पुणे जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

पुणे जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना 
इंदापुरात भटक्या विमुक्त महिलेला विवस्त्र करून विजेचे शॉक

चाकण: अविनाश दुधवडे 
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना चक्क भारतीय स्वातंत्र दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनी घडली आहे. भटक्या विमुक्त जातीतील एका  महिलेला विवस्त्र करून तब्बल सहा तास मारहाण करून विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेला विवस्त्र करून तब्बल सहा तास मारहाण प्रकरणी इंदापूर पोलिसांनी मात्र सुरुवातीला हा गुन्हा अदखलपात्र नोंद करून त्या महिलेच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार केला होता  . मात्र या बाबत वाढता जनक्षोभ व घटनेचे गांभीर्य पाहून नंतर 
गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. 
 पिडीत महिला विशाखा दादा शिंदे (वय 32,रा.शेळगाव ,ता.इंदापूर,जि.पुणे ) यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार बाळू शेलार व त्याची पत्नी मोनाली शेलार (दोघे रा. कदम वस्ती इंदापूर,जि.पुणे) यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 307, 324,354, 341,342,504 अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे.
  या बाबत चे वृत्त असे कि, इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडीत चोरीच्या संशयावरुन विशाखा शिंदे या भटक्या विमुक्त जमातीच्या  महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न गुरुवारी झाला होता . लाखेवाडीतल्या भवानी देवीच्या यात्रेत काही महिलांची मंगळसूत्रं चोरीला गेली होती. भटक्या विमुक्त जमातीची असल्याने याच महिलेवर चोरीचा आळ घेऊन ही मारहाण करण्यात आली.  राजवडी भागातील कदम वस्तीत ती जवळच्या वस्तू विकण्यासाठी आली असतांना या घटनेतील आरोपी बाळू शेलारच्या पत्नीने तिच्याकडून वस्तू विकत घेतल्या. याच दरम्यान या महिलेनं लहान मुलाच्या हातातील सोन्याचा दागिना चोरल्याचा संशय घेऊन, बाळू शेलारच्या पत्नीने तिला प्रथम जबर मारहाण केली. नंतर तिला सराटी गावच्या देवस्थान पंचसमितीनं ताब्यात घेतलं. आणि झडती घेण्याच्या बहाण्यानं तिला विवस्त्र केले. तरीही दागिना मिळत नसल्यानं महिला पुरुषांच्या जमावाने तिला चक्क विजेचा शॉक दिला.  विवस्त्र करून तब्बल सहा तास या महिलेला मारहाण करून विजेचा शॉक दिणे हे सर्व अमानुष कृत्य भारतीय स्वातंत्र दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनी सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत म्हणजेच तब्बल 6 तास सुरु होतं.
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून या महिलेच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार केला होता. मात्र या बाबत वाढता जनक्षोभ व घटनेचे गांभीर्य पाहून नंतर  गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. काही बड्या राजकारण्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीत खुद्द एका जिल्हा परिषद सदस्याचाही समावेश असल्याची चर्चा असून  पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी सुद्धा केला आहे. या निंदनीय घटनेचा निषेध करून आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे ,इंदापूर तालुक्यातील आरपीआयचे शिवाजी मखरे विक्रम शेलार  , खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेचे लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) , सिद्धार्थ गोतारणे,  यांनी दिला आहे.
--------
Avinash Dudhawade ,chakan 9922457475  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)