चाकण मधील अतिक्रमण हटाव ला पोलिसांच्या फौजफाट्याने धार ....
चाकण मधील अतिक्रमण हटाव ला पोलिसांच्या फौजफाट्याने धार ............
अनेक रस्त्यांनी चौकांनी कित्येक वर्षांनी घेतला मोकळा श्वास
कारवाईचा अतिरेक झाल्याची नागरिकांची तक्रार
---------------------------------------------
जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरील अतिक्रमणे अनेक वर्षानंतर हटविण्यात येथील पोलिसांसह ग्रामपंचायत प्रशासनास यश आले आहे. व वाहतुकीच्या कोंडीतून नागरिकांना काहीसा
दिलासा मिळण्या इतका रस्ता रस्ता रुंद झाला असून त्यामुळे अनेक वर्षानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असला तरी कुठलीही सूचना न देता खूप मोठ्या प्रमाणावर मोडतोड
झाल्याने अनेक स्थानिकांच्या धंद्या व्यवसायावरच टाच आली आहे. मालकी हक्काच्या जागेंवरही सर्रास बुलडोझर फिरल्याने या कारवाईचा अतिरेक झाल्याबाबतचा नाराजीचा सूर
सर्वच स्तरातून एकू येत आहे.
चाकण मधील तळेगाव चौक, माणिक चौक, महात्मा फुले चौक, आंबेठाण चौक आणि सर्वच महत्वाच्या ठिकाणांवरील व जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी झालेले
अतिक्रमण पोलिसांनी हटविल्याने वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होणार आहे. मात्र सध्या पाडण्यात आलेल्या अतिक्रमित जागेवर आणि रस्त्यांपर्यंत हा राडारोडा पडला असून ,
तो हटविण्यासाठी प्रशासनाने अद्याप पर्यंत काहीच केले नसल्याने वाहतूक कोंडी जैसे थे आहे.
चाकण चा माणिक चौक ते मार्केटच्या पुढे चाकण च्या वेशी पर्यंत हॉटेल ,कापड व्यवसायिक, निरनिराळे दुकानदार, आणि छोटय़ा टपरीधारकांनी अगदी रस्त्यालगत पर्यंत आपली
दुकानांची हद्द वाढविली होती. मग या दुकानांसमोर वाहने लावण्याची सोय नसल्याने अशी वाहने थेट रस्त्यावर उभी करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षांपासून चाकण च्या
अरुंद होत चाललेल्या रस्त्यांचा,अतिक्रमणांचा ,आणि वाहतूक कोंडीचा विषय ऐरणीवर आला होता, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थ्यांनी जीव मुठीत धरुन या रस्त्यावरून
ये जा करावी लागत होती. रस्त्यावर वाहनांसाठी पार्किंग अथवा थांबा नसल्याने वाहन चालक आपल्या मर्जीप्रमाणे मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी
वाहने लावीत असत . चाकण मध्ये जवळपासच्या 20 ते 25 गावे व वाडी वस्त्यांचा व्यवहार आहे. येथील पंचक्रोशीतील सर्वात मोठा आठवडे बाजार, खरेदीसाठी येणारे नागरिक
आणि विद्यार्थी, शासकीय कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने हा प्राश अतिशय जाटील झाला होता. अनेक दुकाने बँका येथे येणाऱ्या मंडळींची वाहने अर्ध्याच्या वर रस्ता व्यापून
टाकतात. त्यामुळे या मार्गावरून बससह ट्रक आदी जडवाहने चालविण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागते. यात लहान-मोठे
अपघात घडत होते. काही बेदरकार वाहन चालक, सुसाट दुचाकी चालविणारे युवक त्यांचे होणारे वाद , मग बघ्यांची गर्दी , आणि वाहतूक ठप्प , असे चक्र येथे सर्रास निर्माण झाले
होते. शहरातील एकही रस्ता मोकळा नाही. मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली असल्याची ओरड खुद्द नागरिक करीत होते.
त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी सोळुंके यांनी स्वतः याभागात औद्योगिक गुन्हेगारीचा सफाया करताना 47 जणांना प्रतिबंधात्मक कारवाई च्या निमित्ताने ठोकून
काढीत लगेचच येथील जटील झालेल्या वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या विषयाला हात घातला. खुद्द येथील पोलीस अधिकाऱ्यांना या मोहिमेची जबाबदारी देऊन कामाला लावले.
त्यामुळे या कारवाईत ग्रामपंचायत प्रशासन सोबतीला असले तरी पोलिसच या संपूर्ण कारवाई दरम्यान अग्रणी दिसत आहेत.
कारवाईच्या पहिल्या दिवशी चौकांमधील किरकोळ विक्रेत्यांची दुकाने ,आणि हातगाडी वाले पथारीवाले यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या प्रशासनाने दुसऱ्या दिवशी पासून मात्र
पक्क्या स्वरुपाच्या बांधकामांनाही हात घातला आणि रस्त्या लगतच्या सर्वच व्यावसायिकांनी कान टवकारले. आपल्या अतिक्रमणांना कुणीही हात लावणार नाही अशी पक्की खात्री
असणाऱ्या अनेकांची अतिक्रमण कारवाई झालेल्यांच्या यादीत वर्णी लागली.
वेगवान गतीने सुरू असलेली व प्रभावीपणे राबविली जात असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. तळेगाव चौक, माणिक चौक परिसर तेथून पुढे
चाकण शहरातून जाणारा जुना नाशिक रस्ता अशी ही कारवाई करण्यात आली आहे. लोकांचा रोष आपणावर नको म्हणून चाकण चे सरपंच वगळता अन्य सदस्य चाकण चे ग्रामविकास अधिकारी,
याभागाचे तलाठी या मोहिमेत इतर वरिष्ठ अधिकारी व संबंधित कर्मचार्यांची हजेरी तशी नावालाच दिसली. त्या मानाने जिल्ह्याच्या अधीक्षकांनी स्वतः येथील कारवाईची पाहणी केली
हे विशेष . अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा