कोये गावच्या यात्रेत दोन गटात तुंबळ हाणामारी १२ जण जखमी ; ३२ जणांच्या जमावावर गुन्हे दाखल वाहनांवर दगडफेक ; परस्पर विरोधी तक्रारी चाकण: कोये (ता.खेड) येथील यात्रेत परंपरेनुसार बैलांची मिरवणूक सुरु असताना मुलीला घोडीवर बसवून फोटो काढल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी गज , दगड व लाकडी दांडक्यांनी झालेल्या तुंबळ हाणामारीत महिला पुरुषांसह अनेक जन जखमी झाले असून बारा जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार आहेत. या घटनेत काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून घरात घुसून काही घरांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारींवरून ३२ जणांच्या जमावावर चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी शनिवारी (दि.९) रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोये (ता.खेड) गावाचे पोलीस पाटील साहेबराव मुरलीधर राळे ( रा. कोये , ता.खेड) यांच्या फिर्यादीवरून बबन गोविंद राळे , पोपट राळे , बाबाजी राळे , नितीन गोपाळे , किरण तनपुरे , प्रदीप राळे , अविनाश राळे , राहुल राळे , किरण राळे , अतिश राळे , स्वप्नील राळे , संतोष गोपाळे , मोतीराम कान्हुरकर , आकाश राळे , अविनाश सुरेश राळ