गुणवंत विद्यार्थी आणि पत्रकारांना पुरस्कार प्रदान

गुणवंत विद्यार्थी आणि पत्रकारांना पुरस्कार प्रदान
श्रमिक एकता महासंघाचा उप्रकम 
चाकण: 
पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस श्री. अविनाश लक्ष्मण दुधवडे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करताना माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील व दत्तात्रेय येळवंडे 

  चाकण औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची दहावी आणि बारावीच्या परिक्षांमध्ये उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेली मुले व खेड तालुक्यात पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणारे पत्रकार यांचा गौरव व  पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन श्रमिक एकता महासंघाच्या वतीने शिरोली (ता. खेड) येथे रविवारी (दि.१२) करण्यात आले होते . यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरेमाजी आमदार दिलीप मोहितेश्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले महासंघाचे सेक्रेटरी केशव घोळवेकार्याध्यक्ष दिलीप पवारकार्यक्रमाचे आयोजक कामगार नेते दतात्रेय येळवंडेअविनाश वाडेकरबाजार समितीचे उपसभापती अशोक राक्षे ,पंचायत समितीचे उपसभापती सतीश राक्षे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोरशीला शिंदेनिघोजे च्या सरपंच सुनिता येळवंडे ,मोहन वाडेकर,रवींद्र सावंतआदींसह चाकण आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि कामगार खूप मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रथम वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर यंदाच्या वर्षी चांगल्या गुणांनी यशस्वी झालेले विद्यार्थी व तालुक्यातील पत्रकार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस पत्रकार अविनाश दुधवडे यांच्यासह पत्रकार कोंडीभाऊ पाचारणे, राजेंद्र लोथेरामचंद्र सोनवणेसुनील थिगळेराजेंद्र मांजरे आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार सुरेश गोरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले किसमाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्यास निष्पक्ष काम करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास दुणावतो. परिसरामध्ये घडणाऱ्या घडामोडीबरोबरच समाजाच्याप्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्वाचे असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
-------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)