प्रशालांची सकाळ रंगली योगसाधनेत...
प्रशालांची सकाळ रंगली योगसाधनेत...
चाकण मधील चित्र
चाकण:
चाकणमधील शिवाजी विद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने योगासने केली. ( छायाचित्र : प्रणव दुधवडे,चाकण) |
चाकण परिसरातील सर्वच प्रशालांतील मंगळवारी (दि. २१) विद्यार्थांमध्ये योग दिनाचा प्रचंड उत्साह दिसून आला. २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर झाल्यानंतरच्या या दुसऱ्या योग दिनानिमित्त चाकण शहर व परिसरातील विविध प्रशालांत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चाकण मधील शिवाजी विद्यालयाच्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी सकाळी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने योगधारणा केली.
प्रशालेच्या भव्य प्रांगणात झालेल्या यायोगसाधनेसाठी हजारो विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सकाळी आठचे या दरम्यान योगासने केली. मानवाची शारीरिक व मानसिक स्थिती मजबूत ठेवणारी योग विद्या हा अद्भुत ठेवा आहे. भारताच्या या योगविद्येचे महत्त्व जगाला पटले आहे. दररोज योगासने करून शरीर व मनसंपदा तंदुरुस्त ठेवा, असे आवाहन यावेळी शिक्षकांनी केले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार पाटील, सुभाष गारगोटे, ए.एस.देशमुख, डी.डी.गोरे, अशोक शेवकरी, अनिल ठुबे , राजू दीक्षित, अण्णासाहेब कोडग,राजेंद्र खरमाटे , व्ही. एल. साकोरे, बाळासाहेब जाधव, व नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते. आज सर्वत्र जागतिक योग दिवस साजरा होत असताना, चाकण परिसरातही तो विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालये,सामाजिक, सांस्कृतिक संघटना आदींच्या मार्फत उत्साहात साजरा करण्यात आला.
---------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा