पोस्ट्स

मे, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची हॅटट्रिक

इमेज
 शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची हॅटट्रिक --------------------------- १६ मे २०१४-  लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हॅटट्रिक केली असून, यांना एकूण सहा लाख ४२ हजार ८२८  मते मिळाली (टपाली मतदान ५८७ ). देवदत्त निकम यांना एकूण तीन लाख ४१ हजार ३७५  (टपाली २२६ ) मते मिळाली. मनसेचे अशोक खांडेभराड यांना ३६४३३  (टपाली १७); तर आपचे सोपान निकम यांना  १६  हजार ६५७  मते (टपाली ६ ) मिळाली.         राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रतिष्ठेची लढत करून एकत्रित ताकद लावूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सलग तिसर्‍यांदा विजय मिळवित हॅटट्रिक केली. आढळराव यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे देवदत्त निकम यांच्यावर तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी विजय मिळविला.  विधानसभा मतदार संघनिहाय आढळराव यांना मिळालेले मताधिक्‍य - आंबेगाव - 18583, जुन्नर - 25906, भोसरी - 83785, हडपसर - 55498, शिरूर - 54727, खेड - 61639 शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांची विजयाची हॅटट्रीक केल्या नंतर सर्वात पहिली अशी प्रतिक्रिया दिली. (छाया:अविनाश दु

दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या ; खा.आठवले

इमेज
दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या  ;  खा.आठवले चाकण: राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक बाब असून  जातीयवाद करणा-यांविरोधात गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घ्यावीच ,  दलित अत्याचार रोखण्यासाठी पोलीस दलास योग्य ते आदेश द्यावेत ,  अशी मागणीही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असल्याच्या कारणावरून माणिक उदागे याची हत्या झाली या पिडीत कुटुंबियांची खासदार आठवले यांनी चिखली येथे भेट घेतली. त्यांची चौकशी करत रिपाइंतर्फे एक लाख रुपयांची मदत जाहिर केली. रिपाइं नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे ,  यांच्यासह कायर्कर्ते उपस्थित होते. आठवले म्हणाले की ,  राज्यात २०१३ मध्ये दलित अत्याचाराच्या १ हजार ६३३ घटना घडल्या. तर चालू वर्षात मेच्या सुरुवातीपर्यंत ४१८ घटना घडल्या. त्यात प्रेमप्रकरणातून खर्डा येथील तरुणाचे झालेले हत्याकांड ,  जालन्यातील मातंग समाजातील सरपंचाची हत्या ,  कन्नडमधील दुर्देवी घटना आणि चिखलीतील माणिक उदागे या तरुणाचा खून आदींचा ठळकपणे उल्लेख क

चाकणची यात्रा यंदाही बैलगाडा शर्यती, आखाड्याशिवाय

चाकणची यात्रा यंदाही बैलगाडा शर्यती ,  आखाड्याशिवाय पालखी ,  छबीना  , मिरवणूक ,  लोकनाट्य कार्यक्रमांचे आयोजन चाकण :       चाकण येथे बुधवारी (दि. १४)  श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त भैरवनाथांचा अभिषेक ,  ग्रामसजावट ,  पालखी मिरवणुक व करमणुकीचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत मात्र यंदाही सर्वांचे आकर्षण असणाऱ्या बैलगाडा शर्यती ,  आखाड्याशिवायच हि यात्रा संपन्न होणार आहे.  प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही चाकण येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्रींची पूजा ,  देवाचा अभिषेक ,  हारतुरे ,  मांडवडहाळे व ग्रामसजावट करण्यात येणार आहे.  सायंकाळी ७ नंतर भैरवनाथ महाराजांची पालखी ,  छबीना मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ,  मनोरंजनासाठी चिंचोली (ता.जुन्नर) येथील संगीतरत्न निसारभाई पटेल यांचा ताफ़्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. रात्री दहानंतर येथील मार्केट यार्डच्या आवारात कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे  यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असल्

अनेक कारखानदारांकडे गुंडांची फौज

इमेज
अनेक कारखानदारांकडे गुंडांची फौज : पत्रकार दुधवडे  कामगार मेळाव्यात गौप्यस्फोट  अंकुशराव लांडगे सभागृह (भोसरी) येथील कार्यक्रमात बोलताना पत्रकार अविनाश दुधवडे  पिंपरी :  चाकण औद्योगिक वसाहतीत कामगारांवरील दडपशाहीचा विषय वारंवार समोर आला असून  कामगार संघटना आणि व्यस्थापन-उद्योजक यांच्यातील संघर्ष वारंवार समोर येवू लागले आहे.  औद्योगिक क्षेत्रात व्यवस्थापनांनी आणलेला ठेकेदाररुपी  गुंडगिरीच्या नव्या ट्रेंड मुळे  औद्योगिक अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे . येथील बजाज ,महिंद्रा, मिंडा, प्रदीप लॅमिनेटर्स आदी विविध कंपन्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांमध्ये अस्वस्थता पहावयास मिळत असून अनेक कंपन्यांमध्ये कामगारांनी आंदोलनाचे हत्यार आपल्या न्याय मागण्यांसाठी उपसले आहे . अनेक कारखान्यांमध्ये व्यवस्थापनाने गुंडांची फौज तयार केली असून कामगारांना  वेठबिगार पद्धतीने अल्प दारात राबविले जात असल्याचे मत खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे यांनी व्यक्त केले.    यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील ,श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोक

गुलमोहर फुलला ....

इमेज
गुलमोहर फुलला .... वैशाख वणव्या च्या कडकडीत चाहुलीतही  गुलमोहर  बहरले चाकण (ता.खेड) भागात वैशाख वणव्याच्या रणरणत्या उन्हात फुललेले गुलमोहर   चाकण:    उन्हामुळे नकोनकोसा वाटणारा प्रवास ,  उष्णतेमुळे जिवाची होणारी काहिली ,  घामामुळे चिपचिपलेले अंग यामुळे हा ऋतु सार्‍यांनाच नकोसा वाटतो. पण याच दरम्यान चैत्रमासात एक जादूगार आपली जादूची कांडी सर्वत्र फिरवत असतो आणि तो जादूगर म्हणजेच "निसर्ग".    हेमंत आणि शिशिर ऋतुच्या आगमनाने झाडांवरची पानं हळुहळु गळु लागतात.   सगळीकडे धरती अशीच निष्पर्ण ,  उजाड आणि उदास बसुन ऋतुराज   '  वसंताची '   वाट पाहत असल्याचे भासते. मात्र वैशाख वणव्याचे आव्हान स्विका र त पावसाळा सुरू होईपर्यंत शेवटी बहरतो तो   ' गुलमोहर '.  असे अनेक गुलमोहर रखरखत्या उन्हात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही चाकण ( ता.खेड)  भागात ठिकठिकाणी फुललेले पहावयास मिळत आहेत.   पानं म्हणजे झाडांचा श्वास पण गुलमोहर आपली सगळी पानं  गाळून देत असून  रखरखत्या उन्हात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ठिकठिकाणी फुललेले पहावयास मिळत  आहेत.    कुठलाही सुगंध    नसलेली    गुलमोह

अविनाश दुधवडे यांना पत्रकारितेतला 'राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०१४' प्रदान

इमेज
कामगारांच्या प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा व्हावी : बी.जी.कोळसे पाटील  पत्रकार   अविनाश दुधवडे यांना पत्रकारितेतला   ' राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०१४ '   प्रदान   खेड तालुका (जि.पुणे ) मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे यांना पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल  ' राजर्षी शाहू महाराज पुरस्कार २०१४ '  देवून गौरविण्यात आले. पिंपरी:    कामगारांच्या प्रश्नांची जागतीक पातळीवर चर्चा होण्याची गरज असून कामगार आणि त्यांच्या संघटनांनी न्याय हक्कासाठी एकत्रित लढा दिला पाहिजे असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात व्यक्त केले. आज (दि.१) कामगार दिना निमित्त महारॅलीचे व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन श्रमिक एकता महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. त्या प्रसंगी कोळसे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले होते . यावेळी महासंघाचे सेक्रेटरी केशव घोळवे  ,  कार्याध्यक्ष दिलीप पवार ,  मानव कांबळे ,  मारुती भापकर , दतात्रेय येळवंडे  ,  अविनाश वाडेकर