टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
संतप्त जमावाने पेटविले वाहन
जमावाने पेटविल्यानंतर जाळून खाक झालेल्या वाहनाची अशी अवस्था झाली होती (छायाचित्र: सम्राट कम्युनिकेशन ) |
चाकण :
चाकण एमआयडीसीमधील महिंद्रा कंपनी जवळ महाळुंगे- तळवडे रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.११) रात्री आठ वाजनेचे सुमारास घडली , अपघातानंतर जमलेल्या संतप्त जमावाने संबंधित टेम्पो पेटवून दिला आहे. दिनकर शिवाजी काळोखे (वय ३७, रा.विठ्ठलवाडी देहूगाव , ता.मावळ ,जि.पुणे ) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. या बाबतची फिर्याद सुधीर सुदाम काळोखे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार दिनकर काळोखे चाकण एमआयडीसीतील कंपनीतून कामावरून सुटल्या नंतर आपल्या दुचाकीवरून (क्र.एम एच १४ एस ३१४२) महाळुंगे- तळवडे रस्त्यावरून तळवडे बाजूकडे जात असताना महिंद्रा कंपनी जवळ असलेल्या पुलावर पाठीमागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर (क्र.एम एच १२ एफ सी ३४४९) ठोस बसल्याने ते जागीच ठार झाले. अपघात झाल्याची माहिती मिळाल्या नंतर जमलेले नातेवाईक आणि संतप्त जमावाने संबंधित टेम्पो पेटवून दिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्या नंतर पोलीस घटनास्थळी पोहचले , पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर जमाव शांत झाला . मात्र संतप्त जमावाने पेटवून दिलेले टेम्पो ट्रॅव्हलर वाहन संपूर्णपणे जाळून खाक झाले असून, घटनास्थळी या वाहनाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. या प्रकरणी अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात पथकाचे बी.डी .लहासे, जयप्रकाश चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत.
-------------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा