शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची हॅटट्रिक
शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची हॅटट्रिक
---------------------------
१६ मे २०१४- लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हॅटट्रिक केली असून, यांना एकूण सहा लाख ४२ हजार ८२८ मते मिळाली (टपाली मतदान ५८७ ). देवदत्त निकम यांना एकूण तीन लाख ४१ हजार ३७५ (टपाली २२६ ) मते मिळाली. मनसेचे अशोक खांडेभराड यांना ३६४३३ (टपाली १७); तर आपचे सोपान निकम यांना १६ हजार ६५७ मते (टपाली ६ ) मिळाली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रतिष्ठेची लढत करून एकत्रित ताकद लावूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सलग तिसर्यांदा विजय मिळवित हॅटट्रिक केली. आढळराव यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे देवदत्त निकम यांच्यावर तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी विजय मिळविला.
विधानसभा मतदार संघनिहाय आढळराव यांना मिळालेले मताधिक्य - आंबेगाव - 18583, जुन्नर - 25906, भोसरी - 83785, हडपसर - 55498, शिरूर - 54727, खेड - 61639
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांची विजयाची हॅटट्रीक केल्या नंतर सर्वात पहिली अशी प्रतिक्रिया दिली. (छाया:अविनाश दुधवडे,चाकण ) |
खा. शिवाजीराव आढळराव यांचे चाकणला जोरदार स्वागत
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांची विजयाची हॅटट्रीक होऊन सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या नंतर चाकण मध्ये आलेल्या खासदार आढळराव यांचे सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. दरम्यान या संपूर्ण लोकसभा मतदार संघात शिवसेना ,भाजप व आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः जल्लोष केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणून न्याय दिला असून दिल्ली मध्ये शिरूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करून व केंद्र सरकार मध्ये महत्वाची जबाबदारी देवून खा.आढळराव यांच्याकडून शिरूरचा विकास व्हावा अशी अपेक्षा शिवसेनेचे व भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
चाकणच्या तळेगाव चौकात आढळराव व त्यांच्यासोबतच्या वाहनांचा ताफा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी भाजपचे संदीप सोमवंशी, शिवसेनेच्या क्रांती सोमवंशी, प्रीतम शिंदे, शेखर पिंगळे, पांडुरंग गोरे, आदी उपस्थित होते.
शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार आढळराव यांनी पहिल्या फेरी पासून कमालीची आघाडी घेतली होती . शेवटच्या फेऱ्यांमध्ये ही आघाडी दोन लाखांच्या घरात पोहचली . त्या तुलनेत त्यांनी राष्ट्रवादीचे देवदत्त निकम व मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांना खूपच पिछाडीवर सोडल्याने सुरुवातीपासूनच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यांच्या केवळ विजयाची आणि मताधिक्क्याची घोषणा होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली होती.
या मोठ्या विजयाबाबत बाबत आढळराव यांनी सांगितले कि, शिरुर मतदार संघात 'हॅटट्रीक' साधणारे आपण पहिले खासदार ठरलो आहोत. आपल्या विरोधात राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी सभा घेतल्या. खालच्या पातळीवर जावून प्रचार केला. मात्र, आपल्या पारड्यात भरभरुन मतांचे दान टाकून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा माज मोडला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नोंदविली. दरम्यान शिरुरमध्ये महायुतीने खासदार आढळराव पाटील यांना सलग तिस-यांदा संधी दिली. त्याविरोधात शिवसेनेत राजीनामा नाट्य घडले. अशोक खांडेभराड, जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे यांच्यासह अनेक शिवसेनेच्या दिग्गजांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला. आढळराव पाटील यांच्या विरोधात मनसेने खांडेभराड यांना रिंगणात उतरविले. मात्र, त्याचा कोणताही परिणाम आढळराव यांच्या मताधिक्यावर झाला नसल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादीचे देवदत्त निकम, 'आप’चे सोपान निकम यांचेही खासदार आढळराव यांना आव्हान होते. एकूण १४ उमेदवार शिरुरमधून नशीब आजमावत होते. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री यांनी आढळराव यांच्याविरोधात सभा घेतल्या होत्या . एकही खासदार विजयाची 'हॅटट्रीक' साधू शकला नाही हा शिरुरचा इतिहास आहे. मात्र, आढळराव त्याला अपवाद ठरले आहेत. मागील प्रमाणे आपले मताधिक्य अबाधित राखत आढळराव विजयी झाले आहेत.
--------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
Avinash Dudhawade,chakan 9922457475
shivajirav Adhalrao news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा