा प्रयत्न होऊनही संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार न देता हा प्रकार तसाच दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला. बँका या बाबतच्या तक्रारी देण्यास बऱ्याचदा टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे.
त्यांच्या कारवायाच बोलतात...
चोरट्यांसाठी एनी टाइम मनी ठरू लागलेली एटीएम चाकण मध्ये अनेकदा फोडण्याचे प्रयत्न झाले आहेत. चाकण तळेगाव रस्त्या लगत बँक ऑफ महाराष्ट्रचे महाळुंगे (ता.खेड) गावाच्या हद्दीतील नोव्हेंबर 2012 मध्ये पहाटेच्या अंधारात एटीएम फोडण्यात आले होते. या एटीएम मधून चोरट्यांनी 3 लाख 22 हजार 500 रुपयांची रक्कम लांबविली होत्ती. जुलै 2010 एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने चार चोरट्यांच्या टोळीने रात्री दीड ते पहाटे चार या वेळेत चाकण, शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि थेऊर येथे धुमाकूळ घातला होता. त्यावेळी येथे देना बॅंकेचे एटीएम फोडण्याचा जबरी प्रयत्न झाला होता. तदनंतर पुणे- नाशिक महामार्गावरील आळंदी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल गंधर्वच्या समोरिल आयसीआयसीआय या बॅँकेचे एटीएम मशीन मंगळवारी (ता.28) रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. सुरवातील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी न झाल्याने चोरट्यांनी चक्क मशीनच उचलूनच नेले. तीन महिन्यांपूर्वी जून 2013 चाकण शिक्रापूर रस्त्यावर विशाल गार्डनच्या समोरील इमारतीतील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास केला होता . एटीएम सेंटरच्या दरवाज्याच्या बिजागऱ्या कापून दरवाजा उघडीत चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला, व सीसीटीव्हीच्या वायरी कापून टाकल्या होत्या. सलग दोन दिवस असा प्रकार करण्यात आला मात्र प्रत्यक्ष पैसे काढण्यात ते अयशस्वी झाले होते. सर्वात धक्कादायक प्रकार चाकण येथे मध्यवस्तीत एप्रिल 2010 मध्ये घडला होता. धारदार घातक शस्त्रांनी सुरक्षारक्षकाला गंभीर जखमी करून चाकण येथील माणिक चौकातील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न अज्ञात दरोडेखोराने पहाटे च्या सुमारास केला होता . मात्र यंत्र न फुटल्याने हात हलवतच दरोडेखोरांना तेथून निघून जावे लागले होते. मात्र बँक रस्त्याच्या कडेला असतानाही सुरक्षारक्षकाला कोणतीही मदत मिळू न शकल्याने जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात त्यांना तब्बल पाच तास एकाच जागेवर पडून राहावे लागले होते . नंतर उपचारां दरम्यान या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता.
---------------
Avinash Dudhawade ,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा