पुण्यात औद्योगिक पट्ट्यातील थरथराट राजकीय पाठबळावरच

पोलिसांनी कारवाई केलेल्या गुन्हेगारांच्या गुन्हेगारीचे प्रसिद्ध केलेले स्वरूप आश्चर्यकारक आणी तितकेच धक्कादायक असल्याची बाब समोर आली आहे. पुणे जिल्ह्याच्या
इंडस्ट्रीयल बेल्ट मधील स्टार औद्योगिक वसाहत समजल्या जाणाऱ्या  चाकण एमआयडीसी परिसरातील कारवाई करण्यात आलेल्या मंडळींमध्ये पोलिसांच्या रेकोर्ड नुसार चक्क
काही लोकप्रतिनिधींची कामे त्यांच्या पाठबळावर दहशतीने ही मंडळी करीत असल्याचे स्पष्ट होत असून संबंधित गुन्हेगारांच्या गुन्हेगारीचे स्वरूप मांडताना पोलिसांनी या बाबींचा
स्पष्ट पणे उल्लेख केला आहे.आपले राजकीय पाठीराखे आपल्याला कोणत्याही प्रकरणातून सोडवतील, याची खात्री कार्यकर्त्यांना असल्याने राजकीय पाठबळावर हे बोके
पोसले गेल्याची वस्तुस्थिती असून ज्यांना कारभार करण्यासाठी लोकांनी प्रतिनिधित्व  दिले आहे, अशी मंडळीच या धंद्याचे प्रवर्तक असने ही सर्वात दुर्दैवी बाब अधोरेखित होत आहे.

 पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईत तयार केलेल्या अहवालात छोटा राजन टोळी ,उदयन महाराजांपासून ,शिरूर मधील बांदल ,माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या भटक्या
जाती जमाती संघटनेचा ,बाबा बोडखे टोळी ,आप्पा लोंढे टोळी, समता परिषदेचा ,तळेगाव दाभाडे येथील गुन्हेगारी टोळ्यांचा उल्लेख करण्यात आला असून,ही मंडळी या टोळ्यांची कामे
याभागात करीत असल्याचे पोलीस अहवालात स्पष्ट पणे नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादीची निरनिराळी  ठेकेदार मंडळी कोणासाठी व कुणाच्या पाठिंब्याने या प्रकारात
कार्यरत होती याचा मात्र उल्लेख करण्याचे धारिष्ट्य पोलिसांनी दाखविले नाही पोलिसांनी ते उघड सत्य मांडले असते तर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधीही  उघडे पडले असते.
जिल्ह्याच्या इंडस्ट्रीयल बेल्ट मध्ये झालेल्या कारवाईत अनेक राजकीय पाठिंब्यावर गुन्हेगारी कारवाया करून ठेके मिळविणाऱ्या मंडळींवर एक किंवा एका पेक्षा अधिक गुन्हे निरनिराळ्या
पोलीस ठाण्यात दाखल असून एमआयडीसीमध्ये कारखान्यात जावून व्यवस्थापनाला धमकावणे,दहशत निर्माण करणे,शास्त्रांचा धाक दाखविणे,गंभीर स्वरुपाची मारहाण करणे,
खुनाचा प्रयत्न,अथवा खून करणे,दंगल माजविणे,निरनिराळ्या खतरनाक  गुन्हेगारी टोळ्यांसाठी या भागात काम करणे असे आरोप असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
यातील काहींवर एक किंवा त्या पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस दप्तरी  असलेल्या नोंदींवरून स्पष्ट होत आहे.मात्र चाकण मध्ये याच कारवाईतील अनेक जणांविरुद्ध एकही गुन्हा
पोलीस दप्तरी दाखल नसून त्यांच्या विरोधात त्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या आदल्या दिवशी तक्रार अर्ज आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.तसा उल्लेखही पोलिसांनी आपल्या अहवालात केला आहे.


सर्वच पक्षात गुंडोबांचा भरणा ,
मात्र राष्ट्रवादीच बहुमतात:

विधानसभेत पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारीचा विषय ऐरणीवर आल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईत नुसत्या पंटर मंडळींवर झालेल्या कारवाईने
जिल्ह्यातील  राष्ट्रवादी कॉंग्रेस चा बुरखा टराटरा  फाटला आहे. चाकण भागात सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षालाच मोठा मन मिळाल्याचे
स्पष्ट होत असून कारवाई करण्यात आलेल्या 47 जणांपैकी  19 जण राष्ट्रवादीचे असून त्याखालोखाल शिवसेना ,कॉंग्रेस ,मनसे ,भाजपा,यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा
बडगा उचलण्यात आला होता .
 चाकण सह जिल्ह्याच्या औद्योगिक भागात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींवर जिल्ह्यात पोलिसांनी धडक कारवाई करीत इंडस्ट्री दादांच्या चेल्या चपट्यावर
कारवाई करून या क्षेत्राला हादरा देण्याचा प्रयत्न केला.या प्रश्नावर  विधिमंडळात  विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेच होते आणी चक्क  खुद्द विधानसभेचे
अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी प्रकट करीत मास्टर माइंड  शोधण्याची सूचना केली होती.पोलिसांनी ते धारिष्ट्य दाखविले नसले
तरी चाकण भागात कारवाईच्या कात्रीत आलेल्या 47 जणांपैकी बहुतांश सर्वांनाच राजाश्रय लाभल्याचे स्पष्ट होत असून तगड्या राजकीय पाठबळावर अनेक जण ग्रामपंचायत
स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यातील 19 जण राष्ट्रवादीचे ,3 जण शिवसेनेचे ,2 जण कॉंग्रेस चे तर मनसे आणी भाजपा चे प्रत्येकी
एक जण सक्रीय पदाधिकारी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे असे पोलीस सूत्रांनी  सांगितले . यातील सर्वांवर गेल्या काही काळात निरनिराळे
गुन्हे दाखल असल्याचेही क्राईम डायरी सांगते.

इंडस्ट्रीने विकास झाला नेत्यांचा आणी गुंडांचा :

जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीमुळे सर्वसामान्यांचा विकास झाला नसला; तरी राजकीय पदाधिकारी त्यांचे चेले चपाटे ,आणी कार्यकर्त्यांचा मोठा आर्थिक विकास झाला आहे.
कंपन्यांत ठेकेदारी मिळाली, की खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो हे सर्वश्रुत झाल्याने या भागासह अन्य भागातील मंडळीनीही येथे वक्र दृष्टी केली .आणी मोठ्या टोळ्यांचा
आधार घेत अनेकांनी  कंपन्यांत ठेके मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु केले. ठेका मिळत नसेल; तर कंपनीचे मालक, अधिकारी यांना धमकीही दिली जाते. वेळप्रसंगी
काही अधिकाऱ्यांना मारहाण केली जाते. ठेके मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू होती . कंपनी जिल्ह्याच्या या भागात आल्यानंतर ,जमिनीच्या व्यवहारापासून ,बांधकाम साहित्य पुरविण्याचा ठेका
कुणाला द्यायचा ,कारखान्यांत कामगार आणी माथाडी ठेका कुणी चालवायचा येथे पासूनच संबंधित बाहुबली आपले निर्णय अद्यापही लाडात असल्याची वस्तुस्थिती आहे.
या स्पर्धेतून औद्योगिक वसाहतीत दररोज हाणामाऱ्या, वादावादी घडतात. पोलिस ठाण्यात काही तक्रारी जातात; पण त्या राजकीय पदाधिकारी, नेते, गुंडांकडून
पोलिसांवर दबाव आणून मिटविल्या जातात. काही पोलिसांकडून यांना पाठिंबा मिळत असल्याने अशा प्रकारांना गेल्या काही वर्षात अक्षरशः ऊत आला होता.
निरनिराळ्या ठेकेदारीच्या माध्यमातून यातील बहुतांश जणांनी याभागात  खूप मोठ्या प्रमाणावर माया जमविल्याची अनेक मंडळी  आहेत.
 मात्र आज वर राजकारणी आणि पोलिसांची त्यांना पक्की साथ मिळत असल्याच्या स्थितीने त्यांचे मजेत चालले होते ,मात्र विधानसभेत चर्चेला आलेल्या या मुद्द्याने 
आपल्याच नरडीला नख लागत असल्याचे पाहून पोलिसांनी काही प्रमाणात का होईना कारवाईचा बडगा उचलला .या भागात लगतच्या तालुक्यातील पर जिल्ह्यातील काही
प्रस्थापित राजकीय पक्षांच्या मंडळीची प्रचंड दहशत आहे .त्यांच्या नुसत्या नावावर ठेकेदारी ,जमीन व्यवहार असे अनेक व्यवसाय (नव्हे धंदे)या भागात चालतात.
काही बड्या टोळ्यांची नावे घेऊनही अनेक जण आपली दादागिरी चालवीत होते. जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी स्थानिकांच्या रोजगाराच्या नावाखाली कारखान्यांसमोर आदोलानांचा
फार्स करीत ठेकेदारीसाठी आटापिटा केल्याच्या बाबी आणी खुद्द लोकप्रतिनिधींनी कारखानदारांना धाम्काविल्याच्या बाबी आता लपून राहिलेल्या नाहीत .या परिस्थितीत
कितीही अन्याय झाला तरी या मंडळीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते .कारण त्यांचा बडा राजकीय वरदहस्त ,पोलीस प्रशासनाशी त्यांचा असलेला घरोबा
या बाबी उघड होत्या.त्या मुळे अशा मंडळींचे पोलीस रेकोर्ड तयारच झाले नव्हते.पोलिसांच्या चेल्यांवरील कारवाई नंतर कोणत्या पक्षाची याभागात सर्वाधिक दहशत आहे या बाबी
कारवाईच्या आकडेवारी वरून स्पष्ट होत आहेत.आता सामन्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी त्यांच्या पाठीराख्यां पर्यंत पोलिसांना पोह्चावेच लागेल अशी सामान्य नागरिकांची
अपेक्षा आहे.
                                       अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)