पोस्ट्स

सप्टेंबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खेड तालुक्यातील पंधरा जणांना 'गणराया अवार्ड' प्रदान

इमेज
खेड तालुक्यातील पंधरा जणांना 'गणराया अवार्ड'  प्रदान  चाकण : वार्ताहर   खेड पंचायत समितीचे आदर्श सदस्य अॅड.सोमनाथ दौंडकर व महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा नंदाताई प्रतापराव खांडेभराड यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व मोलाचे योगदान देणाऱ्या  खेड तालुक्यातील पंधरा जणांना  'गणराया अवार्ड' देवून चाकण येथील मानाच्या नवयुग मित्र मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.  यंदाच्या वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अनोखा उपक्रम या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरु केला असून प्रत्येक वर्षी असे पुरस्कार देण्यात येणार आहेत .     यंदाच्या वर्षी तालुक्यातील पंधरा जणांना हा पुरस्कार सोमवारी (दि.9) प्रदान करण्यात आला. हे अवार्ड यंदाच्या वर्षी खेड पंचायत समितीचे आदर्श सदस्य व युवा कार्यकर्ते अॅड. सोमनाथ दौंडकर ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अविनाश अरगडे, सामाजवादी कार्यकर्ते मामासाहेब शिंदे, आरटीआय कार्यकर्ते विलास बारवकर ,उद्योजक योगेश झगडे, प्रा.किशोर गोरे, युवा कार्यकर्ते रामदास जाधव , सरफराज सिकीलकर, बी.एम.आवटे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा नंदाताई प्रतापराव खां

चाकणला नगरपरिषद स्थापण्यापूर्वी शासनाकडून सर्व बाबींची पडताळणी

इमेज
चाकणला नगरपरिषद स्थापण्यापूर्वी शासनाकडून सर्व बाबींची पडताळणी  मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची घेतली कार्यकर्त्यांनी भेट  चाकण: अविनाश दुधवडे  चाकण नगर परिषदेसाठी उद्घोषणा राज्य शासनाने जाहीर करीत या बाबतचा अध्यादेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याने याबाबतच्या हरकती आणि अन्य तांत्रिक बाबी विचारात घेवून चाकण साठी ग्रामपंचायती एवजी नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तीत्वात आणण्याचेच राज्य शासनाचे प्रयोजन आहे. मात्र तत्पूर्वी  चाकणपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द जवळच असल्याने ही गावे महापालिकेत का समाविष्ट करू नयेत, असा केवळ विचारणा सरकारने केली आहे. व या बाबतचा सविस्तर अभ्यास अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना केली होती. प्रत्यक्षात चाकण परिसराचे विलीनीकरण करण्याचा कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला असून सर्व बाबी तपासण्यात येत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव  जयंत कुमार बांठिया  यांनीही स्पष्ट केले आहे .   या बाबत युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते निलेश कड पाटील , अनुराग जैद यांच्या नेतृत्वाखालील कायर्कर्त्यांच्या शिष्ट मंडळाने राज्याचे मुख्य सचिव  जयंत कुमा

चाकणला मुसळधार पावसाने झोडपले ...

इमेज
चाकणला मुसळधार पावसाने झोडपले ... चाकण:वार्ताहर- दीर्घ विश्रांती नंतर चाकण परिसरात पावसाचे विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासोबतच सोमवारी पुनरागमन केलेल्या पावसाने आज (दि. 10) दुपार नंतर चाकण परिसराला चांगलेच झोडपून काढले. विजांचा कडकडात व जोरदार वाऱ्यासह बरसलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची व देखाव्यांची कामे करणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दैना झाली. पाऊस सुरु होताच देखाव्यांच्या मुर्त्या झाकण्यात आल्या ,मात्र देखावे सजावटीची कामे ठप्प झाली आहेत . सायंकाळी उशिरा पर्यंत पावसाचा जोर कायम होता . आज अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने चाकण परिसरातील गणेश मंडळे, बाजारपेठेची अक्षरशः दाणादाण उडवली. दीर्घ विश्रांती नंतर परतलेल्या पूर्वा नक्षत्रातील पावसाने दिलासा मिळत असला तरी गणेशोत्सवातील देखाव्यांच्या सजावटी दरम्यान येत असलेल्या धुवाधार पावसाने मंडप, डेकोरेशन, मूर्ती, पताका आदी सजावटीचे साहित्य ओले व खराब होत असल्याच्या तक्रारी मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी करीत आहेत. ----------------- फोटो मेल करीत आहे फोटो ओळ: चाकण परिसरात मंगळवारी दुपार नंतर सुरु झालेल्या मुस

राज्यात सिलिग कायदा येवू देणार नाही : हर्षवर्धन पाटील

इमेज
राज्यात सिलिग कायदा येवू देणार नाही : हर्षवर्धन पाटील कावेरी पेट्रोल पंपाचे दिमाखदार उद्घाटन चाकण: अविनाश दुधवडे  सीलिंग कायदा येणार, अशी शेतकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे मात्र सीलिंग कायदा अमलात येणार नाही आणि कॉंग्रेस सरकार कुठल्याही परिस्थिती तो अमलात आणणार नाही, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चाकण (ता. खेड) येथे दिली. चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे -तळवडे रस्त्यावर महिंद्रा कंपनी समोर नव्याने सुरु करण्यात आलेल्या येथील इंडियन ऑईलच्या कावेरी पेट्रोल पंपाचे उद्घाटन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे होत्या. यावेळी इंडियन ऑईलचे मुख्य मंडल रिटेल प्रबंधक श्रीमान सुब्रतकर,प्रबंधक नरेंद्र गंगाखेडकर , महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई सातपुते, तालुकाध्यक्षा नंदाताई कड, दिंडी सोहळ्याच

चाकण ग्रामपंचायतीची नोंदवही क्रमांक 17 गेली कुठे?

इमेज
चाकण ग्रामपंचायतीची नोंदवही क्रमांक 17 गेली कुठे? नोंदवहीला पाय कसे फुटले ... प्रश्न नाजूक अन उत्तर कठीण चाकण: अविनाश दुधवडे चाकण ग्रामपंचायतीच्या सरपंचांची रवानगी बारा दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर आता येरवड्याच्या कारागृहात झाली आहे. बोगस आठ अ च्या याच उताऱ्या प्रकरणी आणखी सहा जणांवर फास आवळण्यात आल्याने प्रमुख आरोपी मानण्यात आलेल्या सरपंचांच्या सुटकेच्या वाटा खडतर झाल्या आहेत. मात्र कच्च्या नोंदी घालण्यासाठी वापरण्यात आलेले व अखेर पर्यंत जीव तोडून सरपंच सांगत असलेले त्याच प्रमाणे काही कर्मचाऱ्यांच्या जबाबातही आलेले 17 नंबरचे रजिस्टर कुठे गेले हे कुणालाच माहिती नाही. या रजिस्टरला पाय कसे फुटले हा प्रश्न सर्वांनाच अंतर्मुख करणारा असल्याचे नागरिक बोलत आहेत . या नोंदी घालण्याचे डाव ज्यांनी रचले, त्याच मंडळींना नोंदवही बाहेर काढण्याचे ग्रामपंचायतीतील गुप्त दरवाजेही ठाऊक असणार. अचानक पणे कारस्थानाने वही गायब होणे, पाने फाडली जाणे आणि रेकॉर्ड चोरी होणे, हे प्रकार सहजासहजी होऊ शकतील यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवत नाही... अशी प्रतिक्रि

नवव्या दिवशीही मिरवणुका व विसर्जनास गर्दी

इमेज
चाकण मध्ये दोन दिवस कडेकोट बंदोबस्त  नवव्या दिवशीही मिरवणुका व विसर्जनास गर्दी  चाकण: अविनाश दुधवडे   अनंतचतुर्दशी दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये राखीव दलासह, होमगार्ड व ग्रामीण दलातील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. आजच्या नवव्या दिवशी या भागातील काही सार्वजनिक मंडळांसह औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांतील गणरायाचे विसर्जन करण्यात आले, आज मंगळवारपासून बुधवारी उशिरा पर्यंत या भागात तब्बल सव्वाशे मंडळे व हजारो घरगुती गणेशाचे विसर्जन होणार असल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, पोलिसांवर प्रचंड ताण पडणार आहे.                 चाकण व परिसरातील संकल्प प्रतिष्ठाण सह परिसरातील दहा सार्वजनिक मंडळांनी व विविध कंपन्यांतील सार्वजनिक मंडळांपैकी आज (दि.17)  नवव्या दिवशी गणेशाचे  मिरवणुकीने विसर्जन केले . आजच्या नवव्या दिवशी विसर्जनात ढोल पथकांचा चांगलाच जोर दिसला. डीजे वरील बंदीच्या पार्श्वभूमीवर उद्याही  ढोल पथकांचाच जोर पहावयास मिळणार असून याभागातील बहुतांश सार्वजनिक मंडळानी चाकण पोलिसांकडे डीजे वरील बंदी
इमेज
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे शाखेचे उद्घाटन चाकण: अविनाश दुधवडे    पु णे जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या चाकण जवळील महाळुंगे इंगळे (ता.खेड) येथील 11 व्या शाखेचा भव्य शुभारंभ रविवारी (दि.15) सकाळी दिमाखात पार पडला. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ,खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, माजी आमदार अॅड. रामभाऊ कांडगे, माजी मंत्री लीलाधर डाके, यांच्यासह बँकेचे पदाधिकारी, सभासद, सर्वपक्षीय पदाधिकारी ,कार्यकर्ते ,परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.  महाळुंगे इंगळे येथील या 11 व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, सामान्यातील सामान्य माणूस हा सहकारी बँकांचा खरा आधार मानून काम करणाऱ्या राजगुरुनगर बँकेने सामान्य माणसांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण केले असून त्यामुळेच सहकार क्षेत्रात हि बँक सर्वात वेगाने विस्तारत आहे. आमदार दिलीप मोहिते-पाटील म्हणाले की, चाकण सारख्या भागात शेकडो बँकांनी आपले बस्तान बसविलेले असताना राजगुरुनगर बँक आजही इतर बँकांच्या तुलनेत प्रगती पथावर आहे. पारदर्शी कारभार आणि