अविनाश दुधवडे यांना पत्रकारितेतला 'राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०१४' प्रदान
कामगारांच्या प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा व्हावी : बी.जी.कोळसे पाटील
पत्रकार अविनाश दुधवडे यांना पत्रकारितेतला 'राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०१४' प्रदान
खेड तालुका (जि.पुणे ) मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे यांना पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल 'राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०१४' देवून गौरविण्यात आले. |
पिंपरी:
कामगारांच्या प्रश्नांची जागतीक पातळीवर चर्चा होण्याची गरज असून कामगार आणि त्यांच्या संघटनांनी न्याय हक्कासाठी एकत्रित लढा दिला पाहिजे असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात व्यक्त केले.
आज (दि.१) कामगार दिना निमित्त महारॅलीचे व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन श्रमिक एकता महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. त्या प्रसंगी कोळसे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले होते . यावेळी महासंघाचे सेक्रेटरी केशव घोळवे , कार्याध्यक्ष दिलीप पवार, मानव कांबळे, मारुती भापकर,दतात्रेय येळवंडे , अविनाश वाडेकर, आदींनी कामगारांवर कारखानदारांकडून होणारी दडपशाही आणि त्यांच्या हक्कांवर घालण्यात येणारा घाला या बाबत उद्योजक व शासनावर कडक शब्दात टीका केली. महासंघाचे अध्यक्ष ढोकले यांनी पिंपरी चिंचवड व चाकण भागात कामगारांवर होत असलेल्या निलंबन कारवाया व पोलिसांकडून होत असलेल्या दडपशाहीवर कडक शब्दात हल्ला चढविला. यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि कामगार खूप मोठ्या संखेने उपस्थित होते. सर्व प्रथम चाकण येथील तळेगाव चौकापासून महाळुंगे, चाकण एमआयडीसीतून तळवडे मार्गे निगडी येथील भक्तीशक्ती चौकापासून काढण्यात आलेल्या महारॅलीची भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह येथे सांगता झाली. यंदाच्या वर्षीचे जाहीर करण्यात आलेले पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले त्यात ऑप्शन पॉझीटिव्हचे संचालक अरविंद श्रोती यांना 'रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार २०१४ ' तर खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे यांना पत्रकारितेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०१४' प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे सक्रेटरी केशव घोळवे यांनी केले , सूत्रसंचालन दतात्रेय तरटे यांनी केले तर महासंघाचे उपाध्यक्ष दतात्रेय येळवंडे सर्वांचे आभार मानले.
चाकण - महाळुंगे-निगडी -पिंपरी -भोसरी या मार्गे कामगारांनी काढलेली भव्य दुचाकी फेरी |
----------------------------- -----------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा