पोस्ट्स

मे, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते-पाटील

इमेज
सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी, शेतमजुर , व्यापारी , कामगार व युवक हे सार्वजनिक जीवनात केंद्गबिंदु मानून त्यांच्याशी जवळीक साधुन त्यांच्या संस्कृती, त्यांची जीवनशैली, त्यांचे प्रश्न , दैनंदिन संसारातील अडीअडचणी, सुख-दुःख, सणवार, यात्रा, उत्सव, हरिनाम सप्ताह, लग्न व इतर समारंभ  या सर्व गोष्टीमध्ये  न चुकता व हिरीरीने भाग घेणारे ,राजकारणातील मित्र व जेष्ठ कार्यकर्ते यांचे प्रेम जपण्याचे कामकाम अविरत पणे करणारे  खेडचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते-पाटील यांचा वाढदिवस दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा होत आहे . मात्र त्यांच्या आजवरच्या विकासात्मक कार्याविषयी तालुक्यातील जनतेला काय वाटते या विषयी..... अविनाश दुधवडे     खे ड तालुक्यातील कुठल्याही गावाची यात्रा असो, या भागातील  गणेशोत्सव असो,लग्नसमारंभ असो , किंवा विविध गावांचा  गावचा हरिनाम सप्ताह असो आमदार दिलीपराव  मोहिते-पाटील आपल्या पक्षाचे पदाधिकारी,मित्र परिवारासह  सहभागी होणारच अशी त्यांची येथे ख्याती आहे. मुस्लिम बांधवांचा ईदनिमित्त कितीही सामान्य गरीब व लहान कार्यकर्ता असला तरीही त्याच्या घरी जाऊन शि

वाळणाऱ्या फळबागां मुळे कोट्यवधीचे नुकसान

इमेज
वाळणाऱ्या फळबागां मुळे कोट्यवधीचे नुकसान फळबागांचे होतेय मातेरे ;आणेवारीची थट्टा चाकण: अविनाश दुधवडे  पा ऊस अवर्षण व दुष्काळाचा जबरदस्त फटका चाकण पंचक्रोशीतील व तालुक्यातील फळबागांनाही बसला आहे. शासनाच्या प्रचलित नियमानुसार ज्या गावाची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असेल त्या भागातील फळबाग शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळत नाही. मात्र खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावच्या एका भागात पाणी तर दुसऱ्या भागात ठणठणाट अशी स्थिती असल्याने अनेक शेतकऱ्यांना टँकर व डोक्यावरून पाण्याचे हांडे वाहून फळबागा जगविण्याची वेळ आली आहे.त्यामुळे तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना सुद्धा शासकीय मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी राज्याच्या कृषी आयुक्तांकडे केली आहे.  चाकण परिसरासह खेड तालुक्यातील अनेक फळबागा वाळण्यास व करपण्यास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांना या फळबागा तोडण्याशिवाय दुसरे गत्यंतर उरलेले नाही. जीवापाड कष्टाने जोपासलेल्या या बागा डोळ्यादेखत उध्वस्त होतांना शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. वाळणाऱ्या फळबागांमुळे हजारो शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्य

लक्ष्मण दुधवडे यांना डॉ.आंबेडकर पुरस्कार

इमेज
राजगुरुनगर दि. २५ (प्रतिनिधी) : विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत  भगवान गौतम बुद्ध यांच्या २५५७ व्या जयंती मोठ्या उत्साहाने साजरी  करण्यात आली. या निमित्ताने राजगुरुनगर येथे विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.                    खेड तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी सोसायटीच्या सांस्कृतिक भवनात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे,  भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष  लक्ष्मण दुधवडे,  काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अड. शांताराम गारगोटे, जिल्हा सरचिटणीस भास्कर तुळवे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, भीमशक्ती संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष अनिल जाधव, आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष संतोष डोळस,खेड तालुका खादी ग्रामोद्योग  संघाचे अध्यक्ष अनिल शिंदे, उपशिक्षणाधिकारी अशोक कडलक, प्रकाश रोकडे, भिमशाहीर प्रकाश गायकवाड अनिल भांगरे, कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा राजगुरू या

अंधश्रद्धेतून चाकणला मायलेकरांचा नरबळी

इमेज
आईच्या खुनापूर्वीच झाला होता बेपत्ता मुलाचाही खून अंधश्रद्धेतून चाकणला मायलेकरांचा नरबळी एक संगीत शिक्षक ताब्यात चाकण: अविनाश दुधवडे  साबळेवाडी  (ता. खेड ) येथे 21 एप्रिल 2013 रोजी  क्रूररित्या गळा चिरून विहिरीत फेकलेल्या दुर्गाबाई राजू जगताप (वय 50रा.बलुतआळी ,चाकण,ता.खेड)यांचा बेपत्ता मुलगा धनंजय (वय 25)याचीही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून अंधश्रद्धेतून या दोघांचे बळी दिल्याची धक्कादायक शक्यता समोर आली आहे.या प्रकरणी चाकण पोलिसांनी चाकण दत्तमंदिर भागात वास्तव्यास असलेल्या एका संगीत शिक्षणाचे क्लास घेणाऱ्याला  ताब्यात घेतले आहे.  बेपत्ता झालेला मुलगा धनंजय यानेच आपल्या आईचा खून केल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांनी व्यक्त केला होता.मात्र आईच्या खुनापुर्वी दोन दिवस आधीच  मुलगा धनंजय याचा लोणावळा येथे गळा आवळून व ओळख पटू नये म्हणून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याने या दुहेरी खून प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.या प्रकरणी चाकण पोलिसांनी सुनील बबन पाचंगे (सध्या रा.चाकण भुजबळ आळी  ,ता.खेड ,जि.पुणे ) या संगीत शिक्षकाला

चाकण मधील एका लग्नाची गोष्ट

इमेज
चाकण मधील एका लग्नाची गोष्ट चाकण: अविनाश दुधवडे ल ग्न म्हटले की हुंडा, मानपान, सत्कार, पाहुण्या- राऊळ्यांची वर्दळ हे नेहमी पाहायला मिळते. चाकण सारख्या भागात तर गुंठामंत्री मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर अशा समारंभातून संपत्तीचे प्रदर्शन करत असल्याचे सर्वश्रुत आहे. पण याच चाकण मध्ये अचानक ठरलेल्या आणि चक्क दोन तासांत झालेल्या एका लग्नातील साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी पाहून सर्वच स्तरातील लोक भारावून गेले. निमित्त होते सागर जगनाडे आणि प्रतिभा यांच्या मंगळवारी (दि.7)  रात्री साडेनऊ वाजता झालेल्या आकस्मिक विवाहाचे.    जगनाडे कुटुंबीय संत जगनाडे महाराज यांच्या कार्याने प्रभावित झालेले. या भागात समाजातील विविध स्तरातील मंडळीना मदतीचा हात देणाऱ्या सामाजवादी विचार सरणीच्या जगनाडे कुटुंबीयांनी घरच्या लग्नात देखील आपली सामाजिक बांधीलकी जपली.  मंगळवारी (दि.7)  सायंकाळी मुलाला पाहण्यासाठी म्हणून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केल्या नंतर लग्नासाठीची आर्थीक परिस्थिती नसल्याचा मुलीकडील मंडळींचा सूर पाहून जगनाडे कुटुंबीयांनी साधे पणाने लगेचच दारात लग्नाची आणि लग्नाचा वायफळ खर्च दुष्काळ ग्रस्तांना दे

चाकणला 'खरेदी जत्रा'चे उत्साहात उद्घाटन

इमेज
चाकणला 'खरेदी जत्रा'चे उत्साहात उद्घाटन खरेदीदार आणि खवय्यांची चंगळ चाकण:अविनाश दुधवडे चाकणला 'खरेदी जत्रा'चे शुक्रवारी (दि.10) सायंकाळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रेय भरणे यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील होते. उद्घाटन समारंभा नंतर लगेचच चाकण परिसरातील खरेदीदार आणि खवय्यांनी येथे तोबा गर्दी केली होती. या उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे, स्वआधार सामाजिक संस्थेच्या प्रणेत्या व खरेदी जत्राच्या संयोजक सुरेखाताई मोहिते ,खेड पंचायत समितीच्या सभापती कल्पना गवारी, उपसभापती सुरेश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप परदेशी, खराबवाडीच्या सरपंच योजना सोमवंशी, कडाचीवाडीच्या सरपंच वर्षा कड, नाणेकरवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई कुसाळकर , संध्या जाधव, शिवसेनेचे पांडुरंग गोरे, आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते . उद्घाटना नंतर बोलताना दतात्रेय भरणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने आयोजित करण्

पिंपरी-चिंचवड मध्ये समाविष्ट होण्यास चाकणकरांचा विरोध

पिंपरी-चिंचवड मध्ये समाविष्ट होण्यास चाकणकरांचा विरोध चाकणला हवी स्वतंत्र नगरपरिषद नवीनच घोळामुळे संभ्रम चाकण:अविनाश दुधवडे चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्या संदर्भात मंगळवारी (दि.7) मुंबईत झालेल्या बैठकी मुळे चाकणला नगरपरिषद होणार की,पिंपरी चिंचवड मध्ये या भागाचा समावेश होणार या बाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, येथील ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी चाकण चे अस्तित्व संपवून पिंपरी-चिंचवड मध्ये या भागाचा समावेश करण्यास कडाडून विरोध केला आहे. प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे.मंगळवारी (दि.7) मुंबईत राज्याचे नगरविकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंग जिल्हाधिकारी विकास देशमुख, महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव,महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव,नगर परिषद प्रशासनाचे संचालक,व अन्य अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.एकीकडे चाकणला नगरपरिषद लागू करण्यासाठी सर्व पूर्तता केल्य

...तर नद्या विषवाहिन्या होण्यापासून रोखण्यास होईल मदत

इमेज
जिल्ह्यातल्या नऊ गावांमध्ये होणार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चाकण: अविनाश दुधवडे  अ न्य विकसित देशांच्या धर्तीवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरीक्त इतर कामांसाठी पुन्हा वापरात येऊ शकते, हा प्रयोग राज्यातील सुमारे शंभर गावांमध्ये यशस्वी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.पर्यावरणाला पूरक व दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी                आदर्शवत असा हा प्रयोग असून पुणे जिल्ह्यातील चाकण सह नऊ गावांमध्ये राज्य शासनाचा हा 'सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प' प्रयोग यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्नशील आहे.  पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन(ता.हवेली),चाकण(ता.खेड),पाटस (ता. दौंड),मालेगाव बुद्रुक(ता.बारामती)ओतूर (ता. जुन्नर),राजगुरुनगर (ता. खेड),नारायणगाव(ता. जुन्नर)कळंब(ता. इंदापूर)लोणी काळभोर(ता.हवेली)ही नऊ गावे या प्रयोगासाठी निवडण्यात आली आहेत.पश्चीम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांतील गावांचा या मध्ये समावेश आहे.या मधून संबंधित शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून संबंधित हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी या स