वादांमुळे यात्रांच्या होताहेत जत्रा

कोये गावच्या यात्रेत दोन गटात तुंबळ हाणामारी
१२ जण जखमी ३२ जणांच्या जमावावर गुन्हे दाखल
वाहनांवर दगडफेक परस्पर विरोधी तक्रारी
चाकण:
 कोये (ता.खेड) येथील यात्रेत परंपरेनुसार बैलांची मिरवणूक सुरु असताना मुलीला घोडीवर बसवून फोटो काढल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या  वादातून लोखंडी गजदगड  व लाकडी दांडक्यांनी झालेल्या तुंबळ हाणामारीत महिला पुरुषांसह अनेक जन जखमी झाले असून बारा जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार आहेत. या घटनेत काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून घरात घुसून काही घरांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारींवरून ३२ जणांच्या जमावावर चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी शनिवारी (दि.९) रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 कोये (ता.खेड) गावाचे पोलीस पाटील साहेबराव मुरलीधर राळे ( रा. कोये,ता.खेड) यांच्या फिर्यादीवरून बबन गोविंद राळे,पोपट राळेबाबाजी राळे,नितीन गोपाळे,किरण तनपुरेप्रदीप राळेअविनाश राळेराहुल राळे,किरण राळेअतिश राळेस्वप्नील राळेसंतोष गोपाळेमोतीराम कान्हुरकर,आकाश राळेअविनाश सुरेश राळे ( सर्व रा. कोये,ता.खेड,जि.पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सोळा जणांची नावे आहेत. तर अरुण गोविंद राळे (वय ५० रा.कोये) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहेबराव मुरलीधर राळेअर्जुन राळेमंगेश राळेसमीर राळेरामदास राळेबलभीम राळेअमर राळेशंकर राळेविकास राळेरामदास राळे,भरत राळे,विशाल राळेआकाश साहेबराव राळेशरद राळेविक्रम राळेरमेश बळवंत राळे ( सर्व जन रा. कोयेता. खेड) या सोळा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिरवणूकीत मुलीला घोडीवर बसवून फोटो काढण्याच्या किरकोळ कारणावरून पेटलेल्या वादातून दोन्ही गटांनी बेकायदा जमाव जमवून दगड,काठीटॉमीने परस्परांना मारहाण केली आहे. साहेबराव राळे यांच्या फिर्यादीवरून सोळा जणांवर बेकायदा गर्दी जमवून बेदम मारहाण केल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम १४३,१४६,१४७,१४८,१४९,३२६,४५२,४२,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अरुण राळे यांच्या फिर्यादीवरून विरोधी गटाच्या सोळा जणांवर भा.दं.वि. कलम १४३,१४६,१४७,१४८,१४९,३२३,३२४,४२५,४२७,३३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जखमींवर पाईट भागातील शासकीय रुग्णालयात आणि काही खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेश ढवाण व त्यांचे सहकारी करीत आहेत. 

वादांमुळे यात्रांच्या होताहेत जत्रा:
गावोगावी सध्या यात्रांचा हंगाम सुरु झाला आहे. या यात्रांमध्ये जुने वादविवादगावकीच्या राजकारणाचे मतभेद उकरून काढून गंभीर स्वरूपाच्या हाणामाऱ्या होऊ लागल्या असल्याने संवेदनशील गावांच्या यात्रा निर्भेळ आनंदाला मुकत चालल्या आहेत. वर्षभर शेतामध्ये राब राब राबणाऱ्या कष्टकऱ्यांनी हंगाम संपल्यानंतर फुरसतीच्या दिवसांमध्ये दोन-चार दिवस आनंदोत्सव साजरा करण्याची आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर पडलेल्यांनी यात्रेला गावी येण्याची ही जुनी रीत अशा विवादांनी धोक्यात आली आहे. यात्रोत्सव साजरा करण्यामागील मूळ प्रेरणाच लोप पावत आहे. त्यामुळे असे टोकाचे वाद ,हाणामाऱ्या होऊन यात्रेची जत्रा होणार नाही याकडे सर्वच गावांच्या कारभार्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
------------
------------ 
अविनाश दुधवडे,चाकण, मो. ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)