...अन् हरवलेला रणजीत पोहचला आईच्या कुशीत


...अन् हरवलेला रणजीत पोहचला आईच्या कुशीत
आश्चर्यकारक रित्या सापडला रेल्वेस्थानकावर
दैनिक पुढारीतील वृत्त आणि नेटवर्किंग साईटमुळे लागला शोध

---------------------------------
सोशल नेटवर्किंग साईटमुळे म्हणे नाते-संबंधात दरी निर्माण होत आहे , पण चाकण सारख्या भागात मात्र याच सोशल नेटवर्किंग साईटमुळे चक्क दगड फोडणाऱ्या मजूर आई
वडिलांना त्यांचा पोटच्या चिमुरड्या गोळ्याला पुन्हा भेटता आले. आणि जगण्याचा हरवलेला आधार पुन्हा मिळाला.तब्बल आठवड्यानंतर हरवलेला त्यांचा एकुलता एक मुलगा
दैनिक पुढारी तील सचित्र वृत्त आणि फेसबुक सर्फिंग च्या माध्यमातून सापडला आहे.

दहा वर्षाच्या मित्रा समवेत घाराबाहेर पडलेला नाणेकरवाडीच्या (चाकण) मजूर वस्तीवरील सहा वर्षांचा चिमुरडा मुलगा रणजित उर्फ रज्जीत लक्ष्मण एरकर (वय 6 वर्षे रा.कन्या विद्यालया समोर
,शहा पंपा मागे,नाणेकरवाडी ,चाकणता.खेड)गेल्या आठवडा भरापासून आश्चर्यकारकरित्या बेपत्ता झाला झाला होता
चाकण च्या प्रचंड वर्दळीत हरवलेला मुलगा शोधण्यासाठी नातेवाईक आणि पोलीस अशा सर्वांनीच शर्थीचे प्रयत्न केले होते.मात्र काही केल्या या मुलाचा शोध लागत नसल्याने सर्वांचीच
चिंता वाढली होती . मात्र एक स्वयंसेवी संस्था आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी दैनिक पुढारी मधील बेपत्ता या सचित्र बातमीच्या आधारे आणि पुढारी विशेष या नावे असलेल्या फेसबुक वरील
अकाऊंट वरील पोस्ट च्या आधारे रणजित या चिमुरड्याची कुटुंबियांसमवेत आज(दि.29) अनोखी भेट घालून दिली. आणि सुखरूप घरी परतलेला हा चिमुरडा पाहून सगळे कुटुंबीय
आणि संपूर्ण मजूर वस्ती अक्षरश हेलावली.
रणजीत मंगळवारी (दि.20 मार्च) राज धर्मा भालेकर (वय 10वर्षे )याच्या समवेत घराबाहेर पडल्या नंतर अचानक पणे बेपत्ता झाला होता. रणजीत ची आई सविता लक्ष्मण येरकर (वय 26)
यांनी या बाबत चाकण पोलिसांत तक्रार दिली होती . रणजित आणि राज दोघेही आठवडा भरापासून शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडले होते.ते आठवडा लोटला तरी
घरी परतलेच नसल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. .सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा काहीही थांगपत्ता न् लागल्याने नातेवाईकांसह पोलिसही चिंतीत झाले होते.
आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी चाकण भागातून बेपत्ता झालेल्या या मुला बाबत पुण्यातील एका संस्थेच्या सहकार्याने माहिती मिळवून हा हा मुलगा कुटुंबियांच्या स्वाधीन केला .
या बाबत चे वृत्त असे की, बेपत्ता झालेला रणजीत पुण्यातील "साथी सोसायटी फॉर असिस्टन्ट टू चिल्ड्रन इन डिफिकल्ट सिचुएशन" या संस्थेच्या कार्यकर्त्यांना पुण्यातील
रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत मिळून आला.त्यांनी त्यास हटकले असता कुणीतरी बाबाने आपणास येथे आणून सोडल्याचे त्याने सांगितले.घटनेचे गांभीर्य ओळखून
संबंधित कार्यकर्त्यांनी त्यास ताब्यात घेतले.व आपल्या संस्थेत नेले. रणजीत समवेत असणाऱ्या राजला ही त्यांनी येथूनच ताब्यात घेतले. रणजित आपणा चाकूर भागातून आल्याचे
सांगत होता. त्यावरून त्यास चाकण मधून आणण्यात आल्याचा संशय आला. त्या नंतर मनसेचे चाकण मधील पदाधिकारी
यांच्याशी संबंधित या संस्थेतील मंडळींनी चौकशी केली असता पुढारीत याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते व पुढारी विशेष या नावे असलेल्या फेसबुक वरील अकाऊंट वरील पोस्ट च्या
आधारे संबंधित मुलगा चाकण मधीलच असावा असा दाट संशय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला व त्यास चाकण मध्ये आणण्याची विनंती केली. आणि खरोखर ते सचित्र वृत्त आणि
फेसबुक सर्फिंग मुळे हा चिमुरडा आई वडिलांच्या पुन्हा कुशीत आला. रणजीतला सुखरूप बघितल्यानंतर आईवडिलांनी त्याला कवटाळले आणि चिमुरड्या मुलासह आई वडिलांनी
अश्रूंना वाट करून दिली. मुलाची आणि आई वडिलांची ही भेट घालून देण्यासाठी मनसे चे जिल्हा संघटक अभय वाडेकर,जिल्हा उपाध्यक्ष समीर थिगळे,चाकण शहराध्यक्ष श्रीकांत जाधव,
राजू घोलप,सोमनाथ कौटकर ,सोपान कौटकर,साथी सोसायटीचे विवेक अडागळे यांनी प्रयत्न केले.

*सखोल चौकशीची मागणी :

चाकण मधून बेपत्ता झालेला रणजीत पुण्यातील रेल्वे स्थानकात कसा मिळाला या बाबत कुठली टोळी वैगरे सक्रीय आहे का ?याची सखोल चौकशी करण्यात यावी , आणि
सापड्लेल्या या मुलाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी मागणी मनसे चे जिल्हा संघटक अभय वाडेकर ,चाकण शहराध्यक्ष श्रीकांत जाधव ,समीर थिगळे ,व
पदाधिकाऱ्यांनी केली आहे.गोर गरिबांची मुळे बेपत्ता होऊन रेल्वे स्थानकांमध्ये सापडण्याचे प्रकार चिंतनीय असल्याचेही त्यांनी दैनिक पुढारीला सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)