वाढत्या रहदारीने कोंडतोय शहराचा श्वास

वाढत्या रहदारीने कोंडतोय शहराचा श्वास
 चाकण मधील स्थिती
चाकण:वार्ताहर
अरुंद रस्तेवाढती अतिक्रमणे व अवजड वाहनांची रहदारी यामुळे चाकण शहराचा श्वास कोंडला आहे. चौकांमध्ये कोंडीमुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. गेल्या पाच वर्षात एक हजाराहून अधिक जणांचे बळी या भागातील राष्ट्रीय व राज्य मार्गांवर गेले आहेत . यावर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी  जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीयांच्या सूचनेनुसार  पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा,तळेगाव चौक,आंबेठाण चौक भागात  नो पार्किंग झोन  नुसता जाहीर करण्यात आला होता मात्र दुर्दैवाने या बाबतची कार्यवाही शक्य झाली नाही. त्यातच या भागातून दिवसा  तळेगाव ते शिक्रापूर या राज्य  मार्गावरील अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली. परंतु या आदेशाला अवजड वाहनचालकांनीच नाही,तर प्रशासनानेही केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा आलेख उंचावत आहे. 
चाकण  शहरात सकाळी व सायंकाळी ठरावीक वेळेत शालेय,तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनोकरदारांची मोठी वर्दळ असते. स्थानिक नागरिकही कामानिमित्त घराबाहेर पडतात. अशा वेळी अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्यास मोठी वाहतूक कोंडी होते. आतापर्यंत शहरात झालेल्या अपघातांत अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. या अपघातांना आळा बसावा याकरिता दिवसा अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. मात्र त्याबाबत वाहतूकदारांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून पुन्हा वडगाव-तळेगाव-चाकण- शिक्रापूर या राज्य मार्गावरील अवजड वाहतून आहोरात्र सुरु झाली आहे. वाढत्या औद्योगिकरणा नंतर गेल्या आठ -दहा वर्षांत चाकण परिसर वाहतुकीच्या जंजाळात अडकला आहे . औद्योगिक परिसर व रस्त्यालगतच्या बड्या व्यवसायिक इमारतींना पुरेशा पार्किंगची सुविधा नसल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत . वाढत्या लोकवस्तीमुळे वाहनांची संख्याही विलक्षण वाढली आहे. म्हणूनच वाहतूककोंडी सारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे . लोकसंख्या वाढत गेल्याने इथल्या समस्याही वाढल्या . त्यात पार्किंगची समस्या प्रमुख आहे . अनेकदा मुख्य रस्त्यांवर वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडी होते . मुख्यतः तळेगाव चौकमाणिक चौकआंबेठाण चौकमार्केट यार्ड जुना पुणे नाशिक रस्ताआंबेठाण रस्ता आळंदी फाट्या जवळील एमआयडीसीत जाणारा रस्ता  या परिसरात ही समस्या रोजची झाली आहे .

बाह्यवळण मार्ग हवाच
चाकण शहराचे तसेच औद्योगिक वसाहतीचे दळवळणाचे मुख्य रस्ते म्हणून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गचाकण-तळेगाव,चाकण-शिक्रापूर हे रस्ते ओळखले जातात. या रस्त्यावर औद्योगिक वसाहतीमधीलतसेच पिंपरी-चिंचवडपुणेमावळमुंबई,मराठवाडानाशिकपुणेनगर या भागातून ये-जा करत असलेली अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या रस्त्यावर चौकाच्या ठिकाणीतसेच शहर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहेत.त्यामुळे अवजड वाहने वळतानातसेच शहरातून ये-जा करताना वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका वाहतुकीला बसतो. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.  ऑटोमोबाइल्स हब म्हणून नावारूपाला येत असलेल्या चाकण मध्ये  मोठ्या प्रमाणात कंटेनरट्रेलर यांची वाहतूक होत आहे. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी बाह्यवळण मार्गाची गरज आहे. औद्योगिक वसाहत विस्तारत असताना एमआयडीसीने फक्त अंतर्गत रस्त्यांची व पुणे-नाशिक,चाकण-तळेगाव या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे केली. एमआयडीसीने केलेले मार्ग पुरेसे नाहीत. एमआयडीसीने पिंपरी-चिंचवडला जोडण्यासाठी तळवडे आयटी पार्क येथे रस्ता केला असलातरी वाहतूक अजूनही सुरळीत होत नाही. त्यामुळे बाह्यवळण मार्गाची गरज आहे. बाह्यवळण मार्ग चाकण औद्योगिक वसाहत व चाकण शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहेतवडगाव ते चौफुला राज्य मार्ग तातडीने झाला पाहिजे अशी मागणी नागरिक करीत आहेत पण या मागणीकडे  शासन व एमआयडीसी अजिबात लक्ष देत नाहीअसा या भागातील रस्त्यालगतच्या गावांचासर्व पक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांचा आरोप आहे. औद्योगिक वसाहत कुरुळीनिघोजे,नाणेकरवाडीखराबवाडीमहाळुंगेखालुंब्रेसावरदरीवराळेभांबोली,शिंदेवासुलीबिरदवडीआंबेठाणचिंबळी या गावांमध्ये विस्तारली आहे. त्यामुळे या वसाहतीतील वाहतुकीसाठी चाकण-तळेगाव,चाकण-शिक्रापूरपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे बाह्यवळण मार्ग होणे गरजेचे आहेतअसे नागरिकांना वाटते.
-----
 अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)