चाकण मधील अतिक्रमण हटाव ला पोलिसांच्या फौजफाट्याने धार ....
चाकण मधील अतिक्रमण हटाव ला पोलिसांच्या फौजफाट्याने धार ............ अनेक रस्त्यांनी चौकांनी कित्येक वर्षांनी घेतला मोकळा श्वास कारवाईचा अतिरेक झाल्याची नागरिकांची तक्रार --------------------------------------------- जु न्या पुणे-नाशिक रस्त्यावरील अतिक्रमणे अनेक वर्षानंतर हटविण्यात येथील पोलिसांसह ग्रामपंचायत प्रशासनास यश आले आहे. व वाहतुकीच्या कोंडीतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्या इतका रस्ता रस्ता रुंद झाला असून त्यामुळे अनेक वर्षानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असला तरी कुठलीही सूचना न देता खूप मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाल्याने अनेक स्थानिकांच्या धंद्या व्यवसायावरच टाच आली आहे. मालकी हक्काच्या जागेंवरही सर्रास बुलडोझर फिरल्याने या कारवाईचा अतिरेक झाल्याबाबतचा नाराजीचा सूर सर्वच स्तरातून एकू येत आहे. चाकण मधील तळेगाव चौक, माणिक चौक, महात्मा फुले चौक, आंबेठाण चौक आणि सर्वच महत्वाच्या ठिकाणांवरील व जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी झालेले अतिक्रमण पोलिसांनी हटविल्याने वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होणार आहे. मात्र सध्या पाडण्यात आलेल्या अतिक्रमित जागेवर