अनेक कारखानदारांकडे गुंडांची फौज


अनेक कारखानदारांकडे गुंडांची फौज : पत्रकार दुधवडे 

कामगार मेळाव्यात गौप्यस्फोट 
अंकुशराव लांडगे सभागृह (भोसरी) येथील कार्यक्रमात बोलताना पत्रकार अविनाश दुधवडे 




पिंपरी : 

चाकण औद्योगिक वसाहतीत कामगारांवरील दडपशाहीचा विषय वारंवार समोर आला असून  कामगार संघटना आणि व्यस्थापन-उद्योजक यांच्यातील संघर्ष वारंवार समोर येवू लागले आहे.  औद्योगिक क्षेत्रात व्यवस्थापनांनी आणलेला ठेकेदाररुपी  गुंडगिरीच्या नव्या ट्रेंड मुळे  औद्योगिक अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे . येथील बजाज ,महिंद्रा, मिंडा, प्रदीप लॅमिनेटर्स आदी विविध कंपन्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांमध्ये अस्वस्थता पहावयास मिळत असून अनेक कंपन्यांमध्ये कामगारांनी आंदोलनाचे हत्यार आपल्या न्याय मागण्यांसाठी उपसले आहे . अनेक कारखान्यांमध्ये व्यवस्थापनाने गुंडांची फौज तयार केली असून कामगारांना  वेठबिगार पद्धतीने अल्प दारात राबविले जात असल्याचे मत खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे यांनी व्यक्त केले. 
  यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील ,श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले , महासंघाचे सेक्रेटरी केशव घोळवे , कार्याध्यक्ष दिलीप पवार, मानव कांबळे, मारुती भापकर,दतात्रेय येळवंडे , अविनाश वाडेकर आदींसह सुमारे पाच हजार कामगार उपस्थित होते. पुढे दुधवडे म्हणाले  कि, महाराष्ट्राचा  औद्योगिक विकास करताना चाकण येथे पंचवीस वर्षांपूर्वी  ग्रामपंचायत पातळीवरील महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक वसाहत येथे छोट्या स्वरुपात स्थापन करण्यात आली होती .चाकण च्या औद्योगिक विकासाला मोठी पार्श्वभूमी आहे. गेल्या  १२-१५ वर्षांमध्ये जागतिक कीर्तीचे वाहन उद्योगाशी संबंधित फोक्समवॅगन, बजाज, महिंद्रा , ह्युंडाई, मर्सिडीज , सॅन हेवि इंडस्ट्रीज ,ब्रिजस्टोन ,  केहीनफाय, अॅटलस कॉपको अशा अनेक मोठ्या कंपन्या आहेत. याशिवाय इतर ६५० हून  अधिक लहान मोठ्या कंपन्यानी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करीत उत्पादन प्रक्रिया सुरु केली आहे .कारखाने या  भागात आल्यानंतर व चाकण च्या एम आय डी सी तून  प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर वाहने उत्पादित होऊ लागल्या नंतर या भागाची तुलना थेट अमेरिकेतील डेट्रॉइट शी होऊ लागली आहे. चाकण औद्योगिक विकासाच्या चर्चेमुळे जमिनींचे व्यवहार वाढले. शासनाच्या विविध विकास प्रकल्पा सह बांधकाम व्यवसायातील बूम मुळे शेकडो हेक्टर जमिन वळतेय शेतीपासून बिनशेतीकडे यंदाच्या वर्षी वळविली गेली. एमआयडीसी टप्पा १ ते ५ मध्ये  या वर्षाअखेरी पर्यंत ४ हजाराहून अधिक हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे . त्यातच स्वतःच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येवूनही राज्यातील हजारो  कामगार केवळ चाकण परिसरातील या उद्योगांमध्ये कंत्राटी म्हणजे अदृश्य स्वरूपातील कामगार म्हणून वेठबिगार पद्धतीने अल्प दारात राबविले जात असल्याची वस्तुस्थितीही वारंवार समोर येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)