राष्ट्रवादीची दादागिरी आणि आढळरावांच्या नाकर्तेपणामुळे मतदार बेजार...

राष्ट्रवादीची दादागिरी आणि आढळरावांच्या नाकर्तेपणामुळे मतदार बेजार
अशोक खांडेभराड यांची मुलाखत ...


चाकण:
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा झेंडा हाती घेऊन शिरूर मधील जनतेचा विश्वास जिंकणार असल्याच्या ठाम विश्वास दाखविणारे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अशोक खांडेभराड यांच्या प्रचार सभांच्या धडक्याने मनसे मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिरूर मध्ये प्रचार सभांचा धडाका लावला असून  रविवारी (दि.१३) राज ठाकरे चाकण मध्ये झंजावाती सभा झाली . त्यांच्या सभांनी खेचलेल्या गर्दीने येथील वातावरण ढवळून निघत असून विरोधी पक्षांची चिंता वाढत आहे. मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांनीही आपला झंजावाती प्रचार अल्पवधीत पुरा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.  शिरूर लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदारांनी काहीही केले नसल्याचा आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी त्यांची फिक्सिंग असल्याचा आरोप करीत त्यांनी मतदार संघ पिंजून काढला या एकूणच निवडणुकी बाबत त्यांच्याशी केलेली खास बातचीत...

प्रश्न-   शिरूर मतदार संघाच्या विकासाविषयी तुमची भूमिका काय ?
खांडेभराड  - शिरूर मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळे प्रश्न आहेत. सर्वसामान्य गोरगरीबकष्टकरी कामगारआर्थिकदृष्ट्या मागासलेला जिरायतदार शेतकरी व शेतमजूर,युवक यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि प्रगती व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहे.  विधानसभा मतदार संघ निहाय करावयाच्या विकास कामांचा प्रारूप आराखडा मतदारांसमोर ठेवण्यात येणार असून ,  गट-तटहेव्यादाव्यांचेआणि जातीयतेचे राजकारण करणार नाही.  मतदार संघातील वाड्या-वस्त्या  गांवे आणि शहरे या  ठिकाणी राहीलेली विकास कामेलोकसंख्या यांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक गावातील ग्रामीण स्वयंरोजगार योजनायशवंत ग्रामविकास योजनासंत गाडगेबाबा स्वच्छता अभियानरोजगार हमी योजनास्वजलधाराप्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सर्व गावांतील आणि शहरी भागातील रस्ते,  या सर्व योजनांकडे बारीक लक्ष देवून नियोजनपूर्वक या योजना राबविल्या जाव्यात याकडे लक्ष देण्यात येणार आहे. परिसरातील सर्व देवस्थाने विकसित करण्यासाठी  त्यांनी एक प्रारूप आराखडा तयार करून तीर्थक्षेत्रे विकास कार्यक्रमाअंतर्गत ही तीर्थक्षेत्रे विकसित करण्याची योजना केली आहे. सर्व तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांना नवी दिशा देण्याचा अनोखा प्रयत्न असणार आहे. तसेच अनेक विकासाचे प्रश्न यामध्ये एम.आय.डी.सी च्या सहकार्याने छोट्या गावांमध्ये प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनाग्रामीण विद्युतीकरण,आरोग्य सुविधा व रोजगारसंधी या सर्व प्रश्नांचा पूर्णत्वास नेण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व विधानसभेतील मनसेच्या आमदारांच्या  माध्यमातून शासन पातळीवर पाठ पुरावा केला जाणार आहे. खऱ्या गरजूंना  परिस्थितीशी सामना करण्यासाठी रोजगार हमी योजनेचे या भागात सक्षमीकरण रस्तेशेततळेछोटे बंधारे तयार करून पाणी अडवा-पाणी जिरवा ही योजना व्यापक प्रमाणात प्रशासनालाच्या  माध्यमातून राबविणे यासाठी  पाठपुरावाकेला जाणार आहे. 

प्रश्न-   शिरूर लोकसभा मतदार संघातील तुमची खरी लढत कोणाशी ?
खांडेभराड  - -राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांशी आपली लढत आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत दोनदा निवडून आलेले खा.आढळराव हेच प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. राष्ट्रवादीची दादागिरी आणि आढळराव यांच्या  नाकर्तेपणामुळे मतदार बेजार आहेत. आढळराव यांनी या मतदार संघातील कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक केलेली नाही. शिरूर मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळे प्रश्न आहेत. हडपसर परिसरात आढळराव मागील ५ वर्षे फिरकले नाहीत. त्यांनी २००४ च्या वचननाम्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते.  त्यांच्या संघर्ष या अहवालामध्ये मतदारसंघात ४५०० कोटींची कामे केल्याचा दावा केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारमावळचे खासदार गजानन बाबर यांना त्यांच्या मतदारसंघात एवढा निधी मिळाला नाही. मात्रतो निधी आढळरावांनी आणलाच कसा ते धादांत खोटे बोलत असून जनताच आता त्यांना जागा दाखवून देईल. खा. आढळराव  यांच्याकडे गाजराची व मुळ्याची शेती आहे. लोकसभा निवडणुकीत ते अनेकांना आमदारकीची स्वप्ने दाखवून निवडून येतात. मात्रविधानसभेला  मर्जीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ करतात आणि  इतरांना बंडखोरी करायला लावतात.  त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतात. राष्ट्रवादीच्या आमदारांशी ते मॅचफिक्सिंग करतात आणि आपले इस्पित साध्य करतात.

प्रश्न-   कोणत्या भागातून अधिक मतदान होईल :
खांडेभराड  - शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्वच विधानसभा मतदार संघातून आपण मोठे मताधिक्य घेवू . 'एमआयडीसीविस्तार व भूमिपुत्रांच्या रखडलेल्या मागण्यास्थानिकांना उद्योगात रोजगारच्या संधी,  धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या ,चाकण,राजगुरुनगरसह भोसरी व हडपसरमधील वाहतूक कोंडी गंभीर अपघातशिरूर - चाकण मधील सत्ताधाऱ्यांच्या गुन्हेगारीचा चढता आलेखरस्ते,वीजशुद्ध पाणीपुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वेमार्ग तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न ,  रखडलेल्या धरणांसाठी केंद्राचा निधी आणि प्रकल्प ग्रस्तांना मदतीचा हात,  आदी बाबी येथील जनतेच्या जिव्हाळ्याच्या आहेत. शिरूर हा मतदारसंघ जागतिकस्तरावरील महत्त्वाचा भाग आहे. मात्रविकाससोईसुविधा पाहिल्यातर हा भाग मागास वाटतो. रस्तेनागरीसुविधा आरोग्यविषयक सुविधाशैक्षणिक सुविधा याविषयी अनेक समस्या आहेत. विकासाच्या नुसत्याच गप्पा मारून जनतेला भुलविण्याचे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. या बाबी आता मतदारांच्या लक्षात आल्या असून मतदार आता या भूलथापा ओळखून असल्याने आपल्याला खेड सह आंबेगावजुन्नरशिरूर हडपसर ,भोसरी आदी सर्वच भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच  शिवसेनेच्या सध्याच्या शिरूरच्या खासदारांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी काहीही केलेले नाही म्हणून भाजपवाले आम्हालाच मदत करतील . 

प्रश्न-   शिवसेनेच्या खासदारांवर रोष का ?
 उत्तर-   सत्तेसाठी शिवसेनेत आलेल्या खा.आढळराव यांनी आढळराव सेना उभारली व सच्च्या कार्यकर्त्यांचा बळी दिला. आढळराव यांचे राजकीय आयुष्य दहा वर्षांचे असून मी शाखाप्रमुख ते उपजिल्हा प्रमुख असा तीस वर्षांचा प्रवास केला आहे. खेड विधानसभेमधून मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली. त्या वेळी शिवसेनेचे खासदार असणार्‍या आढळराव यांनी माझ्या विरोधात भूमिका घेतली. अपक्ष उमेदवार उभा करून मला पडण्याचा प्रयत्न केला. तरीही मला खेड-आळंदी विधानसभ मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळालीच .आढळराव यांचा छुपा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. पक्षाच्या विरोधात काम करताना त्यांना पक्षशिस्त आठवली नाही कामी निष्ठावंत असतानाही  पक्षातून काढण्यात आढळराव हे जबाबदार होते. त्यामुळे मनसे या कार्यकर्त्यांची जाण असणाऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय मी घेतला. दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मी त्यांचा प्रचारप्रमुख होतो. ते कशा खोट्या पद्धतीने प्रचार करून निवडून येतात याची मला चांगली जाण आहे. दोनदा निवडून आल्यानंतरही खा. आढळरावांनी मतदार संघात फारसा निधी दिलेला नाही . सगळ्या पक्षांमध्ये दलाल पाठवून ऐनवेळी त्यांना वापरून घेण्याचे त्यांचे कसब आता जनतेच्या लक्षात आले आहे. सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता मिळविण्याचे काम ते करीत आहेत. सेझविमानतळाच्या प्रकल्पाविरोधात शेतकर्‍यांना भडकावण्याचे आणि वरती उद्योगपतींशी हातमिळवणी करायची,अशी आढळरावांची दुटप्पी नीती आहे. इथे विमानतळ नको म्हणायचे आणि दिल्लीत विमानतळांना पाठिंबा द्यायचाअसे त्यांचे धोरण आहेत्यामुळे सेझविमानतळाला विरोध हा फक्त स्टंट आहे. आढळराव पूर्वी भाजी विकायचेअसे सहानुभूती मिळविण्यासाठी सांगतात. आता त्यातली फक्त गाजराची गड्डी त्यांच्याकडे असून १० वर्षांत त्यांनी एखाद्या नगरसेवकापेक्षा जास्त काम केले नाही व पुन्हा विकासाचे गाजर दाखवत जनतेची दिशाभूल करीत आहेत.  
------------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)