गुलमोहर फुलला ....
गुलमोहर फुलला ....
वैशाख वणव्याच्या कडकडीत चाहुलीतही गुलमोहर बहरले
चाकण (ता.खेड) भागात वैशाख वणव्याच्या रणरणत्या उन्हात फुललेले गुलमोहर |
चाकण:
उन्हामुळे नकोनकोसा वाटणारा प्रवास, उष्णतेमुळे जिवाची होणारी काहिली, घामामुळे चिपचिपलेले अंग यामुळे हा ऋतु सार्यांनाच नकोसा वाटतो. पण याच दरम्यान चैत्रमासात एक जादूगार आपली जादूची कांडी सर्वत्र फिरवत असतो आणि तो जादूगर म्हणजेच "निसर्ग". हेमंत आणि शिशिर ऋतुच्या आगमनाने झाडांवरची पानं हळुहळु गळु लागतात. सगळीकडे धरती अशीच निष्पर्ण, उजाड आणि उदास बसुन ऋतुराज ' वसंताची' वाट पाहत असल्याचे भासते. मात्र वैशाख वणव्याचे आव्हान स्विकारत पावसाळा सुरू होईपर्यंत शेवटी बहरतो तो 'गुलमोहर'. असे अनेक गुलमोहर रखरखत्या उन्हात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही चाकण(ता.खेड) भागात ठिकठिकाणी फुललेले पहावयास मिळत आहेत.
पानं म्हणजे झाडांचा श्वास पण गुलमोहर आपली सगळी पानं गाळून देत असून रखरखत्या उन्हात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ठिकठिकाणी फुललेले पहावयास मिळत आहेत. कुठलाही सुगंध नसलेली गुलमोहर या वृक्षाची झाडे आपल्या आकर्षक रंगाने सर्वाना आकर्षित करून घेत असल्याचे दृष्य चाकण भागात अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
---------------
अविनाश दुधवडे,चाकण मो. ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा