चाकण परिसर होतोय भेसळीचा हब


चाकण परिसर होतोय भेसळीचा हब
*भेसळीचा धंदा कोटीचा
*वर्षातील तिसरी मोठी कारवाई
*मोठे मासे मात्र जाळ्या बाहेरच
*पोलिसांशी गुफ्तगू

-----------------------------

चाकण औद्योगिक क्षेत्रालगत खालुंब्रे (ता. खेड) गावाच्या हद्दीत फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणार्‍या तेलमाफियांच्या आणखी एका टोळीस
थेट मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतले . या छाप्यात 11 टँकर, फर्नेस ऑईल, कॉस्टिक सोडा व रोख रक्कम, असा 40 लाख रुपयांचा माल जप्त केला.अर्थात चाकण सारख्या भागात अशा कारवाया वारंवार होत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.जून 2011 मध्ये खराबवाडी (चाकण )येथे झालेल्या कारवाईत संशयास्पदरीत्या ज्वलनशील तेलाची वाहतूक करणारे दहा टॅंकर भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आले. या टॅंकरचे चालक मात्र पळून गेले, त्यामुळे पोलिसांना सखोल माहिती मिळाली नव्हती ,त्यानंतर चाकण जवळ वाकी (ता.खेड) येथे बोथरा याच्या ऑइल डेपोवर नऊ टॅंकर पोलिसांनी काळ्या ऑइलमध्ये (फनेर्स ऑइल) भेसळकरताना पकडले. त्यानंतर पोलिसांना 20 हजार लिटरच्या दोन टाक्‍यांत सुमारे साडेतेरा हजार लिटर काळे ऑइल आढळून आले होते त्यामुळे
चाकण परिसरामध्ये सातत्याने होणाऱ्या भेसळीची पाळेमुळे खोदण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महिन्याला कोट्यवधींच्या इंधनाची हेरफेर करणारे राज्यभरातील तेलमाफियांचे निर्ढावलेले आणि ऑक्टोपस चा घट्ट विळखा नेटवर्कही यानिमित्ताने चाकण च्या वर्तुळात चर्चेला आले आहे. शिवाय, तेलमाफियांची ठिकठिकाणच्या पोलिसांशी असलेली मैत्री आणि त्यांच्यावरकारवाईचे अधिकार असलेल्या पुरवठा विभागाची हतबलतासुद्धा अधोरेखित झाली आहे. वारंवारच्या या घटनांमुळे तेलमाफियांचे तगडे राज्यस्तरीय जाळे चाकण मध्ये कार्यरत आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही . चाकण हाऔद्योगिक परिसर ऑटोहब प्रमाणे भेसळीच्या यागोरखधंद्याचा"हब' होऊ लागला आहे , हे येथे उल्लेखनीय आहे.

फर्नेस ऑइल, नाफ्ता, सॉल्वंट आणि रॉकेलची पेट्रोल तसेच डिझेलमध्ये भेसळ करून त्याची पद्धतशीर विक्री करण्याचा गोरखधंदा गेल्या
काही वर्षांपासून चाकण सह राज्यभरातील महामार्गावर चांगलाच फोफावला आहे. मुंबई, पुणे, नाशिककडे फर्नेस ऑइल, सॉल्वंट आणि रॉकेलचे
टॅंकरच्या टॅंकरच डोंगरदऱ्यात रिती केले जातात असा आज वरचा क्राईम रिपोर्ट सांगतो . आता चाकण मधील महामार्गांवर परिसरातील निर्जन ठिकाणी हा धंदा राजरोस पणे चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.याभागातील काही ठराविक भागात आणि डेपोत आलेल्या टॅंकरचालकांना "तेल माफिया' कधी पैशाचे आमिष दाखवून, तर कधी
चाकूसुऱ्याचा धाक दाखवून आडमार्गावरील निर्जन ठिकाणी नेतात. तेथे विशिष्ट प्रमाणात या टॅंकरमधील इंधन ड्रम किंवा मोठ्या पाण्याच्या
टाकीत काढले जाते. त्यानंतर माफियांची ही वाहने हे इंधन घेऊन लगेच पसार होतात. या नेटवर्कमध्ये सहभागी असलेले अनेक टॅंकरचालक
स्वत:च नियोजित ठिकाणी मालाची डिलिव्हरी करतात.त्यांच्या खिशात ताबडतोब रक्कम पडते. हे रॉकेल किंवा फर्नेस ऑइल नंतर
वाहनचालकांना, विशिष्ट उद्योजकांना तसेच मोठ्या धेंडांना विकले जाते.

*प्रचंड कमाई:
या गोरखधंद्यात बक्कळ पैसा मिळत असल्यामुळे अनेक टॅंकरचालक अन्‌ काही टॅंकरमालकांचीही तेल माफियांशी साठगाठ आहे. पोलिसांनाही
या गोरखधंद्यातून मोठा हप्ता मिळतो. येथे संदीप कर्णिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असताना त्यांनी चाकण मधील फर्नेस ओईल माफियांना
सर्वप्रथम खराबवाडी मधील कोट्यावधी रुपयांची कारवाई करून सळो की पळो करून सोडले होते. त्यावेळी अनेक अज्ञात मंडळींवर गुन्हे
दाखल झाले होते. काही नेत्यांचा या गोरखधंद्याला वरदहस्त आहे. आता या सर्वांची पोलिसांनी धाडस दाखवून यादी तयार करण्याची गरज निर्माण
झाली आहे.ग्रामीण पोलिसांनाही या धंद्याची कल्पना आल्याने चाकण लगतच्या भागात अशा प्रकारचे अनेक टॅंकर आणि तेलमाफियांचे
साथीदार वर्षभरापूर्वी अनेकदा पकडले गेले असले तरी मोठे मासे जाळ्याबाहेर राहत असल्याने भेसळ माफियांच्या कारवाया अद्याप कमी झालेल्या
नाहीत .गेल्या काही वर्षां पासून हा काळा धंदा बिनधास्त सुरूच आहे.

*त्या कारवायांसाठी पुणे आणि मुंबईचे पोलीस? :
*स्थानिक पोलिसांचे कानावर हात .

चाकण मध्ये खराबवाडी आणि खालुम्ब्रे येथे झलेल्या कारवाया पुणे आणि मुंबई पोलिसांकडून करण्यात आल्या असल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिके
विषयी शंका घेण्यास वाव असल्याचे सांगण्यात येते .
जून 2011 मध्ये खराबवाडी (चाकण )येथे झालेल्या कारवाईत वाघजाईनगर (ता. खेड) येथे संशयास्पदरीत्या ज्वलनशील तेलाची वाहतूक करणारे दहा टॅंकर
भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आले. या टॅंकरचे चालक मात्र पळून गेले, त्यामुळे पोलिसांना काहीच माहिती मिळाली नव्हती .
पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. हे टॅंकर मुंबई येथून आले. हे टॅंकर रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे करण्यात आले होते.
यामधील पाच टॅंकर भरलेले होते , तर पाच टॅंकर
रिकामे होते . पाच टॅंकरमध्ये काळे ऑइल, एलजीओ भेसळीचे रसायन, फर्नेस ऑइल भेसळीच्या साठी आणले असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यावेळी याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक यांना चाकणमध्ये भेसळयुक्त ज्वलनशील तेलाच्या टॅंकरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची
माहिती मिळाली होती. त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी पथकासह खराबवाडी,
वाघजाईनगर परिसरात रात्री अंतर्गत रस्त्यावर दहा टॅंकर पकडले. पोलिसांना गुंगारा देऊन चालक पळून गेले होते .
या टॅंकरमधील काळ्या तेलाचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी घेतले होते त्या संपूर्ण प्रकारचे पुढे काय झाले याची माहिती खुद्द पोलिसांकडेही
नाही.जुन्या वाहनांचे मालक शोधणे अवघड असल्याचे सांगत पोलिसांनी नंतर हात झटकले होते.
चाकण परिसरात सुमारे सहा वर्षांपूर्वी भेसळयुक्त ज्वलनशील पदार्थाचे दोन टॅंकर पोलिसांनी पकडले होते. त्या टॅंकरचे मालक अजूनही पोलिसांना
सापडले नाहीत. ते दोन टॅंकर अजूनही पोलिस ठाण्यात आहेत. टॅंकर पोलिसांनी पकडल्यानंतर चालक मात्र पळून जातात. टॅंकरही जुने
झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मालकांचा शोध लागत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.त्यामुळे भेसळीची ही मुळे सामारे सहा ते आठ
वर्षांपासून येथे रुजली असल्याचे स्पष्ट होत आहे.कधी तरी कारवाई होते .कामगार किंवा वाहन चालक मंडळी कारवाईत पुढे केली जातात त्यामुळे
खऱ्या खुऱ्या भेसळ सम्राटांना कारवाईच्या कात्रीत घेतलेच जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

*वाकीतील ती धडक कारवाई :
वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील ऑइल डेपोवर नऊ टॅंकर पोलिसांनी काळ्या ऑइलमध्ये
(फनेर्स ऑइल) भेसळ करताना पकडले जुलै 2011 मध्ये
पकडले होते. पोलिसांना 20 हजार लिटरच्या दोन टाक्‍यांत सुमारे साडेतेरा
हजार लिटर काळे ऑइल आढळून आले होते. या ऑइलमध्ये भेसळ करण्यात आली होती.
कारवाई पूर्वी गेल्या दहा वर्षांपासून पुणे-नाशिक रस्त्यावर वाकी बुद्रुक येथे काळ्या ऑइलचा (फनेर्स ऑइल) डेपो होता. या डेपोत एचपी,
भारत पेट्रोलिअम या कंपन्यांकडून काळे ऑइल अधिकृतरीत्या विकत घेतले जाते. हे ऑइल त्यानंतर राज्यातील कंपनी व इतर
व्यावसायिकांना या ठिकाणाहून टॅंकरद्वारे पुरविले जाते. या ठिकाणी ऑइलमध्ये भेसळ करण्यात येते, असा संशय पोलिसांना खराब वाडी मधील
पुणे पोलिसांच्या कारवाई नंतर आला व स्थानिक पोलिसांनी येथे छापा टाकला. या वेळी
टॅंकरमधील ऑइलमध्ये भेसळ करण्याचे काम चालू होते. त्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला केवळ चालकांना ताब्यात घेतले. त्यांना अटक केली;
पण डेपोचा मालक मात्र फरारी झाला होता .या ठिकाणी काळ्या ऑइलच्या 10 हजार लिटरच्या एका टॅंकरमधील एक हजार लिटर ऑइल काढण्यात येत होते. त्यामध्ये एक हजार
लिटर पाणी टाकण्यात येत होते. तसेच सोडा, पावडर टाकण्यात येत होती. त्यानंतर त्या संपूर्ण द्रावणाला काही प्रमाणात उष्णता देण्यात
येत होती. अशा प्रकारे भेसळ करण्यात येत होती. त्यानंतर काळे ऑइल कंपन्या व इतर व्यावसायिकांना पुरविले जात होते. हे ऑइल एका
लिटरला साधारणपणे पंचेचाळीस रुपये भावाने विकले जाते. त्यामुळे एका टॅंकरमागे भेसळ केल्यानंतर निव्वळ नफा डेपो मालकाकडून 50
हजार रुपयापर्यंत काढण्यात येत होता नंतर पोलिसांनी डेपो मालकास ताब्यात वैगरे घेतले पण भेसळीचा सिलसिला चाकण भागात काही केल्या
थांबत नसल्याचे निरनिराळ्या कारवायांमुळे समोर येत आहे.
या ठिकाणी काळ्या ऑइलच्या 10 हजार लिटरच्या एका टॅंकरमधील एक हजार लिटर ऑइल काढण्यात येत होते. त्यामध्ये एक हजार
लिटर पाणी टाकण्यात येत होते. तसेच सोडा, पावडर टाकण्यात येत होती. त्यानंतर त्या संपूर्ण द्रावणाला काही प्रमाणात उष्णता देण्यात
येत होती. अशा प्रकारे भेसळ करण्यात येत होती. त्यानंतर काळे ऑइल कंपन्या व इतर व्यावसायिकांना पुरविले जात होते. हे ऑइल एका
लिटरला साधारणपणे पंचेचाळीस रुपये भावाने विकले जाते. त्यामुळे एका टॅंकरमागे भेसळ केल्यानंतर निव्वळ नफा डेपो मालकाकडून 50
हजार रुपयापर्यंत काढण्यात येत होता

*सगळ्या प्रकारच्या भेसळीत अशीही शक्कल!

रॉकेल, फर्नेस ऑइलचे टॅंकर जेथे कुठे न्यायचे आहे, त्या ठिकाणच्या विशिष्ट अंतरावर छोटेसे छिद्र करून मुद्दामहून इंधन गळती सुरू केली
जाते. नियोजित ठिकाणी माल पोचल्यावर तो कमी असल्याचे संबंधितांच्या लक्षात येताच गळतीमुळे कमी झाल्याचे सांगून हात झटकले
जातात. वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी अनेक वाहनांना "जीपीएस' लावलेले असते. परंतु, अनेक टॅंकरमधील जीपीएस नादुरुस्त
केले जाते. त्यामुळे वाहनमालक किंवा इंधनाच्या टॅंकरची वाट पाहणाऱ्या संबंधित एजन्सीच्या लक्षातच हा प्रकार येत नाही.

*इंधन भेसळीचीच शक्‍यता

काळे ऑइल, रॉकेल, एलडी पावडर यांच्या मिश्रणातून डिझेलसदृश्‍य द्रावण तयार होते. त्यामुळे या ठिकाणी अशी डिझेल भेसळ करण्यात
येत होती का? व याचा पुरवठा काही पेट्रोलपंपचालकांना व इतर व्यावसायिकांना करण्यात येत आहे का? याची चौकशी करण्यात यावी अशी
मागणी आता होऊ लागली आहे. खराबवाडी, वाघजाईनगर परिसरात पकडलेल्या 12 टॅंकर वाकी प्रकरण आणि सध्या सुरु असलेली
महामार्गांवरील भेसळ यांचा संबंध असण्याची दाट शक्‍यता आहे. या ठिकाणी ऑइलमध्ये भेसळ केल्यानंतर ते राज्यातील कंपन्यांना,
व्यावसायिकांना भट्टीसाठी पुरविले जात होते. त्यांची फसवणूक या भेसळ माफियानाकडून करण्यात येत आहे.

*त्या 19 जणांना कोठडीची हवा :

फर्नेस ऑईलमध्ये पाणी व कॉस्टिक सोडा यांची भेसळ करणार्‍या रॅकेटची माहिती मुंबई पोलिसांना(क्राईम ब्रांच)मिळाल्या नंतर त्यांनी .
शनिवारी (दि. 30) चाकण एमआयडीसीतील ह्युंदाई कंपनीजवळील पवारवस्तीत भेसळ करणार्‍या टोळीला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या
हवाली केले.त्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना दोन दिवस पोलीस कोठडीत तपासकामी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले .
हे सर्वच जन चालक आणि क्लीनर असून मोठे मासे मात्र अद्यापही जाळ्या बाहेरच आहेत.पकडण्यात आलेले सर्व जन मुंबई ,पुणे ,उस्मानाबाद ,
सातारा आदि भागातील असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.इर्शाद मनसबअली सिद्दिकी (मुंबई) हबीब खलील खान (शिवडी, मुंबई), प्रदीप लक्ष्मण बधे (शिवाजीनगर,पुणे) व अजय नारायण वानखेडे (मुंबई) यांच्याहा उत्तरप्रदेशातील राजेशकुमार उमाशंकर परवाल , नूरमहंमद महंमदयुसूफ खान,दिनेशलाल रामसेवक यादव निजामुद्दिन मोहरतअली सय्यद , सोनू भिका पाल , झाकीरअली अलीबक्ष,फिरोज सुलेमान शेख , कलामुद्दिन नझामुद्दिन खान , इजाज अहमद, महेबूबअली खान , महंमद
अदीस अब्दुल सत्तार लक्ष्मण अरुण अडसूळ (ता. कळंब, जि. उस्मानाबाद), श्रीराम श्रीपती डेंगले ( ता. वाशी, जि. उस्मानाबाद),अस्पाक मुन्नीर शेख (ता. मावळ, जि. पुणे) अस्लम मुजीर शेख (रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे)., रामचंद्र पांडुरंगयादव ( सातारा),अशी त्या 19 जणांची नावे आहेत.

----------------------------- अविनाश दुधवडे ,९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)