स्त्री सक्षमीकरणाच्या मोहिमेला ग्रामीण भागात उदंड प्रतिसाद

स्त्री सक्षमीकरणाच्या मोहिमेला ग्रामीण भागात उदंड प्रतिसाद

चाकण:
  राज्यातील महिलांचे सक्षमीकरणसबलीकरण करण्याच्या उद्देशाने दैनिक पुढारीने सुरु केलेल्या स्त्री सक्षमीकरणाच्या मोहिमेला  ग्रामीण भागातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसादात स्त्री शक्तीचे दर्शन घडत आहे . पुढारीच्या उपक्रमास पाठींबा देण्यासाठी एवढ्यावरच न थांबता या महिलांनी महिलांविषयीच्या सामाजिकआर्थिकशारीरिककौटुंबिक समस्या एकत्रित बसून सोडविण्याचा ठाम निर्धार सामाजिक मंडळे व महिला संघटना करीत आहेत. चाकण सह ग्रामीण भागातून दैनिक पुढारीचा  हा उपक्रम महिलांचे मनोबल उंचावणारा ठरत आहे .
 या भागातील बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांनि सांगितले कि,महिला महिलांचे सबलीकरणसक्षमीकरण ही काळाची गरज आहे. महिलांना केवळ राजकीय आरक्षण देऊन चालणार नाही,तर सामाजिकआर्थिककौटुंबिक पातळीवरील प्रत्येक निर्णयात त्यांना स्थान मिळाले पाहिजे. तसे झालेतरच कुटुंबव्यवस्था मजबूत होऊन त्या कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा व देशाचा विकास होईल. त्यासाठी पुढारीने सामान्य कुटुंबातील महिलांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.  स्त्रियांसाठी नियमित कार्यरतअसणाऱ्या महिलांना महिलांच्या सक्षमीकरण करण्याबाबतच्या प्रबोधनात यात अनेक अडचणी येत होत्या. मात्रस्त्री सक्षमीकरणाच्या प्रतिज्ञे मुळे आता अधिक प्रेरणा मिळात असूनतळागाळातील महिलांना न्याय देण्यासाठी आम्ही  सज्ज झालो आहोत या पुढारीच्या माध्यमातून माध्यमातून अधिक सजगतेने काम करण्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे ग्रामीण भागातील सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे .
-------------
 फोटो मेल करित आहे.
फोटो ओळ: ग्रामीण भागातील महिला  दैनिक पुढारीने सुरु केलेल्या स्त्री सक्षमीकरणाच्या मोहिमेला  उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
 ................अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)