गुंतवणुकीचा फंडा अन् कोट्यावधींचा गंडा


गुंतवणुकीचा फंडा अन् कोट्यावधींचा गंडा
चाकण लगतच्या गावातील शेतकऱ्यांना झटका
दोन वर्षे विश्वास संपादन करून लाटल्या मोठ्या रकमा

-------------------------

औद्योगिकरणात जमिनी संपादित झाल्यानंतर अचानक गडगंज झालेल्या चाकण लगतच्या एका गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांसह काही व्यापाऱ्यांची एका गुंतवणुकीवर अधिक व्याजाच्या फंदात
पडून लाखो रुपयांना फसल्याची चर्चा असून पुरावे नसल्याने कुठच्या आधारावर तक्रारी करायच्या आणि पैसे तर गेलेच आहेत आणखी बेअब्रू कशाला करून घ्यायची या
भावनेतून सर्वानीच चिडीचूप भूमिका घेतली आहे ,'रोकडा व्यवहार पावती नाही' त्यामुळे पुरावे नसल्याने संबंधितांनी रीतसर तक्रारी केल्या नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाखो
रुपयांचा गंडा घालून पोबारा केलेल्या ठगांचे चांगलेच फावले आहे .

गुंतवणुकीवर कमी कालावधीत जादा नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे नवनवीन फंडे उघडकीस येऊ लागले आहेत. भिशी, दामदुप्पट योजना यांद्वारे होणाऱ्या
फसवणुकीची अनेक प्रकरणे उघडकीस येत असताना काही ठगांनी जमिनींचे पैसे मिळालेली गावे टार्गेट केली आहेत.
गुंतवणुकीवर जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक करण्याचे प्रकार पूर्वीपासून चाकण भागात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी दीर्घ काळ
वेळेवर परतावा देऊन विश्‍वास संपादन करून नंतर मोठी रक्कम मिळवून ही थोतांड योजना गुंडाळून संबंधितांनी पोबारा केला आहे.
गुंतवणूक केलेल्या पैशांवर दरमहा दहा ते पंधरा टक्के व्याज रूपी परतावा देण्याचे आमिष दाखवून चाकण लगतच्या एका गावांत आणि काही व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्याचा उद्योग काही जणांनी
गेल्या वर्षभरापासून सुरू केला होता. आजूबाजूला वातावरण कसं आहे? अधिक परतावा देण्याच्या योजनांमध्ये फसवणूक होतेय हे लगतच्या तालुक्यांमध्ये उघडकीस आले असतानाही
फसवणूक दिसत असूनही अनेकदा व्याज रूपी मोठा परतावा मिळालेल्या अनेकांनी या घटनेच्या मुलाशी जाण्याचा प्रयत्नच केला नाही. पुनःपुन्हा या प्रकारात अनेक जन फसत गेले
आणि गावातील जमिनींचे पैसे मिळालेल्या गुंठा मंत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी असा आर्थिक आत्मघात राजरोस पणे करीत होत्या . लाख दोन लाखां पासून पाच ते पन्नास लाखांपर्यंत
तर अनेकांनी त्याहून अधिक रुपयांची गुंतवणूक या मध्ये केली होती. काही मंडळींनी तर घरातील दाग दागिने मोडून या मध्ये गुंतवणूक केल्याचे खुद्द काही गुंतवणूक दारांनीही सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून चाकण भागात फसवणुकीची पद्धत बदलत आहे. पतसंस्था, सहकारी बॅंका अडचणीत आल्याने लोक आता राष्ट्रीयीकृत बॅंकांतच गुंतवणूक करू लागले आहेत. त्यामुळे आमिष
दाखवणाऱ्या या ठ्गांकडून अथवा थोतांड बाजी करणाऱ्या कंपन्याही आता राष्ट्रीयीकृत बॅंकेतील खाते क्रमांक देतात. इंटरनेटवर वेबसाईटद्वारे बनावट योजनेचा प्रसार केला जातो. राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते,
वेबसाईटवर पारदर्शी कारभार यांमुळे लोक यावर विश्‍वास ठेवतात. एक दिवस खातेही व वेबसाईटही बंद होते. चाकण भागात झालेल्या अधिक व्याजाच्या फसवणुकीत लोकांचे कोट्यावधी रुपये अडकले
आहेत.ही सर्वच मंडळी हवालदिल झाली असून एजंट असणाऱ्याच काही गुंतवणूकदार मंडळीच्या वादावादीचे प्रकार समोर येत आहेत.

चाकण मधील हा फसवणुकीचा प्रश्‍न सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे.यात चक्क काही स्थानिकांनी एजंटांची भूमिका पार पडल्याने भविष्यातील गंभीर दुष्परिणामांची मुहूर्त मेढ येथे रोवली गेली आहे.
आता शोधायला हवीत त्यामागची सर्व प्रकारची पाळे मुळे.पैसा गेल्याने अनिश्‍चितता वाढली, की माणसाची प्रवृत्ती बदलते. बहुतेक कुटुंबांत दागिने किंवा जमिनी विकून फसव्या गुंतवणुकीत तो पैसा गुंतविण्यात आलाय. सरकारी व्याजदर
इतके कमी आहेत, की केवळ त्यावर अवलंबून असणाऱ्या मध्यमवर्गालाही आकर्षक व्याजदराची भुरळ पडावी. कुणीतरी मित्र, नातेवाइक किंवा जवळचा माणूस त्याच्या आयुष्यात
घडलेला आर्थिक चमत्कार सांगतो आणि हे विश्‍वास ठेवतात असाच काहीसा हा प्रकार झाला . या प्रकारच्या योजनांमध्ये पैसे मिळालेले गुंठा मंत्री ,शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि त्यांची पत्नी व मुले एजंट- सदस्य झालेले आहेत. आर्थिक
घोटाळ्यांमध्ये चोर समाजातच मिसळलेला असतो. अचानक मिळालेले जमिनीचे पैसे उत्तम गुंतवणुकीत लावल्याने गुंठा मंत्र्यांसाठी आणि पैशाने आणि परिस्थितीने पिचलेल्या माणसांसाठी देवासमान ही योजना झाली होती .
ग्रामीण भागातील बहुतांश माणसे आर्थिकदृष्ट्या किंवा गुंतवणुकीच्या बाबतीत निरक्षर असतात. म्हणूनच त्यांची जबाबदारी प्रशासन झटकून टाकू शकत नाही. आयुष्य भराची जमीन विकून मिळालेली अखेरची पुंजी
अशी बेमालूम पणे हिसकावुन नेल्याने अक्षरशः हजारो गुंतवणूकदार शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

पोलीस प्रशासन म्हणते:
याबाबत वरिष्ठ पोलीस प्रशासनाने सांगितले की,अशा प्रकारे फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज पोलिसांना प्राप्त झाला असून अधिक व्याजाच्या लोभाने अनेकांनी
गेल्या दोन वर्षांपासून संबंधीताकडे पैसे गुंतविले होते.मागील दोन्ही वर्षात एकदाही दर महिन्याचे व्याज चुकले नसल्याने संबंधीताकडे अनेकांनी गुंतवणूक केली.
मात्र अखेरच्या वेळी संबंधित इसमाने पाच ते दहा लाखांच्या व त्याहून मोठ्या रकमा अशी सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेतली आणि पोबारा केला.
भोसरी येथे वास्तव्यास असणाऱ्या या भामट्याने स्वतःची खरी ओळख लपविली होती.त्यामुळे त्याचा थांगपत्ता लागणे कठीण जात असून भोसरी पोलिसांनी
याबाबत कारवाई केल्याचे आणि चाकण पोलिसांकडे फसवणूक झालेल्यांचा तक्रार अर्ज आल्याचे खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भरत पाटील यांनी सांगितले.

रक्कम 30 ते 32 कोटींच्या घरात :
याबाबत चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी सांगितले की,फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांश शेतकरी चाकण जवळील आंबेठाण गावचे असून जमिनींचे
मिळालेले पैसे रोकडा स्वरुपात संबंधिता कडे गुंतविण्यात आले होते.सुरुवातीच्या वर्षभर एकदाही व्याजाच्या परताव्यात खंड न पडल्याने अनेक जन या गुंतवणुकीकडे
ओढले गेले.ही रक्कम रोकड स्वरुपात देण्यात आली होती आणि या बाबत कुठल्याही पावती घेण्यात आली नव्हती. त्यामुळे धनादेश देणाऱ्यां व्यतिरिक्त
अनेकांना कायदेशीर तक्रारीही देता आल्या नाहीत.फसवणुकीची ही रक्कम 30 ते 32 कोटींच्या घरात असल्याचेही पोलीस निरीक्षक कदम यांनी सांगितले.
संबंधित ठागाची सर्व माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले असून भोसरी हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या या ठगावर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे,
असे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले. अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५



------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)