बजाजच्या कामगारांचा कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव
कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप
चाकण:वार्ताहर
बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांच्या काम बंद आंदोलनाला तब्बल महिना लोटला असून, व्यवस्थापनाकडून कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत संतप्त कामगारांनी मंगळवारी कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव घातला . सकाळी अकरा वाजले पासून तब्बल 900 कामगार या कार्यालया समोर ठाण मांडून होते.
बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांनी गेल्या सुमारे छत्तीस दिवसांपासून (दि.25 जून ) सुमारे एक हजार कामगारांनी 'काम बंद' आंदोलन सुरु केले असून , कामगारांना शेअर्स मिळावेत, 14 कामगारांची सुरु असलेली चौकशी थांबवावी ,बडतर्फी, चौकशी, बदल्यांची कारवाई , मागे घेण्यात यावी ,कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे समान वेतन मिळावे , वेतनवाढ करार करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तर बजाज व्यवस्थापनाने हे आंदोलन बेकायदा ठरविण्याची मागणी केली आहे. कामगार आणि व्यवस्थापन आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत.
याबाबत मार्ग काढण्यासाठी मंगळवारी कामगार आयुक्त कार्यालयात कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात चर्चा होणार होती,मात्र कामगार आयुक्त कार्यालया समोर जमलेल्या या शेकडो कामगारांचा रुद्रावतार पाहून व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी या कार्यालयाबाहेर येवून तेथूनच पळ काढला. सोमवारी (दि.29) कामगार संघटनेने कामगार आयुक्तांना बजाज कंपनीची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार कामगार कार्यालयातील सहा अधिकाऱ्यांचे मंडळ पाहणी साठी पाठवीले होते. कामगार आयुक्त रत्नदीप हेंद्रे नी बजाज कंपनीत दररोज पाहणी करण्यात येणार असल्याचे मान्यही केल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या घेराव मोर्चाचे वेळी यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीसाठी विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, दत्ताजी येळवंडे , मारुती जगदाळे, संतोष रांजणे श्रमिक एकता महासंघाचे उपाध्यक्ष अविनाश वाडेकर आदी उपस्थित होते.
--------
फोटो : बजाज व्यवस्थापनाकडून कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत संतप्त कामगारांनी मंगळवारी कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव घातला.(छाया:अविनाश दुधवडे,चाकण)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा