पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*पोलीस दलातील ताण तणाव वाढतोय ..

इमेज
*पोलीस दलातील ताण तणाव वाढतोय .. *खाकी वर्दीची व्यथा ,लाचखोरीचा घट्ट विळखा चाकण : महेंद्र दुधवडे चाकण च्या पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने काही महिन्या पूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्मत्या केली, आपल्या वीस पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये आत्महत्यांच्या फासावर लटकलेले कित्येक मृतदेह हळहळ करीत फासावरुन काढीत नातेवाईकांच्या ताब्यात देणारे हे जिल्ह्यासह राज्यभरातील पोलीस दलातील अनेक सशक्त हात स्वतःचेच गळे घोटत असणे ही बाब संपूर्ण पोलीस प्रशासनाला शरमेने मान खाली करण्यास कारणीभूत ठरत असून पोलीस दलातील ताण तणाव व दिवसेंदिवस वाढती लाचखोरी या साठी उपाययोजना करण्याचे दिव्य गृह विभागाला पार करावे लागणार आहे. घरगुती ताण तणाव ,अतिरिक्त कामाचा बोजा,त्यातून पदरी येणारी व्यसनाधीनता ,वरिष्ठांच्या जा

चाकण चेस फेस्टिव्हल -2012

इमेज
जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेस चाकण मध्ये सुरुवात चाकण चेस फेस्टिव्हल -2012 चाकण:वार्ताहर चाकण अकादमी व एस.एस.सिकीलकर संस्थेच्या वतीने चाकण मध्ये पुणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी 'चाकण चेस फेस्टिव्हल -2012' या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांना आज (दि.13) पासून सुरुवात झाली. मीरा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांसाठी सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचे पारितोषिक वितरण शुक्रवारी सायंकाळी येथेच पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर व चाकण चे उपसरपंच साजिद सिकीलकर ,यांच्या हस्ते होणार आहे.या स्पर्धांचे औपचारिक उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चाकण चे सरपंच काळूराम गोरे,उपसरपंच साजिद सिकीलकर,अस्लमभाई सिकीलकर, समीर सिकीलकर,अजित सिकीलकर,रामदास जाधव,संतोष साळुंके,प्रा.साहीर सिकीलकर,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे,जयवंत पिंगळे ,पुणे जिल्हा चेस असोशिएशनचे सचिव राजेंद्र कोंडे, मनोज स्वामी अल्पसंख्यांक

शरद पवारांना सर्वकल्याण ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून शुभेच्छा

इमेज
  शरद पवारांना सर्वकल्याण ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून शुभेच्छा खेड तालुक्यात अनोखा उपक्रम चाकण: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कडाचीवाडी येथे खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या साक्षीने सर्वकल्याण ज्ञानयज्ञ आयोजित करण्यात आला होता .शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने या यज्ञाच्या माध्यमातून 108 वेळा गायत्री मंत्रांचे पठाण करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अनोखी प्रार्थना केली. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी कोंग्रेस चे खजिनदार प्रतापराव खांडेभराड ,खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शांताराम भोसले,नानासाहेब टाकळकर ,बाजार समितीचे माजी सभापती हिरामण अण्णा सातकर ,माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई मोहिते,पंचायत समितीच्या सभापती कल्पना गवा

प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

इमेज
प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा खून खून केल्यानंतर मृतदेह टाकला जाळून चाकण जवळील घटना चाकण शुक्रवारी (7 डिसेंबर 12) सकाळी तोंडात बोळा कोंबून युवकास जाळण्यात आलेल्या थरारक खुनाचा छडा चाकण पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत लावला असून ,अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.संपूर्ण पणे जळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या नातेवाईकांपर्यंत पोहचण्याचे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि संशयीतांना बोलते करण्याचे दिव्य पोलिसांनी पार पाडीत पत्नी आणि प्रियकर या दोघांना आज(दि.12) गजाआड केले आहे. संतोष बबन जाधव (वय 33,सध्या रा,लेंडघर वस्ती,नाणेकर वाडी,चाकण मूळ रा.उदापूर,ता.जुन्नर जि.पुणे ) असे खून करण्यात आलेल्या पतीचे नाव असून त्याची

इंदू मिल च्या निर्णयाने समाधान :लक्ष्मण दुधवडे

इमेज
इंदू मिल च्या निर्णयाने समाधान :लक्ष्मण दुधवडे चाकण:वार्ताहर गेल्या अनेक दिवसां पासून गाजत असलेल्या इंदू मिलची जागा, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्याच्या मागणीला आज संसदेने मंजुरी दिल्याची बातमी वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित होताच रिपाई व खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या  कार्यकर्त्यांनी चाकण परिसरात आनंदोत्सव साजरा केला.खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी)येथील रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,चाकण शहराध्यक्ष अशोक गोतारणे ,युवक अध्यक्ष नितीन जगताप,राहुल गोतारणे,शेखर घोगरे,अभिजीत घोगरे,सतीश आगळे,प्रदीप गायकवाड, सुमित गायकवाड,अक्षय घोगरे,संजय गोतारणे,सचिन घोगरे,आदींनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे.  ही जागा मिळविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध आंबेडकरी संस्था संघटनांनी विशेष प्रयत्न केले होते. शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेवून  या बाबतचा निर्णय घेतल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत असल्याचे दुधवडे (गुरुजी ) यांनी सांगितले. ----------------

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल

इमेज
माजी पंतप्रधान गुजराल यांचे निधन         नवी दिल्ली- माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे आज (शुक्रवार) दुपारी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे संसद स्थगित करण्यात आली आहे. गुजराल यांच्यावर उपचार करणारे डॉ. के. एल. सेहगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाल्यामुळे आय. के. गुजराल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. आज दुपारी 3.31 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते 93 वर्षांचे होते. डॉ. सेहगल यांच्या नेतृत्वात तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम गुजराल यांच्यावर उपचार करीत होती. इंद्रकुमार गुजराल हे भारताचे १२ वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१९ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला. त्यांनी १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले.   गुजराल  यांच्यावर उपचार करणा-या एका डॉक्टरांने नाव प्र

पुणे जिल्ह्यात गॅंगवॉर ....

इमेज
पुणे जिल्ह्यात   गॅंगवॉर  ....   भोसरीमध्ये गुरुवारी दिवसाढवळ्या सचिन ऊर्फ गोट्या कुंडलिक धावडे (वय 35, रा. धावडेवस्ती) आणि अंकुश रामदास लकडे (वय 27, रा. आळंदी रोड, चाकण) यांचा धारदार शस्त्राने वार करीत गोळीबार करून निर्घृण खून करण्यात आला, तर संदीप रामचंद्र मधुरे (वय 30, रा. आकुर्डी) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या खुनामुळे भोसरीत गॅंगवॉर वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांच्या खुनातील सराईत गुन्हेगार गोट्या धावडे हा मुख्य आरोपी होता. त्यामुळे या प्रकरणाचा बदला घेण्यासाठीच त्याचा खून केल्याचा संशय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अंकुश लकडे हा गोट्यावर हल्ला करणाऱ्यांच्या गटातील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. लकडेबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नसून, त्याचीदेखील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासण्यात येत आहे. बारा हल्लेखोरांपैकी काही जणांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्यामागावर पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेखला व उपायुक्त श

चाकण परिसर होतोय भेसळीचा हब

इमेज
चाकण परिसर होतोय भेसळीचा हब  भेसळीचा धंदा कोटीचा  वर्षातील तिसरी मोठी कारवाई  मोठे मासे मात्र जाळ्या बाहेरच  पोलिसांशी गुफ्तगू  चाकण:(वार्ताहर) चाकण औद्योगिक क्षेत्रालगत खालुंब्रे (ता. खेड) गावाच्या हद्दीत फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणार्‍या तेलमाफियांच्या आणखी एका टोळीस थेट मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतले . या छाप्यात 11 टँकर, फर्नेस ऑईल, कॉस्टिक सोडा व रोख रक्कम, असा 40 लाख रुपयांचा माल जप्त केला.अर्थात चाकण सारख्या भागात अशा कारवाया वारंवार होत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.जून 2011 मध्ये खराबवाडी (चाकण )येथे झालेल्या कारवाईत  संशयास्पदरीत्या ज्वलनशील तेलाची वाहतूक करणारे दहा टॅंकर भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आले. या टॅंकरचे चालक मात्र पळून गेले, त्यामुळे पोलिसांना सखोल माहिती मिळाली नव्हती , त्यानंतर चाकण जवळ वाकी (ता.खेड) येथे बोथरा याच्या ऑइल डेपोवर नऊ टॅंकर पोलिसांनी काळ्या ऑइलमध्ये (फनेर्स ऑइल) भेसळ करताना पकडले. त्यानंतर पोलिसांना 20 हजार लिटरच्या दोन टाक्‍यांत सुमारे साडेतेरा हजार लिटर काळे ऑइल आढळून आले होते त्यामुळ

बौद्ध धर्माचे तंतोतंत आचरण करा : लक्ष्मण दुधवडे

इमेज
पुणे :प्रतिनिधी  ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती.  बौद्ध धर्म  हा जगातील एक  मोठा धर्म आहे. चीन, जपान, कोरीया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भुतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. भारतातही बाबासाहेबांच्या अनुयायांनी हा धर्म अंगिकारला असून प्रत्येक बौद्ध बांधवाने आपल्या धर्माचे तंतोतंत आचरण करावे अशी अपेक्षा भारतीय बौद्ध महासभेचे खेड तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी ) यांनी चाकण (ता.खेड) येथे व्यक्त केली .   पुढे बोलताना दुधवडे (गुरुजी) म्हणाले कि,  गुप्तकाळात हा धर्म ग्रीस, अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता.  कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आर्य सत्य समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अभ्यास केला पाहिजे. त्या द्वारेच मोक्ष मिळू शकेल असे हा धर्म सांगतो.  बौद्ध धर्मियांची प्रमुख चार तीर्थ स्थळे आहेत. लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. बौद्ध धर्मग्रंथाला त्रिपिटक असे म्हटले जाते.  भगवान बुद्धाला गौतम बुद्ध, सिद्धार्थ, तथातगत व बोधिसत्व या नावानेही ओळखले जाते

निश्चयाचा महामेरू जनता राजा शरदचंद्र पवार

इमेज
श्री. शरद पवार: सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले.श्री.वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला.  इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे ही पवार साहेबांचे  मार्गदर्शक होते.   शरद गोविंदराव पवार (१२ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मुत्सद्दी  राजकारणी आहेत. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून विभक्त होऊन इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. पवार साहेबांचा  जन्म १२ डिसेंबर, १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली. त्यानंतर काँलेजम