चाकण मध्ये गणेश मूर्तींना यंदा अधिक मागणी गणेशोत्सवाची चाहूल ; मूर्ती बाजारात दाखल फोटो : चाकणच्या बाजारात दाखल झालेल्या आकर्षक मूर्ती गणेश भक्ताचे लक्ष वेधून घेत आहेत. चाकण : अविनाश दुधवडे आगामी गणेशोत्सवासाठी चाकण शहरातील बाजारपेठेमध्ये गणेशमूर्तींचे आगमन झाले आहे. 'माय फ्रेंड गणेशा'पासून ते कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा... श्रीमंत दगडूशेठ हलवाई ..या मूर्तींबरोबरच विविध नामांकित मंडळांच्या मूर्तीही बाजारात दाखल झाल्या आहेत. सर्वच मूर्तींना यंदाच्या गणेशोत्सवात मागणी वाढली असून, यंदा मूर्तींच्या दरातही जवळपास वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही घरगुती गणेश भक्तांसह विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नसल्याचा अनुभव मूर्तिकार व मूर्ती विक्रेती मंडळी घेत आहेत. चाकण येथील बाजारात सम्राट गणेश-मूर्ती, शंख छोटा, शंख मोठा, दगडूशेठ मोठा, दगडूशेठ नक्षी, उंदरावर आरुढ झालेली मूर्ती, मयुरासन, डबल लोड, पेशवा लहान, पेशवा मोठा, म्हैसूर, कोल्हापूर सिंहासन, प्रभावळ, मांडी घातलेली मूर्ती अशा विविध आकारातील गणेशमूर्
पोस्ट्स
ऑगस्ट, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
चोरट्यांकडून एटीएम केली जाताहेत टार्गेट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चोरट्यांकडून एटीएम केली जाताहेत टार्गेट चाकण : अविनाश दुधवडे चाकण परीरातील विविध बँकांच्या एटीएम वर चोरट्यांची नजर असल्याची स्थिती गेल्या काही काळात समोर आली असून आज (दि.23) पहाटेच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावरील खालुंब्रे (ता.खेड) येथील एक्सेस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. या एटीएम मधील पैसे काढण्यात चोरट्यांना यश आले नाही मात्र सगळीच एटीएम चोरट्यांनी रडारवर घेतल्याची स्थिती निर्माण झाली असून एटीएम मधून पैसे काढणारे सामान्य नागरिक किंवा थेट विविध ठिकाणी असणारी ही एटीएम मशीन चोरट्यांची टार्गेट होऊ लागली आहेत. खालुंब्रे (ता.खेड) येथे या अज्ञात चोरट्यांनी एटीएमसह लगतच्या दोन तीन दुकानांची शटर उचकटली , पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र या बाबत पोलिसांत कुणीही तक्रार न दिल्याने या बाबत कुणावरही गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याचे चाकण पोलिसांनी स्पष्ट केले . एक्सेस बँकेच्या एटीएम केंद्राचे शटर उचकटल्या नंतर जागे झालेल्या सुरक्षा रक्षकांमुळे चोरट्यांनी येथून पोबारा केल्याचे सांगण्यात आले. एटीएम फोडण्याचा प्रयत्न होऊनही संबंधित बँकेच्या अधिकाऱ्या
पुणे जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुणे जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना इंदापुरात भटक्या विमुक्त महिलेला विवस्त्र करून विजेचे शॉक चाकण: अविनाश दुधवडे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना चक्क भारतीय स्वातंत्र दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनी घडली आहे. भटक्या विमुक्त जातीतील एका महिलेला विवस्त्र करून तब्बल सहा तास मारहाण करून विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेला विवस्त्र करून तब्बल सहा तास मारहाण प्रकरणी इंदापूर पोलिसांनी मात्र सुरुवातीला हा गुन्हा अदखलपात्र नोंद करून त्या महिलेच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार केला होता . मात्र या बाबत वाढता जनक्षोभ व घटनेचे गांभीर्य पाहून नंतर गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. पिडीत महिला विशाखा दादा शिंदे (वय 32,रा.शेळगाव ,ता.इंदापूर,जि.पुणे ) यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार बाळू शेलार व त्याची पत्नी मोनाली शेलार (दोघे रा. कदम वस्ती इंदापूर,जि.पुणे) यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 307, 324,354, 341,342,504 अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे. या बाबत
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर ....
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर .............. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दोन गोळ्या झाडून हत्या केली.... या भ्याड हल्ल्याचा निषेध निषेध निषेध ..... डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अशा निर्घुण हत्येने महाराष्ट्राला शंभर वर्षे मागे नेले आहे ,कारण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले आहेत, म्हणूनच अंधश्रध्देबाबत कोणतीही घटना महाराष्ट्रात घडली, की 'आता कुठे आहेत तुमचे दाभोळकर?' अशी विचारणा होते. खरे तर, 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती याबाबत काय करतं आहे?' असा प्रश्न लोकांना विचारायचा असतो. लोकांनी अशा प्रकारे दाभोळकरांचे नाव अंधश्रध्दा निर्मूलनाशी जोडणे, ही त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्याची पावती नव्हे का? दाभोळकरांचा मूळ पिंड हा अस्सल कार्यकर्त्यांचा. ते तरूण वय
नवीन वीज मीटर ठरताहेत ग्राहकांसाठी डोकेदुखी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नवीन वीज मीटर ठरताहेत ग्राहकांसाठी डोकेदुखी पाच ते सात हजारांची अनेकांना देयके चाकण परिसरासह खेड तालुक्यात आणि राज्यभरात वीज वितरण कंपनीकडून जुने विद्युत मीटर बदलवून नवीन मीटर बसविण्यात आले आहेत ; परंतु नवीन मीटरचा वेग अधिक असल्याने ग्राहकांना आगाऊ रकमेचे देयके (बिल) मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिन्याला दोनशे ते चारशे रुपये वीज देयक येणाऱ्या ग्राहकांना चक्क पाच ते सात हजार रुपयांची देयक येवू लागली असून ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. वीज वितरण कंपनीने जुने मीटर बदलण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी हाती घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत महावितरणने दहा वर्षे व त्याहून अधिक काळापासून सेवेत असलेले सर्व जुने इलेक्ट्रो मेकॅनिकल मीटर काढून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक स्टॅटिक मीटर(आय.आर) बसविण्याचे नियोजन केले व त्याबाबतची कार्यवाही केली. दोन तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले मीटरही यात बदलण्यात आले. त्यामुळे मीटरमधून होणा-या वीज विक्रीचे प्रमाण निश्चितच वाढेल , असा वीज वितरणचा विश्वास होता. झालेही तसेच मात्र हे मीटर फारच सेन्सिटिव्ह असल्याने घरातील जुन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
....म्हणून महापौर पदापर्यंत पोहचता आले : वैशाली बनकर चाकण: आधुनिक भारतातील एक जहाल सुधारक व आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोलाचे आहे समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातले जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य असून त्यांच्या त्याच क्रांती मुळे महापौर अशा मानाच्या पदापर्यंत पोहचता आले असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेच्या महापौर वैशाली बनकर यांनी आज (दि.28) चाकण येथे केले. चाकण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने मार्फत दत्तक घेण्यात आलेल्या 346 मुलींना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ,त्या प्रसंगी महापौर बनकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेशभाऊ गोरे होते. या वेळी चाकण चे उपसरपंच प्रीतम परदेशी, माजी सरपंच उषा साळुंके , महिला कॉंग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षा मंगल शेवकरी , ज्योती फुलवरे, सुन्नाबी सिकीलकर, संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश कांडगे,नितीन गोरे ,प्रकाश भुजबळ ,अशोक जाधव, सचि
चाकण आळंदी घाटाचा हिरवा थाट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चाकण आळंदी घाटाचा हिरवा थाट चाकण : यंदा वरूण राजाने सुरूवातीपासुनच जोरदार सुरवात केल्याने या भागात दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसलेल्या चाकण आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या जंगलात आता हिरवाई पसरली असल्याने मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाल्याचे दिसत आहे. मागच्या वर्षी याच दिवसांत पावसाने सतत हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण हैराण झाले होत आणि शेवटी खेड तालुक्यात टंचाई सदृश्य तर अन्य भागात दुष्काळात लोटल्या गेल्याचे दिसुन आले होते . पाण्याअभावी चाकण आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीतील सर्वच झाडे वाळून गेली होती. या तील काही झाडे तर चक्क किटकांनी पोखरण्यास सुरुवात केली होती. वाळून गेलेल्या झाडांमध्ये जंगली झाडांसोबतच लिंब, वड, पिंपळ आदी बहुउपयोगी झाडांचाही समावेश होता. सर्वच झाडे निष्पर्ण झाल्याने पहिल्यांदाच उन्हाळ्याची दाहकता या भागात प्रकर्षाने जाणवली होती . त्यातच वणव्यांमुळे डोंगर काळेकुट्ट व भकास झाले होते . मात्र यंदा वरूण राजाने सुरूवातीपासुनच जोरदार सुरवात केल्याने अनेक
बजाजच्या कामगारांचा कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बजाजच्या कामगारांचा कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप चाकण:वार्ताहर बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांच्या काम बंद आंदोलनाला तब्बल महिना लोटला असून, व्यवस्थापनाकडून कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत संतप्त कामगारांनी मंगळवारी कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव घातला . सकाळी अकरा वाजले पासून तब्बल 900 कामगार या कार्यालया समोर ठाण मांडून होते. बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांनी गेल्या सुमारे छत्तीस दिवसांपासून (दि.25 जून ) सुमारे एक हजार कामगारांनी 'काम बंद' आंदोलन सुरु केले असून , कामगारांना शेअर्स मिळावेत, 14 कामगारांची सुरु असलेली चौकशी थांबवावी ,बडतर्फी, चौकशी, बदल्यांची कारवाई , मागे घेण्यात यावी ,कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे समान वेतन मिळावे , वेतनवाढ करार करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तर बजाज व्यवस्थापनाने हे आंदोलन बेकायदा ठरविण्याची मागणी केली आहे. कामगार आणि व्यवस्थापन आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. याबाबत मार्ग काढण्यासाठी मंगळवारी कामगार आयुक्त कार्यालयात कंपनी व्यवस्थापन व काम
खराबवाडी ग्रामपंचायत बरखास्तीला स्थगिती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खराबवाडी ग्रामपंचायत बरखास्तीला स्थगिती ग्रामविकास मंत्र्यांचा निर्णय ; कार्यकारी मंडळाला दिलासा चाकण:वार्ताहर - शासकीय गायरान जागेतील अतिक्रमणे काढणे व नवीन अतिक्रमणे रोखण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून कर्तव्य पार पाडण्यास असर्मथ असल्याचा ठपका ठेवीत खराबवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व 11 सदस्यांना पदावरून काढून टाकण्याच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाला राज्य शासनाच्या पंचायत राज विभागाने स्थगिती दिली आहे. अपात्र आदेशाला स्थगिती मिळाल्याने खराबवाडी परिसरातून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या या विभागाच्या अधिकारी अर्चना वालझाडे यांनी या बाबतची पत्रे (क्रमांक -व्हीपीएम-2013/ प्र.क्र.96/ संग्राम कक्ष) विभागीय आयुक्त व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविली आहेत. या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि, ग्रामपंचायत अधिनियम 1957 चे कलम 39 (1) अन्वये या अतिक्रमणा बाबत सरपंच ,उपसरपंच यांना पदावरून काढून टाकण्याबाबत याच ग्रामपंचायतीच्या महिला सदस्येच्या पतीने विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. त्यानुसार गायरान जागेतील अति