चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे

चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे
अखंडित समस्यांची शृंखला अधिकारी- कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा
चाकण: 
मोबाईल फॅक्सइंटरनेटकुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच सुविधांचा आभाव ,कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा ,अधिकाऱ्यांची अनास्थायामुळे चाकण च्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. औद्योगिक वसाहतछोटेमोठे व्यावसायिक तसेच लगतच्या वाड्या वस्त्या व  गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण येथून या टपाल कार्यालयाचा कारभार चालतो. विविध शासकीय कामांसहया भागातील सर्व बँका ,पतसंस्था यांचा कारभार  तसेच दैनंदिन टपालठेव योजनाबचत योजनाविमा योजना या सर्व कामांचा भार येथील टपाल कार्यालयावर आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे कामास विलंब होतो अशी खुद्द या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांची तक्रार आहे. मात्र या कार्यालयात कुठलेही तातडीचे काम घेवून येणाऱ्यांच्या अंगावर कर्मचारीवर्ग धावून येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
 दूरध्वनी बिलेरजिस्टरस्पीड पोस्ट यासारख्या कामासाठी संगणकाचा वापर केला जातो. परंतु भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर हे कामकाज ठप्प होते. जनरेटरला रॉकेल उपलब्ध करण्याची व्यवस्था नसल्याने ते बंद स्थितीत असल्याचा अनुभव आज(दि.17)  अनेक नागरिकांना आला. 
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन टपाल कार्यालयात कर्मचार्‍यांची संख्या वाढवावीनवीन जनरेटर संच मिळावाअशी मागणी या सेवेवर अवलंबून असणार्या अनेक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांची ओरड  : 
 चाकणमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने गेल्या काही दिवसांपासून येथील एक खिडकी बंद करण्यात आली असून बँकांची ,पतसंस्थांची टपाले स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली जात असल्याचे विचित्र प्रकार समोर येत आहेत.ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी पोस्ट कार्यालये ओस पडली असून शहरातही असेच चित्र दिसत आहे. चाकण सारखा औद्योगिकदृष्ट्या विस्तारता भाग काही अंशी याला अपवाद असला तरी येथे कर्मचाऱ्यांची उदासीनता असल्याने नागरिकांची गैर सोय होत आहे. काही पतसंस्थांच्या मंडळीनी या संदर्भात सांगितले कि,आमची अनेक टपाले असतात मात्र कमी कर्मचाऱ्यांची ओरड करीत संबंधित कार्यालयात टपाले स्वीकारली जात नाहीत.चाकण सारख्या विकसित भागातील पोस्ट ऑफिसची दयनीय स्थिती पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोस्ट कार्यालयास प्रशस्त जागा ,पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे.

एखादेच काउंटर असते सुरू :
कर्मचाऱ्यांअभावी एका खिडकीवर तिकिटेपाकिटे व अन्य साहित्य विक्रीव त्याच खिडकीवर स्पीड पोस्टरजिस्ट्रीपार्सल,मनिऑर्डरसेव्हिंगची कामे केली जातात. त्यामुळे या दोन्ही खिडक्‍यांवर नेहमी ग्राहकांची झुंबड असते. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याने हमरी-तुमरीचे प्रकार  नित्याचेच झाले आहेत. अशा हमरी तुमरीत संबंधित कर्मचारी मंडळीच आघाडीवर असतात.

वितरणाचा खोळंबा :
शहराची व लगतच्या भागातील लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांत शहर झपाट्याने विस्तारले आहेमात्र पोस्टमनची पदे जुन्याच मानकाप्रमाणे मंजूर आहेत. चाकण व लगतच्या गावांमधील सुमारे अडीच लाख लोकवस्तीसाठी तीन अधिकारी व हाताच्या बोटावर मोजण्या इतपत 8-10 कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी कमी असल्यामुळे नागरिकांना पत्र वेळेवर मिळत नाहीत. मोबाइलमुळे पोस्टाचा पत्रव्यवहार कमी झाला असलातरी शासकीय पत्रे,कंपन्यांची टपाल फोनमोबाईलची बिलेविमा संबंधित पत्रांची संख्या मोठी आहे. या पत्रांच्या वितरणासाठी अपुरे पोस्टमन आहेत.  त्यामुळे वितरणाच्या कामाचाही खोळंबा होत आहे.

सेवा ठप्पमूलभूत सुविधांची बोंब:
पोस्टांच्या बॅगची अवस्था दयनीय असूनफाटलेल्या कापडी पिशव्यामधून टपाल पाठविले जाते. सील करण्यासाठी डांबराची कमतरता असते. शिके मारण्यासाठी शाई नसते. डिंक तर शोधूनही सापडत नाही. कार्यालयाची इमारत मोडकळीस आली असूनग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व बसण्याची व्यवस्था नाही. संगणक असूनही कर्मचाऱ्यांअभावी इंटरनेट,ईमेलइॅ-बॅंकिंगसारख्या अन्य अत्याधुनिक सेवा उपलब्ध केल्या जात नाहीत.येथील जनरेटर बंद अवस्थेत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत .
त्यामुळे कारभारात सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
-----------------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)