दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या ; खा.आठवले

दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या खा.आठवले
चाकण:


राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक बाब असून  जातीयवाद करणा-यांविरोधात गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घ्यावीचदलित अत्याचार रोखण्यासाठी पोलीस दलास योग्य ते आदेश द्यावेतअशी मागणीही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असल्याच्या कारणावरून माणिक उदागे याची हत्या झाली या पिडीत कुटुंबियांची खासदार आठवले यांनी चिखली येथे भेट घेतली. त्यांची चौकशी करत रिपाइंतर्फे एक लाख रुपयांची मदत जाहिर केली. रिपाइं नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळेयांच्यासह कायर्कर्ते उपस्थित होते. आठवले म्हणाले कीराज्यात २०१३ मध्ये दलित अत्याचाराच्या १ हजार ६३३ घटना घडल्या. तर चालू वर्षात मेच्या सुरुवातीपर्यंत ४१८ घटना घडल्या. त्यात प्रेमप्रकरणातून खर्डा येथील तरुणाचे झालेले हत्याकांडजालन्यातील मातंग समाजातील सरपंचाची हत्याकन्नडमधील दुर्देवी घटना आणि चिखलीतील माणिक उदागे या तरुणाचा खून आदींचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही उदागे कुटुंबियांची भेट घेवून विचारपूस केली. दरम्यान पुणे जिल्हा रिपाईचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, संतोष जाधव यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
---------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)