पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खेड तालुक्यातील विशेष वृत्ते

इमेज
महेंद्र दुधवडे 

पत्रकार संघाच्या जिल्हा सरचिटणीसपदी अविनाश दुधवडे

इमेज
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सरचिटणीसपदी अविनाश दुधवडे अविनाश दुधवडे (पत्रकार) चाकण: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी चाकण येथील पत्रकार अविनाश दुधवडे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ देशकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही निवड जाहीर केली आहे. दुधवडे यांनी या पूर्वी खेड तालुका पत्रकार संघाचे दोन वर्ष उपाध्यक्ष व दोन वर्ष अध्यक्ष म्हणून उत्तम काम पहिले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून तालुका पत्रकार संघाच्या ‘पत्रकार भवना’ साठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यांच्या निवडीचे चाकण सह खेड तालुक्यातून स्वागत होत आहे. जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या आणि मजबूत संघटन याकडे लक्ष देवून काम करणार असल्याचे दुधवडे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. पुणे जिल्हा पत्रकार संघ व खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दुधवडे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.  ----------------------------

युवाशक्तीत देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद ;पंतप्रधान मोदी

इमेज
युवाशक्तीत देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद   ; पंतप्रधान मोदी चाकण मध्ये जीईच्या प्रकल्पाचे उद्घाटन चाकण :    भारतातील युवा शक्ती मध्ये प्रचंड कौशल्य असून त्याच्याच आधारे जगातील उद्योगांना भारताकडे आकर्षित करून देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद येथील युवा शक्तीत आहे. केंद्र सरकारने  ‘ मेक इन इंडिया ’  अभियानाला विशेष महत्त्व दिले असल्याने भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याने जगातील कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी समोर येण्याचे आवाहन करताना  भारतात व्यापार उद्योग करणे अधिकाधिक सोपे करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१४) चाकण (ता.खेड , जि.पुणे) येथे स्पष्ट केले.   इलेक्ट्रिक उपकरणांच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक (जीई) या कंपनीच्या चाकण मधील प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव ,  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  ,  केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत

२५ वर्षांच्या विविध प्रलंबित समस्यांचा अक्षरशः भडीमार

इमेज
२५ वर्षांच्या विविध प्रलंबित समस्यांचा अक्षरशः भडीमार  उद्योगमंत्र्यांच्या जनता दरबाराला उदंड प्रतिसाद चाकण:  आघाडी शासनाच्या काळात माथाडी कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असून तत्कालीन नेत्यांचे काही बगलबच्चे व राजकीय अभय लाभलेल्या माथाडीच्या तथाकथित नेत्यांकडून कामगारांच्या नावावर औद्योगिक क्षेत्रात सरसकट खंडणी गोळा करण्याचा धंदा सुरु असून यामुळे कामगार व कंपनी मालकांचे रक्त शोषले जात आहे. परिणामी कामगारांच्या हिताकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा व संरक्षण दिले जात नाही. संबंधित खंडणीखोरांना लगाम घालण्यासाठी लवकरच माथाडी कायद्यात बदल केला जाणार असून खंडणी गोळा करणाऱ्यांना तुरुंगात पाठविले जाईल ,  असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांनी आज (दि. २१) चाकण येथे दिला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीसंबंधी स्थानिक शेतकरी ,  कामगार व उद्योजक यांना असलेल्या विविध समस्या व अडचणी समजून घेण्यासाठी उद्योगमंत्री  देसाई हे शनिवारी चाकण येथे आले होते. यावेळी विशेषतः बाधित शेतकऱ्यांनी आपल्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या समस्या देस

अन् वीस वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी ....

इमेज
अन् वीस वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी .... चाकणच्या विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा चाकण:       शाळा ,  कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ,  ज्या शाळेमध्ये ,  ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो ,  लहानाचे मोठे झालो ,  वेगवेगळ््या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले ,  ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे ,  एकमेकांशी हितगुज करावे ,  असे सर्वांना वाटते. मात्र वीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्या नंतर  प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र ,  ते अशक्यही नसते हे  चाकणच्या शिवाजी विद्यालयातून १९९५ साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले . आणि तब्बल वीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.      ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले ,  ज्या मातीने आपल्याला घडवलं ,  आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली  ती माजी विद्यार्थ्यांच्या  मेळाव्याच्या न

दैनिक पुढारी वृत्ते

इमेज
-------------------------------------------  अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले

इमेज
आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला क्लीन स्वीप देत ६७ जागांवर आघाडी घेतल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानलेच मात्र या लढ्यात मोलाची साथ देणाऱ्या पत्नीलाही धन्यवाद दिले.  समर्थकांच्या गराड्यात आनंद व्यक्त करताना केजरीवाल यांनी आपली पत्नी सुनीता यांचेही मनःपूर्वक आभार मानले. कायमस्वरुपी पाठीशी उभी राहिल्याबद्दल धन्यवाद, असे ते यावेळी म्हणाले.   केजरीवाल म्हणाले, मी फक्त एकटा हे करू शकत नाही. दिल्लीची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे काम करू.  केजरीवाल पुढे म्हणाले, माझी पत्नी सरकारी सेवेत नोकरी करते, त्यामुळे सरकार तिच्याविरुद्ध काहीतरी कारस्थान करेल अशी मला भीती वाटत होती. परंतु, आज मी तिला भिऊ नकोस म्हणून सांगितले.  दरम्यान, या विजयाचा अजिबात अहंकार करू नका असे आवाहनही केजरीवाल यांनी आपल्या सहकारी व कार्यकर्त्यांना केले.  --------------- अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

चाकण शहरातून धम्मप्रबोधन फेरी

इमेज
चाकण शहरातून धम्मप्रबोधन फेरी    श्रामणेर दिक्षा घेतलेल्या नवोदीत भिक्कू संघाकडून तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या धम्माचे जनतेत प्रबोधन व्हावे म्हणून आज (दि. ३०) चाकण बौध्द विहारात पंचशिल त्रिशरण बौध्दवंदना घेऊन शहरातून धम्मप्रबोधन रॅली काढण्यात आली होती . आंबेठाण (ता. खेड) मध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित श्रामणेर शिबीर चालू आहे . त्यातील शिबिरार्थींकडून चाकण शहरात धम्म प्रबोधन रॅली काढण्यात आली . भद्न्तांच्या च्या हातून श्रामणेर दिक्षा देऊन शिबिरार्थी बौध्द धम्मातील वंदना सुक्त संग्रह ,  परित्राण पाठ ,  अनापाणसती मेत्ता भाव , विपश्यना आदी ध्यान धारणेचा अभ्यास आंबेठाण येथे करीत आहेत. श्रामणेर शिबिरानिमित्त चाकण शहरातून धम्म प्रबोधन रॅली काढण्यात येऊन महामानव तथागत भगवान गौतम बुध्दांच्या धम्माचे प्रबोधन करण्यात आले. रॅलीला सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथून सुरुवात झाली.  तत्पूर्वी भिमज्योत तरुण मंडळाच्या व रमाबाई महिला मंडळाच्या वतीने  सर्व भिक्कुगणांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड ,  तालुकाध
इमेज

धारधार कुऱ्हाडीचे घाव घालून महिलेचा निर्घृण खून

इमेज
धारधार कुऱ्हाडीचे घाव घालून महिलेचा निर्घृण खून बेपत्ता पतीचे कपडे आढळले विहिरीजवळ  ;  एक चिट्ठीही आढळली निघोज्यातील घटना  चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा धारदार कुऱ्हाडीने वार करून खून करून खून केल्याची घटना आज (दि.३०) सकाळी साडेसहा वाजनेचे सुमारास निघोजे (ता.खेड  , जि.पुणे ) येथील रोहन अॅग्रो टेकच्या कामगार वसाहतीत घडली. धक्कादायक बाब म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत महिला मिळून आल्या नंतर पोलिसांनी तीच्या पतीचा शोध सुरु केला असता लगतच्या एका विहिरीजवळ त्याची चप्पल आणि पँन्ट मिळून आली असून .पोलिसांनी त्याच्या विहिरीजवळील कपड्याची झडती घेतली असता त्यात मोबाईल आणि केवळ  ' रामराम '  एवढाच मजकूर लिहलेली चिट्ठी मिळून आली आहे. त्यामुळे खुनाच्या या प्रकारानंतर त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून त्याने आत्महत्या केली कि ,  पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी काही बनाव केला आहे  ?  हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी आज सायंकाळी उशिरा विहिरीत मृतदेह मिळतो का याचा शोध सुरु केला आहे.    सविता बाबू वसुरकर उर्फ पांचाळ  (वय ३२ ,  सध्या रा. निघोजे

धडाडीचे युवा कार्यकर्ते संदीप सोमवंशी

इमेज
हाडाचा सच्चा कार्यकर्ता संदीप   सोमवंशी चाकण:    सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी ,  शेतमजुर  ,  व्यापारी  ,  कामगार व युवक हे सार्वजनिक जीवनात केंद्गबिंदु मानून त्यांच्याशी जवळीक साधुन त्यांच्या संस्कृती ,  त्यांची जीवनशैली ,  त्यांचे प्रश्न  ,  दैनंदिन संसारातील अडीअडचणी ,  सुख-दुःख ,  सणवार ,  यात्रा ,  उत्सव ,  हरिनाम सप्ताह ,  लग्न व इतर समारंभ या सर्व गोष्टीमध्ये न चुकता व हिरीरीने भाग घेणारे  , राजकारणातील मित्र व जेष्ठ कार्यकर्ते यांचे प्रेम जपण्याचे कामकाम अविरत पणे करणारे भाजपचे धडाडीचे युवा कार्यकर्ते  संदीप   सोमवंशी  यांनी चाकण- नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकी साठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.     खेड तालुक्यातील कुठल्याही गावाची यात्रा असो ,  या भागातील गणेशोत्सव असो किंवा विविध गावांचा  गावचा हरिनाम सप्ताह असो  संदीप   सोमवंशी  सर्व मित्रांसह सहभागी होणारच अशी त्यांची येथे ख्याती आहे. सर्वांना आपलेसे करण्याचा  सोमवंशी  यांचा स्वभाव आहे. हे सर्व करीत असतांना आपण समाजाशी बांधील आहोत व समाजाचे देणे लागतो ,  त्यातुन उतराई होतांना सामन्यासाठी आंदोलने करण्याचा

जाळलेल्या आकाशच्या खुनाचे गूढ कायम ...

इमेज
जाळलेल्या  आकाश च्या खुनाचे गूढ कायम ... शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार दोन अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल     कोरेगाव येथील चिमुरड्या  आकाश   महाळुंगकर   खुनाचे गूढ उकलणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीदेखील तपासात पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही. विद्यार्थ्याला संपविण्याच्या उद्देशानेच पेटवून देण्यात आल्याचा नागरिकांचा आणि नातेवाईकांचा सूर असल्याचा पोलिसांचा दावा आहे.  दरम्यान आज (दि.५) सायंकाळी सव्वापाच वाजनेचे सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात  आकाश वर कोरेगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.    प्रातविधी करण्यासाठी घराच्या पाठीमागील शेतात गेलेल्या  आकाश  संदीप  महाळुंगकर  (वय १३ , रा. कोरेगाव खुर्द  , ता.खेड , जि.पुणे) या  चिमुरड्यास दोन अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना चाकण जवळ कोरेगाव खुर्द (ता.खेड , जि.पुणे) येथे रविवारी (दि.४) पहाटे दोन वाजनेचे सुमरास घडली होती . या गंभीर घटनेत शंभर टक्के होरपळलेल्या  आकाश ची पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात तब्बल १६ तास मृत्यूशी झुंज सुरु होती . मात्र रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्यो

...म्हणून शिवसेनेत प्रवेश : सुधीर वाघ

इमेज
...म्हणून शिवसेनेत प्रवेश : सुधीर वाघ   राष्ट्रवादी मध्ये आमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांची घुसमट होत होती त्यामुळेच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे चाकण ग्रामपंचायतीचे सदस्य आणि युवा नेते सुधीर वाघ यांनी सांगितले . सुधीर वाघ यांच्यासह चाकण ग्रामपंचायतीच्या नाणेकरवाडी ग्रामपंचायतीच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश  केला आहे. चाकणचे ग्रा. प. सदस्य दत्तात्रय जाधव  , संतोष साळुंके ,  ज्योती फुलवरे  ,  सुनील शेवकरी  , माजी सदस्य  मधुकर घुमटकर  ,  बाळासाहेब साळुंके  , जयश्री पठारे  , नाणेकरवाडीचे माजी उपसरपंच  विकास नाणेकर ग्रामपंचायत सदस्य  गणेश पवार , पतसंस्थेचे मा. चेअरमन किसननाना बिरदवडे ,   सुनील नायकवाडी  ,  राष्ट्रवादीच्या उद्योग विभागाचे अध्यक्ष अनिल जगनाडे  ,  कॉंग्रेसचे  भाऊसाहेब शिर्के ,   प्रवीण  गोरे , महेश शेवकरी ,  मंगेश कांडगे  , राजेंद्र नाणेकर ,  खरेदीविक्री संघाचे नवनाथ मुटके  , चाकण सोसायटीचे माजी अध्यक्ष  साधु खंडू कड  ,  डॉ. रावसाहेब आवटी  ,   डॉ. नंदकुमार अभंग  , राजूशेठ घुमटकर  आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.  तर शेतकरी कुणबी