चाकण मध्ये वर्षावास शिबिराची सांगता
चाकण:वार्ताहर
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आष्टांगीक मार्गाचा अवलंब करून जीवन सार्थक करा असा मोलाचा संदेश देत चाकण मध्ये आज (दि. 22) गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या वर्षावास शिबिराची सांगता करण्यात आली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हापरिषद सदस्य सुरेशभाऊ गोरे, खेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस,पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी , चाकणचे सरपंच दतात्रेय बिरदवडे , माजी उपसरपंच साजिद सिकीलकर, सदस्य अमोल घोगरे, अल्पसंख्यांक सेल चे सर्फराज सिकीलकर, जाहीर शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप परदेशी, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रीतम शिंदे, योगेश गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) ,भगवान शिंदे, माजी अध्यक्ष दादासाहेब रणपिसे,सुजाता ओव्हाळ ,आर.डी.गायकवाड,बापूसाहेब गोतारणे, पी.के.पवार , आरपीआयचे बबनराव जाधव, अशोक गोतारणे, विजय भवार ,किरण तुळवे ,प्रदीप नवरेसंपर्क बालग्राम अनाथाश्रमाचे ए.के.गांगुली आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मदेसना देतांना भारतीय बौद्ध महासभेच्या विविध वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी व भगवान बुद्धांचा आष्टांगीक मार्गाचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली. या प्रसंगी छाया दुधवडे यांच्या स्मरणार्थ येथील संपर्क बालग्रामच्या अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना
शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बुद्ध पूजा व प्रवचनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विशाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धार्थ गोतारणे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे आभार मानले .
------------------------------ -------------
फोटो मेल करीत आहे.
फोटो ओळ: संपर्क बालग्राम अनाथाश्रमाचे ए.के.गांगुली यांच्याकडे शालेय साहित्य सुपूर्त करताना मान्यवर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा