नवाकाळ निष्पक्ष अग्रगण्य दैनिक

नवाकाळ निष्पक्ष अग्रगण्य दैनिक 

नवाकाळ  हे मराठीतील एक खरोखर निष्पक्ष अग्रगण्य दैनिक आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील हे एक आघाडीचे कुठल्याही पक्षाचे नसणारे निर्भीड दैनिक असून खास वृत्तांत, मथळे ,मुलाखती व बातम्यांमधील विश्वासार्हता यामुळे इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या भस्मासुरात या दैनिकाने मुंबई सह राज्य मध्ये  आजही खोलवर पाय रोवले आहेत.
पुरोगामी विचाराचे दैनिक नवाकाळ मुंबई येथून प्रकाशित होणारे मराठी भाषीक दैनिक आहे.
  या वर्तमान पत्राच्या http://navakal.org/ या संकेत स्थळावरील इतिहास त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाची इत्यंभूत माहिती देत आहे. त्या संकेत स्थळावर दिलेल्या माहिती नुसार  नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक 'नवाकाळ' ची स्थापना केली. त्यांनी 'नवाकाळ' धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ( ९ फेब्रुवारी १९२९ ) भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार 'नवाकाळ' चे संपादकपद सोडले. मार्च १९२९ मध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंत कृष्णा उर्फ अप्पासाहेब खाडिलकर संपादक झाले. काकासाहेब तुरुंगातून जानेवारी १९३० साली परत आले. तथापि ते पुन्हा संपादक झाले नाहीत. या वेळी नाट्याचार्य यांचे वय ५८ होते. पण त्यांनी वेळीच स्वयंस्फूर्तीने संपादकपद सोडले! त्यांना थांबायचे कुठे? याची उत्तम जाण होती!

  अप्पासाहेब खाडिलकरांनी त्यांच्या वयाच्या ६४व्या वर्षी १ ऑक्टोबर १९६९ रोजी दसरा सणाच्या दिवशी मोठ्या आनंदाने संपादकपद सोडले आणि नीलकंठ खाडिलकरांचे नाव संपादक, मुद्रक आणि प्रकाशक म्हणून जाहीर केले! हि नाट्याचार्यांचीच परंपरा! नीलकंठ खाडिलकर यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १९९७ साली मार्चमध्ये 'नवाकाळ' चे संपादकपद सोडले. त्यांची कन्या सौ. जयश्री रमाकांत-पांडे हिला संपादक, मुद्रक व प्रकाशन म्हणून जाहीर केले! मागोमाग डिसेंबर १९९८ मध्ये 'संध्याकाळ'चे संपादकपद सोडले. सर्वांत लहान कन्या रोहिणी नीलकंठ खाडिलकर हिला संपादकपद दिले. सर्वांत पहिली कन्या वासंती उन्नी हिला व्यवस्थापक केले. पगार व ऑफिसचा सर्व हिशोब नीलकंठ खाडिलकर यांची पत्नी सौ. मंदाकिनी नीलकंठ खाडिलकर गेली १८ वर्ष सांभाळत आहेत.
----------------अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)