चाकण आळंदी घाटाचा हिरवा थाट

                                                                     
                        

चाकण आळंदी घाटाचा हिरवा थाट

चाकण : यंदा वरूण राजाने सुरूवातीपासुनच जोरदार सुरवात केल्याने या भागात दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसलेल्या चाकण आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या जंगलात आता हिरवाई पसरली असल्याने मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाल्याचे दिसत आहे. मागच्या वर्षी याच दिवसांत पावसाने सतत हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण हैराण झाले होत आणि शेवटी खेड तालुक्यात टंचाई सदृश्य तर अन्य भागात दुष्काळात लोटल्या गेल्याचे दिसुन आले होते . पाण्याअभावी चाकण आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीतील सर्वच झाडे वाळून गेली होती. या तील काही झाडे तर चक्क किटकांनी पोखरण्यास सुरुवात केली होती. वाळून गेलेल्या झाडांमध्ये जंगली झाडांसोबतच लिंब, वड, पिंपळ आदी बहुउपयोगी झाडांचाही समावेश होता. सर्वच झाडे निष्पर्ण झाल्याने पहिल्यांदाच उन्हाळ्याची दाहकता या भागात प्रकर्षाने जाणवली होती . त्यातच वणव्यांमुळे डोंगर काळेकुट्ट व भकास झाले होते . मात्र यंदा वरूण राजाने सुरूवातीपासुनच जोरदार सुरवात केल्याने अनेक भागातील नद्या आणि नाले भरून वाहत आहेत. काही दिवसांपूर्वी सुकलेला , आग लावल्याने काळ्या पडलेल्या या वनविभाग जंगल परीसरातील लहान मोठ्या झाडांनी देखील वरूण राजाच्या कृपादृष्टी मुळे मरगळ झटकली असल्याचे दिसुन येत असुन ही झाडे देखील खुलून दिसत आहेत . जणू या वर्षीचा पावसाळा जोरदार राहील असेच सूचित करीत आहेत. -------------- फोटो: चाकण आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीतील जंगल परिसर असा खुलून दिसत आहे. (छाया:अविनाश दुधवडे,चाकण)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)