उद्योगांसाठी लालफितीचा केला लालगालीचा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजप सरकारने उद्योगांसाठी लालफितीचा केला लालगालीचा 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

चाकण:
मर्सिडीझ बेन्झसाठी इंजिनाची जोडणी करणाऱ्या फोर्स मोटर्सच्या चाकण एमआयडीसी मधील नव्या अत्याधुनिक प्रकल्पाच्या कार्यक्रमास उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापटफोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदियामर्सिडीझ बेन्झचे ग्लोबल हेड फ्रॅंक डाईसखासदार अमर साबळे   ( छाया: अविनाश दुधवडे,चाकण)


   वाहन उद्योगांचा प्रचंड वाढता कल पाहता पुणे आपल्या भागाचे डेट्रॉईट शहर म्हणून उदयास येत आहे.  मेक इन इंडिया मध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीलोकसंख्या आणि मागणी या त्रिसूत्रीचा फायदा उद्योगांनी घ्यायला हवा. सध्याच्या केंद्र व राज्य शासनाने लालफितीचे (रेड टेप) रुपांतर रेड कार्पेट (लाल गालीचा) मध्ये केले आहे. पुण्याला स्टार्टअप हब बनवण्याचे राज्य सरकारने ठरवले असून या क्षेत्रात पुणे  बंगळुरूलाही मागे टाकेल तेवढी क्षमता पुण्यात आहे. केंद्र सरकारने उद्योगांना  अडचणीच्या वाटणाऱ्या पर्यावरण आणि प्रदूषणविषयक नियमांमध्ये अमुलाग्र बदल केले असून उद्योगांना त्यांचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २२) चाकण (ता. खेड,जि.पुणे) औद्योगिक वसाहतीमध्ये केले.
शुभारंभ करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
   मर्सिडीझ बेन्झसाठी इंजिनाची जोडणी करणाऱ्या फोर्स मोटर्सच्या चाकण एमआयडीसी मधील नव्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकरजिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट,फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदियामर्सिडीझ बेन्झचे ग्लोबल हेड फ्रॅंक डाईसखासदार अमर साबळेआमदार संजय (बाळा) भेगडेमहेश लांडगे पुणे तसेच चाकण व पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
     पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले किऔद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयांचा उद्योगांच्या वाढीसाठी फायदा होत आहे. केंद्र शासनच्या पर्यावरण विभागाने उद्योगांच्या संदर्भात असलेल्या नियमावलीत सुधारणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी जाहीर आभार मानले.  पुण्याला स्टार्टअप हब बनवण्याचे राज्य सरकारने ठरवले असून या क्षेत्रात पुणे  बंगळुरूलाही मागे टाकेल तेवढी क्षमता पुण्यात आहे. उद्योगांच्या भरभराटीसाठी  योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
       फोर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांनी प्रास्ताविकात सांगितले किफोर्स मोटर्स आणि मर्सिडीझ बेन्झच्या मागील ४५ वर्षांपासूनच्या प्रवासातला हा अत्यंत महत्वाचा टप्पा असून या प्रकल्पातील आठ जोडणी सुविधांमध्ये मर्सिडीझ बेन्झच्या सर्व गाड्यांना लागणारी चौदा प्रकारची इंजिने बनवण्यात येणार आहेत. किफायती,विश्वसनीय आणि कुशल उत्पादने करून त्या द्वारे जनतेसाठी स्वस्त परिवहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी फोर्स मोटर्स प्रयत्नशील राहणार आहे.
       सुमारे १ लाख ३० हजार चौरस फूट जागेवर चाकण औयोगिक क्षेत्रातील नाणेकरवाडी (ता. खेड) हद्दीत उभारण्यात आलेला हा नवा प्रकल्प फोर्स मोटर्सच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आहे. फोर्स मोटर्सने या प्रकल्पात १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून पुढच्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने आणखी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. फोर्स मोटर्स मर्सिडीझ बेन्झला आतापर्यंत ६० हजारपेक्षा जास्त इंजिने आणि ५० हजारांहून अधिक ऍक्सल पुरवले आहेत. फोर्स मोटर्सच्या या नव्या प्रकल्पामध्ये वर्षाला २० हजार इंजिन आणि गाड्यांचे पुढचे आणि मागचे प्रत्येकी २० हजार ऍक्सलची निर्मिती करण्यात येणार आहे. पुढील काळात गरजेप्रमाणे ही क्षमता वाढविण्यात येणार आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाकडे पाठ  :
  फोर्स मोटर्सच्या चाकण एमआयडीसी मधील नव्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उदघाटन समारंभासाठीच्या पत्रिकेत शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि खेड तालुक्याचे स्थानिक आमदार सुरेश गोरे यांच्या नावाचा समावेश नव्हता . त्यामुळे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाकडे त्यांनी सपशेल पाठ फिरविली. राज्य शासनातील सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही निमंत्रित न केल्या बद्दल आणि स्थानिक युवकांच्या रोजगारा संदर्भात कसल्याही तडजोडीची भूमिका नसल्यानेच केवळ भाजपला सोबत घेवून कार्यक्रम केला असावा अशी खोचक टिप्पणी आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केली.

----------------
अविनाश दुधवडे,चाकण 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)