पोस्ट्स

चाकण मध्ये तब्बल तीन हजार बोगस नळ कनेक्शन???

इमेज
चाकण मध्ये तब्बल तीन हजार बोगस नळ कनेक्शन??? चाकण: अविनाश दुधवडे  चाकण शहरात गेल्या काही वर्षांपासून पाणी पुरवठ्याचा विषय ऐरणीवर आला आहे. अनियमित ,कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याने आणि बऱ्याचदा दोन-दोन दिवस कोरड्या ठणठणीत राहणाऱ्या नळांच्या तोट्यांनी अनेकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. चाकण ग्रामपंचायतीच्या अनेक ग्रामसभा पाण्याच्या मुद्द्यावर वादळी ठरल्याचे सर्वश्रुत आहेच. यासाठी अन्य बाबी कारणीभूत असल्या तरी शहरातील मोठ्या आकारांची बोगस नळ कनेक्शनही जबाबदार आहेत. शहरातील विविध भागात तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक बोगस नळ कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब उघडकीस येत आहे.    चाकण शहरातील एकता नगर,कांडगे वस्ती ,मार्केटयार्ड परिसर,शिक्षक कॉलीनी ,आगरवाडी,पठारवाडी,राक्षेवाडी ,आंबेडकरनगर, खंडोबामाळ, बलुत आळी, बाजारपेठ, देशमुखआळी,भुजबळ आळी ,माणिक चौक , राणूबाई मळा ,दावडमळा ,झित्राई मळा , आंबेठाण चौक परिसर आदी चाकण मधील सर्व सहा वार्डांच्या टापूत ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यात राणूबाईमळा व झित्राई मळा परिसरात चाकण औद्योगिक वसाहत व  महाराष्ट्न जीवन प्राधिकरणा...

चाकणची 'घोकंपट्टी' जिल्ह्यात प्रथम

इमेज
चाकणची 'घोकंपट्टी' जिल्ह्यात प्रथम  आंतरशालेय नाट्य स्पर्धेत सादर केली उत्कृष्ट कला  चाकण: वार्ताहर - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धेत चाकण च्या शिवाजी विद्यालयाच्या घोकंपट्टी या एकांकिकेचा माध्यमिक मुलींच्या गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला.राणी लक्ष्मीबाई विद्यालय कासार आंबोली येथे येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण 65 विद्यालयांच्या एकांकिका सदर झाल्या. यामध्ये चाकण च्या श्री.शिवाजी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थीनिनी घोकंपट्टी हि एकांकिका सादर केली. या उत्कृशात्ब एकांकिकेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. या एकांकिकेचे दिग्दर्शन व संगीत कु.संध्या सहाने ,प्रकाश योजना कु.अनिकेत नायकवाडी,नेपथ्य कु.सुहास कांडगे,व कु.अश्विनी राऊत ,लेखन दीपक माडेकर, यांनी केले. या मध्ये कु. स्वप्नाली टोके, गौरी गोरे,ऋतुजा वाघ, रोशनी घायाळ,प्रतिभा कदम, या सर्व विद्यार्थीनिनी अप्रतिम कला सादर केली. यासाठी प्रशालेचे प्राचार्य लालासाहेब भुजबळ,उपप्राचार्य मार्तंड खोडदे , पर्यवेक्षक शिवाजी वाळे, अरुण देशमुख,सुभाष गारगोटे...

जनसेवा बँक सामाजिक बांधिलकी जोपासणारी : तावडे

इमेज
जनसेवा बँक सामाजिक बांधिलकी जोपासणारी : तावडे  चाकण: अविनाश दुधवडे, -  जनसेवा सहकारी बँक सामाजिक बांधिलकी जाणून काम करणारी सर्वसामान्यांची बँक आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी चाकण जवळ खराबवाडी (ता. खेड) येथे आज (दि.23) केले. जनसेवा सहकारी बँकेच्या 29 व्या शाखेचा खराबवाडी (चाकण) येथे आज शुभारंभ करण्यात आला. या चाकण शाखेचे व एटीएम सेवेचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तावडे बोलत होते. या प्रसंगी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेड चे आमदार दिलीप मोहिते पाटील, मावळचे आमदार संजय तथा बाळासाहेब भेगडे, खराबवाडीच्या सरपंच योजनाताई सोमवंशी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश गोरडे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पतकी , भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सोमवंशी, पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, तालुका राष्ट्रवादीचे अरुण सोमवंशी, हिंदुस्तान ग्रुपचे संजय राऊत , आशा बुचके, आदींसह  सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.   पुढे बोलताना तावडे म्हणाले की, राज्यातील दु...

वडगाव ते चौफुला राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा

इमेज
वडगाव ते चौफुला राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा नागमोडी रस्ते,धोकादायक वळणे, अवजड वाहतुकीने अपघात नित्याचे अवजड वाहतुकीला नियमावलीची गरज चाकण:महेंद्र दुधवडे चाकण भागातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव व शिक्रापूर राज्यमार्ग क्रमांक 55 वर लांब आकाराच्या कंटेनरची वाहतूक कमालीची वाढली असून, यातून होणाऱ्या अपघातांमुळे कंटेनर वाहतुकीला काही नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेकडो जणांना या रस्त्यावरील अपघातांमधुन आपले प्राण गमवावे लागले आहेत. ट्रकसहीत साधारणत: 30 ते 40 फूट लांबीचे हे कंटेनर येथील रस्त्यांवरून आणि महामार्गावरून दिवसभरात शेकडोंच्या संख्येने जात असतात. आपल्या ताब्यातील वाहन लांबीला अधिक आहे, याचा थोडाही विचार न करता कंटेनरचालक बेदरकारपणे वाहन चालवित असल्याचे असंख्य अनुभव आजवर पादचारी व अन्य वाहनचालकांना आले आहेत. उंचीला ट्रकसह 19 फूट व लांबीला 30 फूट अशा कंटेनरमधील बॉक्समधून विविध प्रकारच्या मालाची वाहतूक केली जाते. किमती मालवाहतूक सुरक्षित व निर्धोक व्हावी, या हेतूने कंटेनर बॉक्सचा वापर केला जातो. मात्र माल सुरक्षित नेण्याच्या प्रयत्नांत...

त्याच्याकडे आहे जिद्द आणि अंधश्रध्दा निर्मूलनाचे सामर्थ्य

इमेज
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी शाळकरी विद्यार्थाचे जादूचे प्रयोग  त्याच्याकडे आहे जिद्द आणि अंधश्रध्दा निर्मूलनाचे सामर्थ्य  चाकण: -  अविनाश दुधवडे  समाजात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या गोष्टीचा गैरफायदा घेवून अनेक भोंदू बाबा तंत्र मंत्राचा आधार घेवून विविध चमत्कार दाखवून नागरिकांची दिशाभूल करून पैसे उकळत असतात .या प्रकारामुळे समाजात अंधश्रद्धेचे लोन मोठ्या प्रमाणत पसरत असून विविध समस्या निर्माण होताना दिसून येत आहेत.या समस्येवर मात करण्यासाठी अवघा सोळा वर्षांचा शाळकरी विद्यार्थी असलेला नवोदित जादुगार अरूप कुमार  जादूच्या प्रयोगातून नागरिकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करून त्यांना वास्तवतेची जाणीव करून देत आहे.सोळा वर्षांच्या या नवोदित जादुगाराने चाकण सह जिल्ह्याच्या विविध भागात आजवर सुमारे दोनशे पेक्षा अधिक प्रयोग करीत नागरिकांना जागृत करण्याचा एकाकी प्रयत्न चालविला आहे.  अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसल्याने समाजात आज जादूटोणा,भूतबाधा,दैवी चमत्कार,भोंदुगिरीचे प्रमाण वाढले आहे.चाकण मध्ये अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी असे अनेक भ...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

इमेज
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ देशकर यांचा सत्कार करताना खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे .....

बैलगाडा शर्यतींचा अडथळा झाला दूर ...

इमेज
बैलगाडा शर्यतींचा अडथळा झाला दूर ... बैलगाडा शर्यत बंदीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती बैलगाडा चालक,मालक,शौकीनांमध्ये उत्साह यात्रांची उत्कंठा वाढणार चाकण:अविनाश दुधवडे गावा कडच्या यात्रा जत्रांमध्ये सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या बैलगाडा शर्यतींवर लादण्यात आलेली बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींवर अखेर मागे घेत बंदीला स्थगिती दिली असून यंदा पुन्हा एकदा गावाकडच्या यात्रांमध्ये भिर्र.. झाली उचल की टाक ..हा नेहमीचा घाटातील सूर कानी पडणार आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती मिळाल्याचे वृत्त याभागात येवून धडकताच बैलगाडा चालक आणि मालकांनी आनंद व्यक्त केला आहे.आता यापुढे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार दि.15) दिलेल्या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत आयोजकांना दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयाने डिसेंबर 2011 मध्ये बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह खेड येथील बैलगाडा मालक रामकृष्ण टाकळकर, आबा शेवाळे,यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्...