बेपत्ता बेपत्ता बेपत्ता ....
बेपत्ता मुलांची गंभीर समस्या
बेपत्ता बेपत्ता बेपत्ता ....
चाकण:वार्ताहर
चाकण भागातील सज्ञान समजले जाणारे पुरुष व स्त्रिया घरातून पळून गेल्याच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत . त्यापैकी
काहींना फूस लावून ,फसवून वैगरे पळवून नेल्याची बाब गृहित धरलीतरी सबळ कारणाशिवाय घरातून धूम ठोकणाऱ्यांची संख्याही आश्चर्यकारक
आहे .घरातून अचानक बेपत्ता होणाऱ्या महिला, पुरुष, अल्पवयीन मुले व मुलींच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
मित्र-मैत्रिणींकडे अथवा शिकवणीला जात असल्याचे किंवा अन्य कारणे सांगून घराबाहेर पडणाऱ्या युवक-युवतीबेपत्ता होण्याचे म्हणजेच पळून
जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जानेवारी 2011 पासून अद्याप पर्यंत सुमारे 125
जन या भागातून बेपत्ता झालेआहेत ; 22 जणांनी बेपत्ता होवून आत्महत्या केल्या आहेत .मात्र अल्पवयीन मुलेही बेपत्ता होऊ लागल्याने
बेपात्तांचा विषय गंभीर झाला असून ही भविष्यातील धोक्याची नांदी आहे.
चाकण जवळ नाणेकरवाडी येथून दोन अल्पवयीन मुले शाळेत जातो असे सांगून घराबाहेर पडल्यानंतर घरी परतलीच नसून गेल्या आठवड्या
भरापासून पासून बेपत्ता झाली आहेत.अल्पवयीन मुले अशी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरातून चिंता व्यक्त होत आहे.
रणजित लक्ष्मण एरकर (वय 6 वर्षे)व राज धर्मा भालेकर (वय 10वर्षे दोघे रां.कन्या विद्यालया समोर,शहा पंपा मागे,नाणेकरवाडी ,
चाकणता.खेड) अशी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. सविता लक्ष्मण एरकर (वय 26) यांनी या बाबत चाकण पोलिसांत
तक्रार दिली आहे.रणजित आणि राज दोघेही मंगळवारी(दि.20 मार्च)शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडले होते.ते आठवडा लोटला तरी
घरी परतलेच नाहीत.सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा काहीही थांगपत्ता न् लागल्याने नातेवाईकांसह पोलिस आणि नागरिकही चिंतीत झाले आहेत .
चाकण भागातील गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. यातील काही बेपत्ता
नातेवाईकांच्या सतर्कते ला पोलिसांची साथ मिळाल्यास सापडत असले तरी कित्येक दिवस ,महिने,वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. बेपत्ता महिलांचे घराजवळच विहिरीत, नदीत मृतदेह सापडल्याच्या
घटनाही समोर आल्या आहेत .सासरच्या छळाला कंटाळून विवाहिता आत्महत्या करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होत आहे.
अनेक विवाहित महिलांना लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही घडत आहेत. चारित्र्यावर संशय, माहेरून पैसे
आणावेत, मूल होत नाही म्हणून छळ, लग्नात मानपान दिला नाही, या कारणावरून सर्रास विवाहित महिलांचा छळ होत असल्याचेही अनेक
प्रकार उघडकीस आले आहेत . काही महिला छळाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत, तर काही महिला घरातून बेपत्ता होत आहेत.
मात्र कुठल्याही कारणाशिवाय बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुलांबाबत सर्वच स्तरातून चिंता व्यक्त होत आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये याभागातून
सहा मुले बेपत्ता झाली असून त्यातील काही मुले खुद्द स्वताच्या आई सोबत बेपत्ता झाल्याचे चाकण पोलीस ठाण्यातील नोंदी सांगतात
दरम्यान नाणेकर वाडी मधील अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याने मानवी अवयवांची तस्करी करणारी मंडळी अशी गोर गरिबांची मुले
लंपास करीत आहेत काय?याचा पोलीस यंत्रणेला शोध घ्यावा लागेल असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
---------------------------------------------------
अविनाश दुधवडे ,चाकण 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा